हेमामालिनी आणि धर्मेंद्रची मुलगी ईशा देओल अनेक वर्षांपासून बॉलीवूडपासून दूरावली होती. एके काळी तिला हेमामालिनीची पडछाया म्हणून बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली होती. ईशाने ‘कोई मेरे दिल से पुछे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सुरुवातीला तिचा चेहरा हेमामालिनीशी मिळता जुळता असल्यामुळे तिची तिच्या आईशी तुलना केली जाऊ लागली. मात्र लवकरच तिने निरनिराळ्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात स्वतःच स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केलं. मात्र अचानक 2011 नंतर ईशा बॉलीवूडमधून गायब झाली. आता चक्क दहा वर्षांनी ईशा पुन्हा कमबॅक करतेय. अजय देवगणसोबत ‘रूद्र-दी एज ऑफ डार्कनेस’ या वेबसिरिजमधून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. इशाने नुकतंच तिच्या बॉलीवूडपासून दूर जाण्याचं कारण उघड केलं आहे.
ईशा का दूर झाली होती बॉलीवूडमधून
ईशाने गेली दहा वर्ष बॉलीवूडशी नातं तोडलं होतं. याचं कारण तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईशाने तिच्या कुटुंबासाठी करिअरमध्ये एवढा मोठा ब्रेक घेतला होता. ईशा 2011 साली उद्योोगपती भरत तख्तानीसोबत विवाबबद्ध झाली. त्यानंतर तिला तिचा संसार आणि मुलं यांच्याकडे पुरेसं लक्ष द्यायचं होत. तिच्या मते तिचं तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. जर ती या काळात करिअरकडे लक्ष देत बसली असती तर तिला तिच्या संसाराचा आनंद घेता आला नसता. ईशाच्या मते जेव्हा तुमची मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठीच ईशाला आयुष्यात योग्य गोष्ट योग्य वेळी करायला आवडतात. तिच्या मते योग्य काळी लग्न, संसार आणि मुलं या जबाबदाऱ्या स्वीकारण प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचं आहे. आणि याच महत्त्वाच्या कारणासाठी ईशा गेली दहा वर्षे बॉलीवूडपासून काहिशी दूर गेली होती.
शिल्पा शेट्टीने केली चित्रीकरणाला सुरूवात, धैर्याने आली समोर
ईशाचा दमदार कमबॅक
कुटुंब आणि मुलांची जबाबदारी उत्तमरित्या पेलल्यानंतर आता मात्र ईशा पुन्हा एकदा तिच्या करिअरवर फोकस करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती रूद्र वेबसिरिजमधून अजय देवगणसोबत झळकणार आहे. शिवाय या वेबसिरिजसोबत ईशा डिजिटल माध्यमातही पदार्पण करत आहे. ईशाच्या मते ही वेबसिरिज ब्रिटनमधील लूथरचा हिंदी रिमेक आहे. याचं ओरिजनल वर्जन ईशाला खूप आवडलं आहे. या वेबसिरिजमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. रूद्र एक कॉप ड्रामा असेल. शिवाय बऱ्याच वर्षांनी पु्न्हा अजयसोबत काम करण्यास ती नक्कीच उत्सुक आहे. ईशाने यापूर्वी अजयसोबत काल, युवा, में ऐसा ही हूं या तीन चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या व्यतिरिक्त पती भरत तख्तानीसोबत ईशाने एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आहे. ज्यामुळे ती एक निर्माती म्हणूनही लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘एक दुआ’ या वेबसिरिजची निर्मिती ती करत आहे.ज्यामध्ये तिची मुख्य भूमिका देखील असेल.