ADVERTISEMENT
home / Dad
fathers day kavita

50+ Fathers Day Poem In Marathi | वडिलांवर कविता आणि चारोळ्या 2022

‘बाबा’ हा शब्द उच्चारल्यानंतर ज्याला सगळ्यात जास्त आनंद होतो अशी व्यक्ती म्हणजे आपले वडील असतात. पण वडिलांवर कविता करण्याचा तुम्ही विचार केला आहे का? मग पितृदिनाच महत्त्व (Father’s Day Information In Marathi)जाणून यंदा 19 जून रोजी हा दिवस साजरा केला जाईल. या दिवशी पितृदिनाच्या शुभेच्छांसोबत वडील चारोळ्या (father’s day marathi kavita), माझे बाबा कविता (father’s day poem in marathi) त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि त्यांचा आनंद द्विगुणित करा.

फादर्स डे साठी खास कविता | Fathers Day Poem In Marathi

फादर्स डे साठी खास कविता | Fathers Day Poem In Marathi

Marathi Kavita Baba

फादर्स डेच्या याच निमित्ताने तुम्ही लाडक्या बाबांना (father’s day poem in marathi)जर काही कविता पाठवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही निवडक कविताही शोधून काढल्या आहेत. ज्या कविता पाठवून तुम्ही लाडक्या बाबांचा दिवस एकदम आनंदी करु शकता. वडिलांवर कविता या नेहमी खासच असायला हव्यात. तुम्हीही तुमच्या लाडक्या बाबांना या कविता पाठवू शकता.

  • स्वत: टपरा मोबाईल वापरुन,
    तुम्हाला स्टायलिश मोबाईल,
    घेऊन देतो, तुमच्या प्रीपेडचे पैसै
    स्वत: भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी
    जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो,हॅपी फादर्स डे!
  • ज्यांचा नुसता खांद्यावर
    हात जरी असला,
    तरी समोरच्या संकटांना,
    लढा देण्याची प्रेरणा मिळते,
    अशा माझ्या बाबांना, हॅपी फादर्स डे!
  • वडील म्हणजे एक अशी व्यक्ती,
    जी तुम्हाला जवळ घेते,
    जेव्हा तुम्ही रडता,
    तुम्हाला ओरडते,
    जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
    तुमच्या यशाचा आनंद साजरा करते,
    जेव्हा तुम्ही जिंकता,
    आणि तुमच्यावर विश्वास ठेवते,
    जेव्हा तुम्ही हरता,
    हॅपी फादर्स डे!
  • ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,
    त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,
    कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,
    कारण बाप असतोच जीवनाचा आधार,
    पितृदिनाच्या शुभेच्छा!
  • बाबा, तुम्ही आहात म्हणून
    माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,
    माझ्या यशाची चमक जेव्हा मला
    तुमच्या डोळ्यात दिसते,
    तेव्हा मी भरुन पावतो,
    अशा माझ्या बापमाणसाला हॅपी फादर्स डे!
  • शोधून मिळत नाही पुण्य,
    सेवार्थाने व्हावे लागते धन्य,
    कोण आहे तुझविणं अन्य?
    ‘बाबा’
    तुजविण माझं जग आहे शून्य, हॅपी फादर्स डे!
  • माझ्या आयुष्यात जी श्रीमंती आहे,
    ती केवळ तुमच्यामुळे आहे,
    माझ्या जगण्याला अर्थ आहे,
    तो केवळ तुमच्यामुळे आहे,
    माझे जे अस्तित्व आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे,
    माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेसाठीच आहे,
    हॅपी फादर्स डे!
  • काय हो बाबा इतक्या अडचणी आल्या,
    तरी तुम्हाला मी काही रडताना पाहिले नाही,
    कधीही ढासळून आमची साथ तुम्ही कधीही सोडली नाही,
    घेऊन जबाबदाऱ्या तुम्ही झालात आमच्या जीवनाचे
    बापमाणूस,
    तुमच्या स्तुतीलाही आज शब्द अपुरे काय सांगू आज, हॅपी फादर्स डे!
  • वडील म्हणजे अशी एक व्यक्ती
    जी तुम्हाला जवळ घेते,
    तुम्हाला ओरडते,
    जेव्हा एखादी चूक तुम्ही करता,
    तुमच्या यशाचा आनंद
    साजरा करता,
    आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते,
    जेव्हा तुम्ही हरता,
    हॅपी फादर्स डे!
  • बाबा अचानक निघून गेला..
    खूप बोलायचं राहूनच गेलं, व्यक्त व्हायचं राहून गेलं, 
    बराच रागीट आणि तितकाच प्रेमळ बाबा, 
    शिस्त लावणारा आणि मी लवकर घरी नाही आले तर काळजीने व्याकुळ होणारा,
    लाडाने पिंट्या हाक मारणारा आणि मी चिडल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद आजही डोळ्यातून जात नाही,
    मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
    स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
    तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा,
    तुमचा तो प्रत्येक गुण आणि दोष माझ्यात असल्याचा सार्थ अभिमान आहे,
    तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
    कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
    माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे,
    माहीत आहे तुम्ही परत नाही येणार पण माझ्या प्रत्येक गोष्टीत बाबा नक्की असणार,
    ज्यांना असतो बाबा कदाचित त्यांना पर्वा नसते, पण खरंच सांगते, बाप हा बाप असतो,
    वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो,
    आजही लोकांच्या मुलांना बापाबद्दल बोलताना पाहून जीव गलबलतो,
    वाटतं अजूनही अचानक डोक्यात टपली मारून माझी कळ नक्की काढेल बाबा,
    ती माया, ते प्रेम, तो सहवास, मी दूर जाताना डोळ्यात आलेलं पाणी लपवण्याचा प्रयत्न कधी लपलाच नाही, 
    माझ्यातून मी कधी तुम्हाला दूर होऊ दिलंच नाही, 
    शेवटच्या क्षणीदेखील तुमचा हात घट्ट पकडला होता आणि अजूनही त्याच आधारावर आयुष्य काढायची ताकत तुम्ही दिलीत,
    बाप नक्की कसा असावा तर तुमच्यासारखा…हॅपी फादर्स डे!
    – दिपाली नाफडे..

