मराठी असो वा अमराठी अनेकांचं मराठी भाषेवर प्रेम हे असतं. महाराष्ट्रात राहणाऱ्या विषेशतः मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता यायला हवी. कमीत कमी जर तुम्हाला मराठी भाषा समजत असेल तरीदेखील तुम्हाला मराठी भाषेचा गोडवा समजू शकतो. मराठी भाषा ही सर्वसमावेशक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण मराठी भाषेत आजकाल अनेक भाषांमधील शब्द मिक्स झाले आहेत. त्यामुळे बोलीभाषेत असे अनेक शब्द आहेत जे लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरत असतात. आतातर हे शब्द इतके लोकप्रिय झाले आहेत की ते या भाषेचाच एक भाग झाले आहेत. शिवाय मुंबईतील अनेक माणसं, तरूण मंडळी त्यांच्या बोलीभाषेत या शब्दाचा सतत वापर करत असतात. यासाठीच जाणून घेऊया मराठीतील काही लोकप्रिय शब्द आणि वाक्यप्रचार.
मराठीतील लोकप्रिय शब्द (Famous Marathi Words List)
महाराष्ट्रात मराठी भाषा प्रत्येक जिल्हा आणि विभागानूसार बदलत जाते. एवढंच नाहीतर ही भाषा बोलण्याची शैलीदेखील वेगवेगळी असते. त्यातील काही शब्द आणि वाक्यप्रचार यांच्यामध्ये इतर भाषेचा मिलाप दिसून येतो.
वाचा – मराठीतील प्रसिद्ध म्हणी
1.लयभारी –
लयभारी हा शब्द रितेश देशमुखच्या लयभारी या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला. मात्र त्याआधीही हा शब्द बोलीभाषेत सहज वापरला जात असे.एखादी गोष्ट खूप छान आहे आहे अथवा अगदी मोठ्या प्रमाणावर आहे असं या शब्दातून व्यक्त होतं.
Giphy
2.आईशप्पथ –
आईशपथ्थ हा शब्द मराठी भाषेत अगदी आवर्जून वापरला जातो. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी हा शब्द वापरला जातो. शपथेवर त्या गोष्टीची सत्यता पटवण्यासाठी असं म्हटलं जायचं. मात्र आजकाल शब्दांचे अर्थ आणि ते वापरण्यामागचं प्रयोजन दोन्ही बदलत चाललं आहे. त्यामुळे हा शब्द आजकाल तरूण मुलं मुली एखाद्या गोष्टीची भव्यता पटवण्यासाठीदेखील वापरतात.
नववधूकरिता खास उखाणे, मराठी उखाणे नवरीचे
Giphy
3. झक्कास –
झक्कास हा शब्द बॉलीवूडचा हिरो अनिल कपूर चित्रपटात सतत बोलताना दिसायचा त्यामुळे आता या शब्दावर त्याचा कॉपीराईटच झाला आहे. म्हणजे प्रत्येत मुलाखतीत त्याला आता झक्कास बोलून दाखवण्यास सांगितले जाते. साधारणपणे झक्कास हा शब्द एखादी गोष्ट किती छान आहे यासाठी वापरला जातो.
Giphy
4. राडा –
राडा म्हणजे थोडक्यात भांडण. मात्र राऊडी म्हणजेच गुंडगिरीच्या बोली भाषेत खूप मोठं भांडण झाल्यास त्याला राडा असं म्हटलं जातं. वास्तविक मुंबईच्या बोलीभाषेत अथवा बंम्बईया भाषेवर गुंड, माफियांच्या भाषेचा पगडा जास्त प्रमाणावर दिसून येतो.
Giphy
वाचा – CID Jokes In Marathi
5. भावा –
आपल्याकडे इतरांना भावंडांप्रमाणे वागणूक देण्याची पद्धत आहे. कधी कधी दोन मित्रांचे एकमेकांवरील पाहून ते एकमेकांचे भाऊ आहेत की मित्र हे कळतही नाही. त्यामुळे मित्राप्रमाणे असलेल्या व्यक्तीला प्रेमाने भावा म्हणायची पद्धत आहे.
Giphy
7. घंटा –
घंटा हा शब्द मराठी बोलीभाषेत बऱ्याचदा वापरला जातो. हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जाऊ शकतो. जसं की, कधी कधी एखादी गोष्ट समोरच्याला समजली नाही की तुम्ही त्याला काहीच कळलं नाही यासाठी याचा वापर करू शकता. तर कधीकधी समोरच्याचं काही ऐकायचं नसेल तरी त्याला या शब्दाने विरोध दर्शवला जातो.
Giphy
8. वटक –
वटक हा शब्द एखाद्याला चल जा असं सांगण्यासाठी वापरला जातो. कारण आधीच म्हटल्याप्रमाणे काही माणसांमध्ये अधिक स्पष्टवक्तेपणा दिसून येतो शिवाय त्यांच्या बोलीभाषेत बेडधकपणाही असतो. अशावेळी एखाद्याला दूर लोटण्यासाठी ते समोरच्याला चल वटक असं म्हणतात.
