2020 सालातील सगळ्यात झटका देऊन गेलेली घटना म्हणजे अभिनेता सुशांत राजपूतची आत्महत्या. यशाच्या शिखरावर असताना आणि मेहनतीने या अभिनेत्याने आपले नाव कमावलेले असताना अचानक असे काय झाले की, त्याला आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न आजही अनेकांना पडला आहे. त्याला जाऊन आता सहा महिने झाले आहेत. पण ही जखम आजही ओली आहे असेच वाटते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा आज 35 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सुशांतची आठवण पुन्हा एकदा सगळ्यांना झाली आहे. सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुशांत सिंह राजपूतवर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने त्याच्या करिअर आणि न उलगडलेल्या मृत्यूची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
ऐश्वर्या रायची कॉपी मानसी नाईकने लग्नातही केला ऐश्वर्याचा जोधा लुक
मोठी स्वप्न पाहायचा सुशांत
सुशांत सिंह राजपूतने त्याचा प्रवास मालिकांमधून सुरु केला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत त्याने काम केले होते. पण उत्तम अभिनयामुळे त्याला मालिकेनंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये तो धोनीच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर त्याला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे तो एका रात्रीत सुपरस्टार झाला. एका मागोमाग एक उत्तम चित्रपट कर त्याने स्वत:ला सिद्ध केले. अत्यंत हुशार आणि अभ्यासू असा या कलाकाराची खूप मोठी स्वप्न होती. अभिनेता म्हणून कधी चालला नाही तर दुसरे काय काम करायचे हे देखील त्याने ठरवून ठेवले होते. उंची स्वप्न पाहणारा हा कलाकार उंचीचे लाईफ जगण्याचेही स्वप्न पाहायचा.
फॅन्सनी दिल्या भावूक शुभेच्छा
आज सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवस आहे म्हटल्यावर त्याला शुभेच्छा या द्यायलाच हव्यात. त्याच्या फॅन्सनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जात त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर केला आहे.त्याच्याप्रती असलेल्या भावना या व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे अगदी काल 12 वाजल्यापासून सुशांत सिंह राजपूतच्या नावाचीच चर्चा सगळीकडे केली जात आहे.
Good News: अभ्या अर्थात समीर परांजपे झाला बाबा, कन्यारत्नाचा जन्म
Happy Birthday to the kind hearted man #SushantSinghRajput. You left us too early. But we always remember you. Hope you are in a more beautiful world now.
There are still some mysteries to be unraveled. Prayers to get Justice soon #HappyBirthdaySSR #HBDSSR #SushantDay pic.twitter.com/s3z8t1yLwL
— Vishnuvardhan P Menon (@VishnuvpmSinger) January 21, 2021
miss you dear @itsSSR
miss your voice,miss your smile, miss your face , miss your kind heart.. Missing your angelic soul :')
You will be Remembered always!!
Unforgetable, never 💔
You are the best! Stay blessed!#SushantDay #SushantSinghRajput #SushantBirthdayCelebration pic.twitter.com/ILU7IPPedf— Aya Ellaien (@aya_ellaien) January 20, 2021
Although you aren’t here to celebrate 🎉 🥳 it with us, I know that you’re getting a birthday serenade from the angels👼🧚🏻🧚🏻♀️.
Sending my best to you.❤️🎂We love and miss you dearly #SushantSinghRajput ❤️#SushantDay #HappyBirthdaySSR pic.twitter.com/ust9oHlX3E
— Ankita Khandare (@I_WRITENOTHING) January 20, 2021
अनेकांवर संशयाची सुई
सुशांत सिंह राजपूत त्याच्या वांद्रे येथील घरात मृतावस्थेत आढळला होते. त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. पण तो आत्महत्या करु शकत नाही. त्याची हत्या झाली असा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर या घटनेल वेगळेच वळण मिळाले. सुशांतच्या खूनाचा तपास करण्यासाठी त्याची तथाकथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली.चौकशीअंती या प्रकरणात सुशांतच्या मृत्यूचे गूढ उलगडायचे सोडून एक ड्रग्ज रॅकेट सोर आले. सुशांत हा ड्रग्जच्या विळख्यात अडकला होता अशी माहिती रियाने दिल्यानंतर खळबळ माजली होती. रियासोबत तिच्या भावालाही यामध्ये अटक करण्यात आली होती. त्यामुळे आत्महत्यापासून पुढे जात या प्रकरणाने फार वेगळेच वळण घेतले.
मानसी नाईकच्या लग्नानंतर सुरू झाली आता सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची लगबग
सुशांतला मिळावा न्याय
आजही सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळाला अशी अपेक्षा करत आहेत. त्यांना आजही असे वाटते की, सुशांतला आता तरी न्याय मिळेल. त्यामुळे अजूनही सुशांतची ही मोहीम अजूनही सुरु आहे.
सुशांतला POPxo मराठीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!