वाचा – happy fathers day quotes in marathi

ADVERTISEMENT

वडील चारोळ्या | Fathers Day Charolya In Marathi

वडील चारोळ्या | Fathers Day Charolya In Marathi

Father’s Day Poem In Marathi

कधी कधी भावना व्यक्त करणे हे महत्वाचे असते. कमीत कमी शब्दातही बाबांवर असलेले प्रेम व्यक्त करता येते. आपल्या लाडक्या बाबांसाठीच काही खास चारोळ्या शोधून काढल्या आहेत. ज्या बाबांवरील प्रेम व्यक्त करण्यास पुरेशा आहेत. फादर्स डे कोट्स पाठवूनही तुम्ही भावना व्यक्त करु शकता.

  • डोळ्यात न दाखवताही
    जो आभाळाइतकं प्रेम करतो
    त्याला वडील नावाचा
    राजा माणून म्हणतात, हॅपी फादर्स डे!
  • बाबा तुमचा प्रत्येक शब्द,
    माझ्या लक्षात आहे, बाबा
    माझा प्रत्येक आनंद हा
    तुमच्याशिवाय अपूर्ण आहे,हॅपी फादर्स डे!
  • ज्यांचं न दिसणार प्रेम
    आम्हाला भरभरुन प्रेम देतं,
    अशा माझ्या वडिलांना,
    हॅपी फादर्स डे!
  • प्रत्येक वेळी खाली पडल्यावर
    जो मला उचलतो, तो माझा बाबा,
    चुका केल्यावर ओरडतो,
    पण तरीही सावरुन घेतो, तो बाबा असतो,
    हॅपी फादर्स डे!
  • बाबा, दणकट बाहू आहेत तुमचे,
    सांगा कसा बरं खाली पडेन,
    तुम्हीच माझा आधारवड,
    शेवटपर्यंत तुम्हाला मी जपेन,हॅपी फादर्स डे!
  • कोडकौतुक वेळप्रसंगी,
    धाकात ठेवी बाबा,
    शांत प्रेमळ कठोर,
    रागीट बहुरुपी बाबा,हॅपी फादर्स डे!
  • आपले दु:ख मनात लपवून,
    संपूर्ण परिवाराची काळजी करणारा,
    काही कमी नको पडायला म्हणून
    स्वत:च्या इच्छा आकांक्षा मागे ठेवणारा,
    असतो तो बापमाणूस, हॅपी फादर्स डे!
  • आकाशालाही लाजवेल अशी उंची
    आणि आभाळालाही लाजवेल असे,
    कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ‘बाबा’,
    हॅपी फादर्स डे!
  • बाप आहे तोपर्यंत परिस्थितीचे काटे,
    कधीच आपल्या पायापर्यंत पोहोचत नाहीत,
    हॅपी फादर्स डे!
  • खिसा रिकमा असला जरी,
    नाही कधी म्हणाले नाही,
    माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत,
    मी कुणी पाहिला नाही, हॅपी फादर्स डे!

