नात्याची प्रत्येक भावना मांडणारे (Relationship Status In Marathi)

नात्याची प्रत्येक भावना मांडणारे (Relationship Status In Marathi)

मित्र-मैत्रिणींनो….आयुष्यात एकटं राहणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला देवाने काही नाती जन्म होण्याआधीच दिली आहेत आणि काही जन्मल्यानंतर, पण ही नाती टिकवणं फक्त आपल्या हातात आहे. आज या नात्यांतील प्रत्येक भावना मांडणारे काही relationship कोट्स आणि स्टेट्स या लेखात मांडणार आहोत. जे तुम्हाला तुमच्या नात्यांबाबतच्या भावना व्यक्त करण्यास नक्कीच मदत करतील.  

Table of Contents

  कपल्स कोट्स वॉट्सअपवर ठेवण्यासाठी (Couple Quotes For Whatsapp Status)

  Instagram

  क्युट कपल्स हमखास आपल्या पार्टनरसाठी खास वॉट्सअप स्टेटस ठेवतातच. मग तुम्हीही नक्की ठेवा हे क्युट कोट्स तुमच्या पार्टनरसाठी.

  • सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा.
  • आज पाऊस पण बेभान कोसळत होता आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत.
  • आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सकाळचा चहा तिच्या हातचा पाहिजे.
  • वेगवेगळ्या छत्र्यांपासून एकाच छत्रीमधला दोघांचा प्रवास म्हणजे प्रेम.
  • तुला पाऊस आवडतो आणि मला पावसात भिजताना तू.
  • माझ्याशी चॅट करताना जर तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर समजून जा प्रेमात पडली आहेस तू माझ्या.
  • तू कसाही असलात तरी माझा आहेस.
  • आयुष्यात कायम सोबत राहा कारण जिथे तू नाहीस तिथे मी काहीच नाही.
  • कितीही उकाडा असला तरी मला तू माझ्या मिठीत पाहिजे.
  • का आवडतेस माहीत नाही पण खूप आवडतेस.
  • जिच्या पाठी अख्खा गाव ती मलाच देते भाव.

  सकारात्मक विचारांच्या फायद्यांविषयी देखील वाचा

  क्युट रिलेशनशिप कोट्स (Cute Relationship Quotes)

  तुम्ही कोणासोबत क्युट रिलेशनशिपमध्ये आहात का, मग नक्की वाचा हे क्युट रिलेशनशिप कोट्स….

  • काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणे विसरून एक छान स्माईल देतात.
  • तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर तुझी आठवण अजूनच येते.
  • रात्रीचा अंधार मला विचारत होता कुठे गेली ती रात्रभर बोलणारी क्युट मुलगी
  • जे प्रेमात योग्य आहे, ते खरंच करण योग्य आहे.
  • तुझ्या आठवणीत रात्रभर जागण्याची सवय झाली आहे आता.
  • तुझा प्रत्येक सेल्फी मी सेव्ह करून ठेवतो तुझी आठवण आल्यावर बघायला.
  • तुला चोरून बघण्यात एक वेगळीच मज्जा आहे.
  • मुलींची cute smile म्हणजे त्यांचं खरं सौंदर्य.
  • कॉफी पिणारी डोळ्यांना आवडते आणि चहा पिणारी थेट हृदयाला
  • ती फक्त एक लुक देते आणि मग मला रात्रभर झोप येत नाही.

  वाचा - व्हाट्सएपसाठी भावनिक स्थिती

  नव्या नात्याची व्याख्या सांगणारे (New Relationship Quotes)

  Instagram

  नव्या नात्यात कसं सगळं अगदी गोग्गोड असतं नाही का, पहिली भेट, पहिली मिठी...अशा नव्या नात्यातली ओढ व्यक्त करणारे काही कोट्स खास तुमच्यासाठी. 

  • भिऊ नकोस जान आपण प्रेम केलंय चोरी नाही केली. 
  • देवा प्रत्येक जन्मी तोच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असू दे.
  • नव्या नात्याचा आनंद म्हणजे एकत्र अनेक क्षण जगणं, अनुभवणं आणि मग त्या आठवणं
  • एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यातील जादू ओळखणं जी इतरांना दिसत नाही. 
  • तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व मला फारच आवडतं, तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी जणू बोनस आहे. 
  • माझ्या चेहऱ्यावरील अनेक हास्य तुझ्यापासून सुरू होतात. 
  • माझ्यासाठी हे  love at first sight नव्हतं कारण मी पूर्ण पाच मिनिटं घेतली होती. 
  • मला फक्त तुझी सोबत आणि काही सूर्यास्त हवे आहेत.
  • आपण दोघंही कोणालाच आवडत नाही फक्त आपल्याशिवाय. 
  • तुझं माझ्या हृदयात ते स्थान आहे जे कोणीही दुसरं घेऊ शकत नाही.

