भारतामध्ये सकाळ – संध्याकाळ चहा पिणाऱ्यांची संख्या नक्कीच अधिक आहे. चहाशिवाय अशा लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. एक दिवस जर अशा व्यक्तींना चहा मिळाला नाही तर त्यांचं डोकं दुखायला लागतं आणि शिवाय कामामध्ये मनही लागत नाही. तुम्ही जर चहाचे अतिशय चाहते असाल आणि तोच नेहमीचा चहा, दूध, पाणी असा चहा पीत असाल तर आता आम्ही तुम्हाला खास हर्बल टी बद्दल सांगणार आहोत. औषधीय गुणांनी उपयुक्त असा हर्बल टी हा तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. तुमच्या शरीरासाठी हा चहा खूपच लाभदायक मानला जातो. हा चहा प्यायल्यास तुमच्या दिवसभराचा थकवा दूर तर होतोच, पण तुमच्या शरीराला कोणतंही नुकसान होत नाही. अशा या हर्बल टी चे नक्की काय फायदे आहेत हे तुम्ही या लेखाद्वारे जाणून घ्या.
Table of Contents
- हर्बल टी म्हणजे नक्की काय (What Is Herbal Tea?)
- हर्बल टी चे फायदे (Benefits Of Herbal Tea)
- वेदना कमी करण्यासाठी (Herbal Tea Benefit Helps In Pain Relief)
- गाठीसाठी फायदेशीर (Herbal Tea Helps In Curing Arthritis)
- अनिद्रेची समस्या संपून जाईल (Herbal Tea Helps in Fighting Insomnia)
- हिरड्या मजबूत राहतात (Herbal Tea Prevents Gingivitis Issues)
- रक्तदाब नियंत्रित करू शकता (Herbal Tea Helps In Controlling Blood Pressure)
- यकृत निरोगी ठेवतं (Herbal Tea Keeps Liver Healthy)
- त्वचा राहते कोमल- सुंदर (Herbal Tea Beauty Benefits)
- जुने आजार पळवा (Herbal Tea Prevents Chronic Diseases)
- प्रतिकारशक्ती वाढवतो हर्बल टी (Herbal Tea Boosts Immunity)
- हर्बल टी कशा प्रकारे बनवावा (How To Prepare Herbal Tea)
- हर्बल टी चे प्रकार (Types Of Herbal Tea)
- हर्बल टी के नुकसान (Side Effects Of Herbal Tea)
- हर्बल टी संबंधित प्रश्न – उत्तर FAQ’s
हर्बल टी म्हणजे नक्की काय (What Is Herbal Tea?)
भारतीय आयुर्वेदानुसार, हर्बली टी हा वैदिक चहा म्हणून ओळखला जातो. हा चहा अतिशय स्वादिष्ट आणि औषधीय गुणांनी उपयुक्त असल्याचंही म्हटलं जातं. यामध्ये मिळणारी पोषक तत्व ही शरीरातील पदार्थांची पूर्तीच करत नाहीत तर दुसऱ्या चहापेक्षा अतिशय भिन्न असतात. यामध्ये कॅफिनची मात्रा नसते. वास्तविक अन्य चहापत्तीमध्ये आणि कॉफीमध्ये कॅफीन हे अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा कमीअधिक प्रमाणावर परिणाम होत असतो. बऱ्याच स्वरूपामध्ये असणाऱ्या हर्बल चहाचे अनेक फायदे आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार या हर्बल टी चा वापर करू शकता. हा चहा फुल, पानं, मूळ आणि बी इत्यादी गोष्टींपासून बनवला जातो.
घरगुती वनस्पतींचा वापर करून तुम्ही घरच्या घरीदेखील असा हर्बल टी आरामात बनवू शकता. 1 कप अर्थात 100 ग्रॅम हर्बल चहामध्ये 0.005 ग्रॅमपर्यंत सॅचुरेटेड फॅट, 0.012 ग्रॅम मोनोअनसॅचुरेटेड फॅट, 0.002 ग्रॅम पॉलीअनसॅचुरेटेड फॅट, 2 मिलीग्रॅम सोडियम आणि 21 मिलीग्रॅम पोटॅशियम इतकं प्रमाण असतं. हर्बल चहामध्ये कॉलेस्ट्रॉल, फायबर आणि साखर नसते. तर त्यामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी चं योग्य प्रमाण सापडतं.