फादर्स डे युनिक गिफ्ट आयडियाज (Father’s Day Gift Ideas In Marathi)

माझे बाबा कविता | Marathi Kavita Baba

माझे बाबा कविता | Marathi Kavita Baba

Marathi Kavita Baba

ADVERTISEMENT

खूप जणांचे बाबासोबत एकदम जवळचे नाते असते. बाबा म्हणजे त्यांचा मित्रच असतो. असा बाबा तुमच्यासाठी किती खास आहे हे तुम्ही दाखवून द्यायला हवे.त्यासाठीच काही कविता (father’s day poem in marathi) संकलित केल्या आहेत. या शिवाय बाबांना फादर्स डे कोट्स पाठवूनही तुम्ही हा आनंद देऊ शकता. पाठवा माझे बाबा कविता

  • आम्ही आयुष्यभर सावली
    राहावे म्हणून स्वत: आयुष्यभर,
    उन्हात झिजला
  • कधी स्वत: उपाशी राहून,
    आम्हाला अन्नाचा घास भरवला,
    अशा आमच्या वात्सल्य मूर्तीला, हॅपी फादर्स डे!
  • जग दाखवलं तुम्ही,
    खेळायला शिकवलं तुम्ही,
    हातात हात घेऊन चालायला
    शिकवलं तुम्ही,
    लहानपणी धाक दिला तुम्ही,
    पण प्रसंगी प्रेमाचा हातही फिरवला तुम्ही
    अशा माझ्या बाबांना हॅपी फादर्स डे!
  • तो कधीही स्तुती करत नाही,
    तो बढाई मारणारा नाही,
    माझा बाप मला नको ती स्वप्न
    दाखत नाही,
    तो म्हणतो मेहनत कर
    आणि खा कष्टाची भाकर
    मगच तुला कळेल बाप होणं काय असतं,हॅपी फादर्स डे!
  • माझे बाबा आहेत प्रेमाचा एक अतूट झरा,
    कधी रागावतात कधी चिडतात पण जवळही घेतात,
    माझे बाबा आहेत एक सावली,
    सतत सोबत चालणारी भासली नाही तरीही
    आजुबाजूला जाणवणारी,हॅपी फादर्स डे!
  • न बोलता प्रेम करतो,
    न सांगता आधार देतो,
    न थकता कष्ट करतो,
    न दाखवता सहन करतो,
    तो फक्त माझा बाप असतो, हॅपी फादर्स डे!