Giphy
9. जबरी –
जबरी या शब्दाचा अर्थ अगदी मस्त असा आहे. एखादी गोष्ट तुम्हाला फारच आवडली तर ती समोरच्याला पटवून देण्यासाठी जबरी हा शब्द वापरला जातो. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या मनातील भावना पटकन समजू शकतात.
Giphy
10. चिकना –
एखादा मुलगा एखाद्या मुलीला आवडला तर ते सांगण्यासाठी चिकना हा शब्द वापरते. चिकना म्हणजे दिसायला सुंदर असा होतो. वास्तविक हा शब्द तरूण मुली मुलांसाठी बऱ्याचदा वापरतात.
Giphy
11. टवका –
टवका हा शब्दही एखादी व्यक्ती खूप आवडली की ते सांगण्यासाठी वापरण्यात येतो. टवका म्हणजे थोडक्यात रूबाबदार पण मुंबई बोली भाषेत हा शब्द वापरण्याची पद्धत आहे.
Giphy
12. माल –
माल हा शब्दही मुलं अथवा मुली सुंदर आहेत यासाठी वापरला जातो. वास्तविक हा शब्द वापरणं योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याच्या संस्कारांचा प्रश्न आहे. मात्र आजकाल हा शब्द वापरण्यात येतो.
Giphy
13. चिकनी –
जसं एखाद्या मुलासाठी चिकना हा शब्द वापरवला जातो अगदी तसंच मुलींसाठी चिकनी हा शब्द वापरला जातो. चिकनी म्हणजे ती सर्वांमध्ये दिसायला सुंदर आहे असा होतो.
Giphy
14. रापचिक –
रापचिक या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट अतिशय मस्त अथवा छान आहे असा होतो. रापचिक म्हणजे सर्वात छान असादेखील होऊ शकतो. एखादी वस्तू, गोष्ट, व्यक्ती आवडली की तिला रापचिक असं म्हटलं जातं.
Giphy
15. जबराट –
जबराट हा शब्ददेखील एखादी गोष्ट, वस्तू, ठिकाण आवडल्यावर वापरला जातो. जबराट हा शब्द जबरदस्त या मराठी शब्दापासून तयार झालेला असावा.
Giphy
16. ढिनचॅक –
काही शब्दांना कोणताच अर्थ नसतो ते फक्त बोलीभाषेत वापरत वापरत प्रसिद्ध होतात. तसाच हाही शब्द आहे. छान, सुंदर, चांगला या अर्थाने हा शब्द वापरला जातो. एखादी गोष्ट हटके आहे हे सांगण्यासाठी ढिनचॅकचा शब्दप्रयोग केला जातो.
Giphy
17. भेंडी –
एखाद्या व्यक्तीला प्रेमाने रागवण्यासाठी त्या व्यक्तीला भेंडी म्हणतात. वास्तविक भेंडी ही एकप्रकारची भाजी आहे. मात्र सौम्य शब्दात आपल्या प्रक्षोभक प्रतिक्रीया देण्यासाठी आजकाल असे शब्दप्रयोग वापरणं वाढलं आहे.
Giphy
18. झिंगाट –
झिंगाट हा शब्द सैराट या चित्रपटापासून लोकप्रिय झाला असला तरी तो याआधीपासून वापरला जातो. झिंगाट या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टींची नशा चढणं असा होतो. झिंगाट शब्द एखाद्या गोष्टींची झिंग येणं यापासून तयार झालेला आहे.
Giphy
19. सैराट –
सैराट हा शब्द पिसाटलेला अथवा एखाद्या गोष्टीने वेडापिसा होणे असा आहे. सैराट चित्रपटातून प्रेमात वेडे झालेल्या प्रेमवीरांची कथी दाखवण्यात आली होती. सैराट हा शब्द तेव्हापासून प्रसिद्ध झाला.
Giphy
20. फालतू –
फालतू हा शब्द एखाद्या शुल्लक अथवा बिनकामाच्या गोष्टीसाठी वापरला जातो. जी गोष्ट तुमच्या काहीच कामाची नसते तिच्यासाठी फालतू हा शब्दप्रयोग केला जातो. एखादी गोष्ट तुमच्या दृष्टीने नगण्य असणं हादेखील यामागचा अर्थ असू शकतो.
Giphy
मराठीतील लोकप्रिय वाक्यप्रचार (Famous Marathi Phrases List)
मराठीत काही शब्द जसे प्रसिद्ध आहेत तशीच काही वाक्य अथवा वाक्यप्रचार आहेत. जे बोलीभाषेमुळे आज जवळजवळ लोकांच्या तोंडवळणीच पडले आहेत.
1. काहिही हा –
होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून या शब्द प्रयोगाला सुरूवात झाली. या मालिकेतील एका पात्राला सतत काहिही हा असं म्हणायची लकब होती. ज्यामुळे पुढे यावर अनेक मीम्स आणि जोक्स निर्माण झाले. तेव्हापासून एखादी गोष्ट अती वाटली किेंवा पटली नाही की काहिही हा असंं म्हटलं जातं.
Giphy
2. घेऊन टाक –
एखाद्या व्यक्तीला चढवण्यासाठी अथवा आव्हान देण्यासाठी हा वाक्यप्रयोग वापरला जातो. एखाद्या मित्राला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देताना ‘चल घेऊन टाक’ असं म्हणायची पद्धत आहे.
Giphy
3. आता माझी सटकली –
अजय देवगनच्या आता सिंघम चित्रपटापासून आता माझी सटकली हा वाक्यप्रचार प्रचलित झाला. जर एखाद्याला खूप राग आला तर तो व्यक्त करण्यासाठी आता माझी सटकली असं बोललं जातं. सहनशक्तीचा अंत होणं या अर्थानेदेखील हा शब्द वापरला जाऊ शकतो.
Giphy
4. चिपडेपणा करू नको –
एखादी गोष्ट सतत स्वस्तातली विकत घेणं अथवा अती कंजूषपणा करणं या अर्थाने चिपडेपणा हा शब्द वापरला जातो. अती कंजूष व्यक्तीला चिपडा असं म्हटलं जातं. हा शब्द इंग्रजीतील चिप या शब्दापासून निर्माण झाला असावा.
Giphy
5. नाय नो नेव्हर –
नाय नो नेव्हर हा शब्द प्रयोग बऱ्याचदा अगदी ठासून नाही म्हणण्यासाठी वापरला जातो. नाय नो नेव्हर यात मराठी आणि इंग्रजी भाषेचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. तीन वेळा नाही म्हणणे म्हणजे काहिही झालं तरी नाहीच असा होतो.
Giphy
6. डोक्याला ताप देऊ नको –
डोक्याला ताप हा शब्द चिंता अथवा काळजी या अर्थाने वापरण्यात येतो. बऱ्याचदा जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला डोक्याला ताप देऊ नको असं म्हटलं जातं.
Giphy
7. सुमडीत कोंबडी –
सुमडीत या शब्दाला असा विशिष्ठ काहीच अर्थ नाही. कारण हा वाक्यप्रचार एखादी गोष्ट कोणाला सुगावा लागू न देता करणं या अर्थाने वापरली जाते. जर तुम्हाला एखादी गोष्ट कोणालाही न सांगता करायची असेल तर त्याला सुमडीत कोंबडी करणं असं म्हटलं जातं.
Giphy
8. शांतीत क्रांती –
क्रांती ही प्रत्येकवेळी संघर्ष अथवा लढा देऊनच होते असं नाही. बऱ्याचदा शांत राहूनही अनेक क्रांतीकारक गोष्टी केल्या जातात. हा शब्द प्रयोग मात्र कधी कधी शांत राहून एखादी विध्वंसक गोष्ट करण्यासाठीदेखील वापरला जातो.
Giphy
9. आयच्या गावात –
काही लोकांना शब्दा शब्दाला आयच्या गावात, आयचा घो असं बोलायची सवय असते. या शब्दांचा आणि त्यांच्या बोलण्याचा तसा काहीच संबंध नसतो. मात्र अचानक काही आठवल्यावर अथवा विसरल्यावर मत व्यक्त करण्यासाठी जोरात असं म्हटलं जातं.
Giphy
10. सैराट झालं जी –
सैराट चित्रपटात सैराट झालं जी हे गाणं होतं तेव्हापासून हा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. सैराट म्हणजे वेड लागणं. एखाद्याने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्याला चिडवण्यासाठी सैराट झालं जी असं म्हटलं जातं.
Giphy
11. फुल टू धम्माल –
फुल टू धम्माल म्हणजे टोटल धम्माल असा आहे. एखाद्या गोष्टीने तुमचं निखळ मनोरंजन झालं की त्या गोष्टीला फुल टू धम्माल असं म्हटलं जातं.
Giphy
12. नानाची टांग –
नानाची टांग या वाक्यप्रयोगालादेखील विशेष कोणताच अर्थ नाही. मात्र एखाद्या व्यक्तीवर राग काढण्यासाठी त्याला कोणतीही शिवी न देता सौम्य शब्दात तुझ्या नानाची टांग असं म्हटलं जातं.
Giphy
13. तुमच्यासाठी काहीपण –
एखाद्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार होणं या अर्थाने हे वाक्य वापरलं जातं. एखाद्यासाठी जीवाची बाजी लावणं यासाठी तुमच्यासाठी काहीपण असं म्हटलं जातं.
Giphy
14. हाय काय नाय काय –
हे एक वाक्य अनेकांच्या तोंडवळणी पडलेलं असतं. वास्तविक जास्त चिंता काळजी न करता आहे त्यात समाधानी राहणं हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र कोणत्याही कारणासाठी हे वाक्य आजकाल वापरण्यात येतं.
Giphy
15. एकदम भारी
एखादी गोष्ट खूप छान आहे हे सांगण्यासाठी आजकाल एकदम भारी अथवा जगात भारी असं म्हटलं जातं. सर्वात छान असा त्याचा अर्थ होऊ शकतो.
फोटोसौजन्य – जिफी
अधिक वाचा –