हर्बल टी चे फायदे (Benefits Of Herbal Tea)
वजन कमी करण्यासाठी (Herbal Tea Helps In Weight Loss)
आजकालच्या व्यस्त आणि अनियमित जीवनशैलीमुळे बरेचसे लोक हे कमी वयातच जाडेपणाला सामोरं जावं लागतं. वाढत्या जाडीच्या कारणामुळे हृदय रोगापासून मधुमेहापर्यंत बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. वजन कमी करण्यासाठी आणि जाडी कमी करण्यासाठी ग्रीन टी अतिशय लाभदायक मानलं जातं. ग्रीन टी मध्ये काही अशी पोषक तत्व असतात जी तुमच्या शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. शिवाय वजन करण्यासाठी ग्रीन टी मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट करतं.
हिरव्या चहामध्ये अँटीऑक्सीडंट्सची मात्रा भरपूर प्रमाणात असते. वयाशी संबंधित वाढणाऱ्या आजारांपासून हे शरीराची रक्षा करतं. शिवाय कॅन्सरशी लढा देण्यासाठीदेखील याची मदत होते आणि यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
ग्रीन टी कसा बनवायचा (How To Make Green Tea?)
1. पाणी उकळून घ्या
2. 2 कप चहा बनवण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा चांगल्या दर्जाची ग्रीन टी ची पानं घाला. त्यानंतर 5 मिनट हे झाकण घालून झाकून ठेवा
3. आता हे गाळून प्या. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये मधदेखील घालू शकता
4. रोज ग्रीन टी 2- 3 कप तुम्ही पिऊ शकता
5. लक्षात ठेवा की, ग्रीन टी ची पानं घातल्यानंतर पाणी उकळू नका
वाचा – तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी
वेदना कमी करण्यासाठी (Herbal Tea Benefit Helps In Pain Relief)
हर्बल टी मध्ये अॅनाल्जेसिक हर्ब्स (analgesic herbs) असतात. हे हर्ब्स त्या लोकांसाठी खूप फायदेशीर असतात, ज्यांना नेहमी बेचैनीचा त्रास असतो. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये कायम वेदना असते अशा व्यक्तींना हे हर्ब्स फायदेशीर ठरतात. बऱ्याचदा गंभीर दुखापत, सर्जरी अथवा आजारामुळे शरीरामध्ये बराच काळ वेदना तशीच राहते. तुम्हीसुद्धा अशा वेदनने त्रासले असाल तर हर्बल टी यावर एक औषध म्हणून काम करतं. स्पेशल अनाल्जेसिक चहा बनवण्यासाठी चहा ऑलस्पिस (या मसाल्यात जायफळ, लवंग आणि दालचिनीचा सुवास असतो), कॅमोमाईल, निलगिरी अथवा कवा रूट चहाचा उपयोग करण्यात येतो.
गाठीसाठी फायदेशीर (Herbal Tea Helps In Curing Arthritis)
शरीरामधये कोणत्याही प्रकारची सूज असल्यास आलं खूप फायदेशीर असतं. आल्याचा चहा (Ginger Tea) पिऊन केवळ सर्दी खोकल्यापासूनच सुटका होते असं नाही तर गाठीला सूज आली असल्यास, त्यामध्येही फरक पडतो. याशिवाय काही अभ्यासामध्ये हेदेखील सिद्ध झालं आहे की, आल्यामुळे तुमच्या गाठींना आलेली सूज ही कमी करता येते. याशिवाय या चहामुळे तुमचं पोटदेखील चांगलं राहू शकतं. तसंच आल्याच्या चहामुळे तणाव आणि मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखीदेखील कमी होते. यामुळे भूक नियमित राहते आणि रक्तातील साखरेचं प्रमाणदेखील संतुलित राहतं.
आल्याचा चहा बनवण्याची पद्धत (How To Make Ginger Tea?)