वाचा – नात्याची प्रत्येक भावना मांडणारे (Relationship Quotes In Marathi)

पितृ दिनाच्या कविता खास मुलाकडून | Fathers Day Poem In Marathi From Son

पितृ दिनाच्या कविता खास मुलाकडून | Fathers Day Poem In Marathi From Son

माझे बाबा कविता

मुलाचे आणि बाबाचे नाते फारच वेगळे असते. बरेचदा बाबा हे मुलाचे खास मित्र असतात. तर कधी कधी बाबांसोबतही काहीचे पटतही नाही. पण आपले वडील आपल्याला का ओरडतात याचा विचार केल्यानंतर आणि त्या मागील त्यांची भावना कळल्यानंतर त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केल्यावाचून राहता येत नाही. जाणून घेऊया अशा काही कविता खास मुलांसाठी त्यांच्या लाडक्या बाबांना

ADVERTISEMENT
  • कितीही हो ओरडता बाबा,
    आता त्याची किंमत कळते,
    तुमच्यामुळेच आज प्रगती झालेली दिसते,
    कायम असेच राहा पाठीशी, मिळतो तुमचा आधार
  • तुम्ही मला सतत ओरडता असे मला आधी कायम वाटायचे,
    पण आता कळते त्या ओरड्यामागे तुमचे प्रेम किती दडलेले होते,
    मी ही होईन असाच चांगला बाबा, पितृदिनाच्या शुभेच्छा!
  • आठवतं का बाबा सकाळी उठून तुम्ही मला पार्कात घेऊन जायचा,
    माझ्यासोबत खेळता खेळता तुम्ही बाबाचे मित्र व्हायचा,
    तोच मित्र मला हवा माझ्यासोबत कायम, लव्ह यू बाबा
  • बाबा हे अगदीच वेगळे रसायन असते,
    त्याच्या ओरडण्याला काहीच सीमा नसते,
    पण प्रेमाचा पूर आला तर मात्र प्रेमरसात बुडायला होते,
    पितृ दिनाच्या शुभेच्छा!
Marathi Kavita Baba

Marathi Kavita Baba

मुलीकडून बाबांना फादर्स डेच्या कविता | Fathers Day Poem In Marathi From Daughter

बाबांच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे मुलगी.. मुलीवर त्यांचे जिवापाड प्रेम असते. मुलगी घराबाहेर पडली तरी त्याच्या जीवाला नुसता घोर लागलेला असतो. त्या त्यांच्या नजरेसमोर नसतील तर ते अस्वस्थ होतात. अशा लाडक्या बाबांपासून दूर गेल्यानंतर मुलींना त्यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. अशा लाडक्या बाबांना मुलीकडून खास कविता.

मुलीकडून बाबांना फादर्स डेच्या कविता | Fathers Day Poem In Marathi From Daughter

माझे बाबा कविता

  • देव देवळात नाही,
    तो माझ्या बाबांमध्ये आहे,
    अशा माझ्या लाडक्या बाबांना
    पितृदिनाच्या शुभेच्छा!
  • बाबा घर तुमचे सोडून
    कितीही दिवस झाले तरी,
    तुमची आठवण आल्यावाचून राहात नाही,
    बाबा तुमच्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.
  • आई नाही म्हणते तेव्हा,
    बाबा एकमेव हा म्हणायला असतो,
    बाबा तुमची जागा मुलीच्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही,
    माहीत आहे ना तुम्हाला… मग तुम्ही मला फोन का करत नाही.
  • बाबांचे लाडाचे रुप म्हणजे मुलगी,
    पण बाबा तुमच्या रुपाने मला मिळाला एक चांगला मित्र,
    कोणी सोबत नसले तरी मला मिळावी तुमची साथ
    बाबा म्हणून तुम्ही मला मिळावे जोपर्यंत असे आयुष्याची साथ
  • माझी स्तुती करुन कधीही न थांबणारी
    व्यक्ती म्हणजे ‘बाबा’
    बाबा म्हणून तुम्ही मला लाभलात हे आहे माझे भाग्य
    तुमच्याशिवाय नाही माझ्या आयुष्याला अर्थ,
    बाबा तुम्हीच आहात माझ्या जीवनाचा खरा अर्थ

पुढे वाचा –

ADVERTISEMENT

Fathers Day Status in Hindi
मराठी प्रेम कविता चारोळ्या (Marathi Prem Kavita Charolya)

बाबांवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच बाबांना पाठवा या सुंदर कविता आणि व्यक्त करा आपले प्रेम

Father's Day Poem In Marathi

Father’s Day Poem In Marathi

16 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT