हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. खूप जणांना या दिवसात कोरड्या त्वचेचा त्रास सुरु होतो. खूप जणांची त्वचा एरव्ही खूप चमकत असली तरी देखील थंडीत ती निस्तेज दिसू लागते. वातावरणातील या बदलामुळे तुमच्या त्वचेवरही कोरडेपणा आला असेल तर त्वचेला काहीही न लावता केवळ काही सोप्या मसाजच्या पद्धती वापरल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि थंडीतही तुमच्या त्वचेवर एक वेगळा तजेला दिसेल. मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते. त्यामुळेच त्वचेला चांगला ग्लो मिळतो. त्यामुळेच मसाज करणे चांगले गरजेचे असते. जाणून घेऊया सोपे फेस मसाज. या शिवाय हिवाळ्यात त्वचा चमकदार दिसण्यासाठी सोप्या टिप्स
थंडीत त्वचेला येत असेल खाज आणि होत असेल लालसर तर वापरा सोप्या टिप्स
नाक ते चीक बोन्स
हा व्यायाम नाकापासून सुरु करुन ते चीक बोन्सपर्यंत करायचा असते. त्यासाठी तुम्हाला अंगठ्याच्या शेजारचे बोट दुमडून नाकाच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आहे. दोन्ही बोटं तुम्हाला ओठत ओठांच्या बाजूला आणून ती गालांच्या हाडापर्यंत न्यायची आहे. असे करताना तुम्हाला एक प्रेशरच ठेवायचा आहे. खूप जोरात केल्यामुळे तुमची त्वचा लगेच चमकेल असे होणार नाही. त्यामुळे तुम्ही जितका प्रेशर जमेल तितकाच तो लावा. असे सुरुवातीला किमान 5 वेळा करा. त्यानंतर ते वाढवा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक झालेला दिसेल.
सणासुदीला ग्लो आणेल घरगुती फेशिअलचा हा प्रकार
हनुवटीचा मसाज
चेहऱ्यावरील दुसरी चमक ही हनुवटीवर हवी असते.जर तुम्ही हनुवटीचा योग्य मसाज केला तर तुम्हाला हनुवटीही चमकताना दिसेल. वरील मसाज प्रमाणेच तुम्हाला अंगठ्याच्या बाजूचे बोड दुमडून ते हनुवटीच्या मध्यावर ठेवून ते बोट कानाच्या दिशेपर्यंत न्या. असे करताना एकेका बाजूला तुम्हाला ते करायचे आहे. हनुवटीला चांगला दाब मिळाल्यामुळे ज्यांना जॉ लाईन हवी असेल अशांनी हनुवटीचा मसाज करायला हवा. असे सुरुवातीला किमान 5 वेळा करा. त्यानंतर ते वाढवा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक झालेला दिसेल.
गालांचा मसाज
आआता गालांचा मसाज करणे तुम्हाला माहीत असेलच.गालांचा मसाज ग्लो मिळवण्यासाठी करायचा असेल तर तुम्हाला यासाठी हाताच्या तळहाताचा उपयोग करायचा आहे. तळहात घेऊन तुम्ही गालावर ठेवायचा आहे. असे करताना तुम्हाला हात कानांकडून खाली आणि असे करताना तुम्हाला गाल वरच्या दिशेला ओढायचा आहे. त्यामुळे गालांचा मसाज अशा पद्धतीने केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल. ही कृतीही तुम्ही साधारण 5 वेळा करा. त्यानंतर ती वाढवा.
फोरहेड मसाज
कपाळावर खूप वेळा क्रिसलाईन येतात. या क्रिसलाईन तुम्हाला घालवायच्या असतील तर अशावेळी तुम्ही फोरहेड मसाज करायला हवा. फोरहेड मसाज करण्यासाठी तुम्हाला अंगठ्याच्या बाजूची तीन बोटे घ्यायची आहेत. ही बोटं तुम्हाला कपाळावर फिरवायची आहेत. थोडासा दाब देऊन तुम्हाला हा मसाज करायचा आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या फोरहेड म्हणजेच कपाळाच्या क्रिसलाईनमध्ये फरक झालेल जाणवेल. होरहेज मसाज करताना तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे 5 वेळा ही कृती करायची आहे. त्यामुळे नक्कीच ग्लो मिळण्यास मदत होईल.
कोणताही फेस मजात करताना तुम्हाला जर एखादे फेस ऑईल वापरता आले तर फारच चांगले त्यामुळे तुम्हाला मसाज करणे सोपे जाईल.
अधिक वाचा
पार्लरप्रमाणे लव्हेंडर स्क्रब तयार करण्यासाठी या गोष्टींचा करा वापर, जाणून घ्या फायदे