1. एका पॅनमध्ये आल्याचा तुकडा आणि 2 कप पाणी घ्या
2. पाणी साधारण 10 मिनिट उकळा
3. आता हे पाणी गाळून यामध्ये थोडं मध आणि काही लिंबाच्या रसाचे थेंब घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आल्याचा हर्बल चहा तयार आहे.
4. हा चहा दिवसभरातून 2 ते 3 वेळा तुम्ही पिऊ शकता
अनिद्रेची समस्या संपून जाईल (Herbal Tea Helps in Fighting Insomnia)
लहान असो वा मोठे बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या सगळ्यांनाच त्रास होत आहे. कोणत्याही प्रकारचा ताण असो वा आजार सर्वात पहिल्यांदा याचा परिणाम होतो तो झोपेवर. अनिद्रा अथवा झोपेसंबंधीच्या समस्यांपासून सुटका हवी असेल तर हर्बल टी हा योग्य उपचार आहे. कॅमोमाईल (chamomile) चे सेवन करून तुम्ही तुमची झोप नक्कीच वाढवू शकता. यामध्ये फ्लेवोनॉईड एपिजेनिन असल्यामुळे हे झोपेसाठी प्रभावी आहे.
Also Read Dos and Don’ts While Offering Tulsi Leaves In Marathi
कॅमोमाईल टी (chamomile tea) प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखीपासून सुटका मिळते. तसंच तुमच्या मांसपेशीतील वेदना कमी होतात, तुमचा तणाव नियंत्रणात राहतो, वजन कमी होतं, पोटामध्ये काही समस्या असतील तर त्यापासूनही सुटका होते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.
कॅमोमाईल टी बनवण्याची पद्धत (How To Make Chamomile Tea?)
1. एक कप गरम पाण्यामध्ये 1 चमचा सुके कॅमोमाईल अथवा 2 चमचे ताजे कॅमोमाईल फूल घाला
2. 5 मिनिट झाकून ठेवा मग गाळून घ्या
3. यामध्ये मध घालून हे गरम पाणी प्या
हिरड्या मजबूत राहतात (Herbal Tea Prevents Gingivitis Issues)
भारतात तुळशीच्या झाडाची पूजा केली जाते आणि औषधीय अशा या वनस्पतीचा उपयोग अनेक आजारांसाठीही केला जातो. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट गुण असतात, जे तोंडामध्ये दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढतात. हर्बल तुळशीच्या चहाच्या सेवनाने पायरिया आणि हिरड्यांच्या त्रासांपासून सुटका होते. तुळशीची पानं खाल्ल्यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होते. तसंच तुळशीचा चहा प्यायल्याने ताण कमी होतो. मूड व्यवस्थित राहतो. भूकेमध्ये सुधारणा होते आणि अपचनापासून सुटका होते. हर्बल चहामधये तुळशीच्या चहाशिवाय सर्व अपूर्ण आहे.
तुळशीचा चहा बनवण्याची पद्धत (How To Make Tulsi (Basil) Tea?)
1. एक कप चहामध्ये तुळशीची सुकी पानं घाला
2. आता यामध्ये गरम पाणी घाला
3. हा चहा आता 10- 15 मिनिटं झाकून ठेवा
4. एका दिवसात तुळशीचा चहा तुम्ही 2- 3 कप पिऊ शकता. तसेच यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं तर मधदेखील घालू शकता.
वाचा – Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे
रक्तदाब नियंत्रित करू शकता (Herbal Tea Helps In Controlling Blood Pressure)
हर्बल चहामध्ये जास्वंदीच्या (hibiscus) चहाचंदेखील खूप महत्त्व आहे. हा चहा रक्तदाब कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. जास्वंदीच्या चहामध्ये अँटीऑक्सिंड असतात. जे खराब कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सीकरणाला रोखण्यासाठी मदत करतात. यामुळे हृदरोगसंबंधी समस्यांपासूनही सुटका होते अर्थात बचाव करता येतो. तुम्हाला जर रक्तदाबाची समस्या नुकतीच सुरु झाली असेल तर जास्वंदीचा चहा पिऊन या आजारापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. तसंच तुम्ही जास्वंदीच्या पानाचा चहा प्यायल्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्याबरोबरच तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. यकृत निरोगी ठेवतं आणि कॅन्सरच्या धोक्यापासूनदेखील लांब ठेवतं. तुम्ही जर बरेच वर्ष याचं सेवन केलंत तर वजन कमी करण्यासाठीदेखील हे उपयुक्त आहे.
जास्वंदीचा चहा बनवण्याची पद्धत (How To Make Hibiscus Tea?)
1. 2 कप पाण्यामध्ये जास्वंदीच्या पानाचे 2 चमचे सुकी पानं घालावीत
2. 10 मिनिटांपर्यंत हे उकळवून घ्या
3. आता हे गाळून घ्या आणि स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये मध आणि थोडासा लिंबाचा रस घाला आणि प्या
4. दिवसातून 2-3 वेळा तुम्ही हे पिऊ शकता
यकृत निरोगी ठेवतं (Herbal Tea Keeps Liver Healthy)
शरीर निरोगी राहण्यासाठी आपलं यकृत निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. सिंहपर्णी ही एक अशी वनस्पती आहे जी तुमचं यकृत निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. यकृताची काम करण्याची काम करण्याची क्षमता ही वनस्पती वाढवते आणि टॉक्सिक पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत करते. सिंहपर्णी (dandelion) च्या चहाचे खूपच फायदे आहेत. यामुळे वजन कमी होतं. सूज आली असल्यास, ती कमी करण्यासाठी मदत मिळते. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि मधुमेह संतुलित राखण्यासाठीही याची मदत होते. यामध्ये आयर्न, पोटॅशियम आणि बीटा कॅरोटीन अशा प्रकारची खनिजं असतात. याशिवाय विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन डी देखील यामध्ये समाविष्ट असते.
सिंहपर्णी चहा बनवण्याची पद्धत (How To Make Dandelion Tea?)
1. एक कप पाण्यामध्ये 2 चमचे सिंहपर्णीच्या पानांचं चूर्ण घाला
2. आता हे 2 मिनिट्स उकळा
3. 10 मिनिट्सपर्यंत हे थंड होऊ द्या आणि नंतर गाळून प्या
त्वचा राहते कोमल- सुंदर (Herbal Tea Beauty Benefits)
हर्बल टी मध्ये असे गुण असतात, ज्यामध्ये आतल्या आणि बाहेरच्या शरीराची स्वच्छता राखली जाते. शरीरामध्ये असणाऱ्या अशुद्ध गोष्टी याच्या सेवनामुळे बऱ्याच अंशी कमी करता येतात. यामुळे त्वचेचे रोग निघून जातात आणि त्वचा निरोगी होते. तुम्ही जर नियमित स्वरूपात हर्बल चहा प्यायलात तर तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांच्या समस्येपासून तुमची सुटका होईल. हे एक्झिमाच्या आणि सोरायसिस ट्रीटमेंटसाठी फायदेशीर आहे. त्वचा निरोगी बनवण्यासाठी पुदीना, ग्रीन टी आणि कॅमोमाईल टी सारख्या हर्बल टी चा उपयोग केला जातो.
जुने आजार पळवा (Herbal Tea Prevents Chronic Diseases)
निरोगी शरीरासाठी अँटीऑक्सिडंट्स (antioxidants) खूपच महत्वपूर्ण आहे. हर्बल चहाच्या नियमित सेवनाने शरीराची ही गरज काही भागापर्यंत पूर्ण होत असते. अँटीऑक्सीडंट्सने असणारे हर्बल चहामुळे तुम्हाला असलेले आजार दूर करतात आणि कॅन्सरसारख्या आजारापासूनही सुटका मिळवून देतात. पेपरमिंट (peppermint), नेटल आणि थाइम टी (thyme tea) हे काही अशा चहापैकी आहेत, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात मिळतात. हा चहा तणाव कमी करण्यसाठी उपयुक्त आहे.
वाचा – जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक
प्रतिकारशक्ती वाढवतो हर्बल टी (Herbal Tea Boosts Immunity)
बऱ्याच कमी लोकांना ही माहिती आहे की, हर्बल टी चं नियमित सेवन केल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढते. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर, तुम्ही विविध आजार आणि संक्रमणांशी खूप चांगल्या तऱ्हेने लढू शकता. तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्या आजाराशी लढा देत असाल, तर हर्बल टी मुळे तुम्ही त्या आजाराचा प्रभाव कमी करू शकता. निरोगी शरीरासाठी सामान्य चहाऐवजी हर्बल गुणयुक्त चहा हा नेहमीच चांगला असतो. हा पिण्याने शरीर निरोगी राहातं. तसंच तुमचं हृदय आणि डोकं नेहमीच ताजंतवानं राहातं.
हर्बल टी कशा प्रकारे बनवावा (How To Prepare Herbal Tea)
सामान्य चहाप्रमाणेच आपण हर्बल टीदेखील बनवू शकतो. फरक फक्त इतकाच की, यामध्ये वापरण्यात येणारं सामान वेगळं आहे. आपण पितो त्या चहामध्ये पाणी, दूध, साखर, चहा पावडर आणि स्वादानुसार आलं अथवा वेलची या वस्तू घातल्या जातात. तर हर्बल टी मध्ये चहाची पानं, फुलं, वनस्पती आणि औषधीय मूळ गरम पाण्यामध्ये उकळवले जाते. या आयुर्वेदिक चहाचे बरेच फायदे आहेत आणि यामध्ये अजिबात कॅफिन नसतं. तुम्ही जेव्हा नुसती औषधं खायला गेलात तर त्याची चव अजिबात लागणार नाही आणि त्याचा फायदादेखील होणार नाही. हर्बल टी बनवण्यासाठी यामध्ये वापरण्यात येणारी उत्पादनं ही योग्य प्रमाणात असतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, फायदेशीर हर्बल टी मध्ये 3 भाग सक्रिय घटक, 2 भाग सहायक घटक आणि 1 भाग उत्प्रेरक घटकांचं मिश्रण असणं आवश्यक आहे. या मिश्रणामुळे हर्बल टी स्वादिष्ट, प्रभावशाली आणि संतुलित राहतो.
हर्बल टी चे प्रकार (Types Of Herbal Tea)
औषधींने भरपूर युक्त असे हर्बल टी चे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक चहाचा आपला असा एक गुण आहे आणि तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार या चहाचं सेवन करू शकता.
1. ग्रीन टी (Green Tea) – वजन कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी नियमित स्वरूपात घेतल्यास, तुम्हाला म्हातारपण लवकर येत नाही. शिवाय कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील हाडं मजबूतीसाठी याची मदत होते. ग्रीन टी अर्थात हिरवा चहा हा कधीही तुम्ही रिकाम्या पोटी पिऊ नका. दुपारी जेवल्यानंतर ग्रीन टी पिण्याची सवय लाऊन घ्या. तुमच्या शरीरारासाठी योग्य आहे.
2. आल्याचा चहा (जिंजर टी- Ginger Tea) – हा चहा नियमित स्वरूपात प्यायल्यास, तुमची पचनक्रिया उत्कृष्ट होते. यामुळे तुम्हाला असलेले जुने आजार दूर होण्यास मदत होते. ज्या लोकांना कमी भूक लागते, ते या चहाचं सेवन करून आपली भूक वाढवू शकतात.
3. व्हाइट टी (White Tea) – हा हर्बल चहा कॅमेलिया सिनेसिस प्लांटपासून बनलेला आहे. यामध्ये अँटीएजिंग गुण असतात. ज्यामुळे त्वचा नेहमी निरोगी आणि सुंदर दिसते. व्हाईट टी रोज प्यायल्याने, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहातं आणि आपलं हृदयदेखील निरोगी राहातं.
4. कॅनबिस (भांग- Cannbis) चा चहा – वास्तविक भांग पिणं चांगलं नाही. पण भांगेपासून तयार करण्यात आलेला चहा प्यायल्यामुळे पोटदुखी, पोटात आलेला गोळा, सूज आणि डोकेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
5. स्टार अनीस टी (Star Anise Tea) – स्टार अनीस हा एक प्रकारचा मसाला आहे आणि यापासूनदेखील चहा बनवता येतो. स्टार अनीस चहा प्यायल्याने, बद्धकोष्ठ, असिडिटी आणि पोटासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. दिवसभरातून 1 कप स्टार अनीस चहा पिण्याने पचनशक्ती प्रक्रिया सुधारते.
6. रोझ टी (Rose Tea) – गुलाबाच्या पानांनी तयार झालेला हा चहा तुम्ही प्यायल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा येतो आणि पोटदुखी संपते. यामध्ये असणाऱ्या विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन बी 3 आणि विटामिन डी मुळे शरीराला खूपच चांगला फायदा मिळतो.
7. पेपरमिंट टी (Peppermint tea) – हा खास चहा तुमच्या शरीरातील गॅस, पोटासंबधी तक्रारी दूर करण्यास उपयुक्त आहे. पेपरमिंट एका स्वरूपाचा पुदीना असतो जो तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
Read More: Benefits Of Chamomile Tea In Marathi
हर्बल टी के नुकसान (Side Effects Of Herbal Tea)
प्रत्येक गोष्टीला नेहमीच दोन बाजू असतात. तुमच्यासाठी एखादी गोष्ट जितकी फायदेशीर ठरू शकते तितकीच तुमच्यासाठी नुकसादायीदेखील असू शकते. जाणून घेऊया हर्बल टी मुळे नक्की काय नुकसान होतं –
1. तुम्ही जर गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर, तुम्ही कॅमोमाईल पाणी पिण्यापासून स्वतःला थांबवा
2. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना जास्वंदीच्या फुलांच्या चहाचं सेवन करू नये
3. व्हाइट टी जास्त पिणं हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं
4. भांग हा एक मादक पदार्थ आहे त्यामुळे याचा चहादेखील कमीत कमी स्वरुपात प्या
5. वनस्पतीपासून बनणारा हर्बल टी हा प्रत्येकासाठी फायदेशीर असतो, असं नाही. त्यामुळे तो पिण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला जर एखाद्या वनस्पतीपासून अलर्जी असेल तर, असा चहा पिण्यापासून तुम्ही दूर राहा.
हर्बल टी संबंधित प्रश्न – उत्तर FAQ’s
1. हर्बल टी घरी बनवू शकतो का?
हो तुम्ही घरी अगदी आरामात हर्बल टी बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला हवं तर बाजारातून टी बॅग घेऊन या अथवा घरी हर्बल टी बनवण्याचं साहित्य तुम्ही घरी आणा.
2. हर्बल टी कोणीही पिऊ शकतं का?
प्रत्येक वयाची व्यक्ती हर्बल टी पिऊ शकते. तुम्ही हर्बल टी चे फायदे आणि त्यामध्ये उपयोगात आणणाऱ्या सामानाबद्दल जाणून घ्या आणि मग तुम्ही याचं सेवन करा.
3. हर्बल टी मुळे काही नुकसान होत नाही ना?
वास्तविक हर्बल टी मुळे सर्वांचा फायदाच होतो. पण तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुम्ही त्यामध्ये कोणत्या वनस्पती घातल्या आहेत हे जाणून घ्या. तुम्हाला अलर्जी असेल तर पिऊ नका. अन्यथा तुम्ही हर्बल टी पिऊ शकता.
4. गर्भवती महिलासुद्धा हर्बल टी पिऊ शकतात का?
हो, गरोदर महिलादेखील हर्बल टी पिऊ शकता. फक्त गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी हर्बल टी पिताना सावधानता बाळगायला हवी. त्यातील काही गोष्टींमुळे हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा हर्बल टी पासून दूर राहा.
5. हर्बल टी मुळे वजन कमी होऊ शकतं का?
ग्रीन टी चं नियमित सेवन केल्यास, वजन कमी होतं आणि तुमची जाडीदेखील कमी होते.
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
वजन कमी करण्यासाठी औषध आणि वेट लॉस डाएट चार्ट