  उत्कृष्ट दृष्टीकोन स्थितीबद्दल देखील वाचा

  मजेदार रिलेशनशिप स्टेट्स (Funny Relationship Status)

  Instagram

  प्रत्येक नात्याची रंगत वाढते ती humor ने. जर तुम्हीही स्वभावाने फनी असाल तर नक्की ठेवा हे फनी रिलेशनशिप स्टेटस. 

  • काही मुली माझ्या पोस्ट्स फक्त त्यांच्या बॉयफ्रेंडमुळे लाईक करत नाहीत.
  • जसा कपलवाल्यांचा पोरींवर तसा माझा झोपेवर लय जीव आहे.
  • तुझ्या लिपस्टिकची टेस्ट पाणीपुरीसारखी आहे थोडीशी गोड थोडीशी तिखट 
  • मला एक अशी मैत्रीण भेटावी तिने माझी सेटींग तिच्या मैत्रिणीबरोबर लावावी
  • जी आपल्यावर विश्वास ठेवून मोबाईल नंबर देते ती आपली खास मैत्रीण असते. 
  • इथे मुली माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत आणि घरच्यांना वाटतं मी लव्ह मॅरेज करावं.
  • हल्ली लोकांना प्रेम कमी आणि छपरी चाळे जास्त आवडतात. 
  • हाताने रंग लावणाऱ्या खूप आहेत पण ओठाने गालावर लिपस्टिकचा रंग लावणारी तूच 
  • स्वप्नात येऊन रोजच त्रास देतेस कधीतरी खऱ्या आयुष्यात पण ये.
  • तू फक्त स्माईल देतेस आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो.

  महिलांसाठी खास मराठी उखाणे (Marathi Ukhane for Female)

  प्रत्येक नात्यातल्या या स्टेजसाठी खास (Sad Relationship Status In Marathi)

  नातं म्हटलं की, सुख-दुःखही आलंच नाही का, तुमच्याही नात्यात सध्या ही फेज असेल तर ठेवा हे Sad Relationship status. 

  • नाती जोडणं सोपं असतं, पण नाती निभावणं कठीण असतं.
  • स्वच्छ मनाच्या माणसांना नेहमीच रिलेशनशिपमध्ये धोका मिळतो
  • आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करून कोणीही वारंवार नातं निभावू नये.
  • काही नाती आपला भ्रम असतात आणि काही नाती आपल्या भ्रमाचा भोपळा फोडतात.
  • प्रेम आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं दीर्घकाळापर्यंत टिकत नाही. 
  • कोणतंही relationship परफेक्ट नसतं कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार हे ठरलेलेच असतात.
  • आपण कधीतरी त्या व्यक्तीला विसरून जातो, जी जगात सगळ्यात जास्त आपल्याला मानत असते. 
  • जर तुम्हाला एखाद्याशी दीर्घ काळापर्यंत नातं टिकवायचं असेल तर त्याच्याशी समोरासमोर तुमच्या तक्रारी व्यक्त करा. 
  • चांगले संबंध हे तुटू शकतात पण विसरता येत नाहीत.
  • कोणतंही नातं तोडण्याआधी एकदा थंड डोक्याने विचार नक्की करावा.

  बेस्ट रिलेशनशिप कोट्स (Best Relationship Quotes)

  Instagram

  कधी कधी एखाद्याला नात्याची व्याख्या समजावून सांगावी लागते तेव्हा हे बेस्ट रिलेशनशिप कोट्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. 

  • एका चांगल्या relationship मध्ये आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्यातील गुण-दोषांसकट स्वीकार करतो. 
  • प्रेम हे दिल्याने वाढतं म्हणतात पण आजकालच्या मुलींना हे कधी समजणार काय माहीत. 
  • दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावंस वाटतं. 
  • अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे प्रेम. 
  • लागलं वेड तुझ्या प्रेमाचं... प्रेम तुझं देशील का? 
  • जिथे प्रेम असतं तिथे निरागसातही असते. एक चांगल मन नेहमी निर्मळ असतं. 
  • कोणावरही प्रेम केलं तर असं करा की, कधीही तुम्हा दोघांच्या प्रेमात दुरावा येणार नाही. 
  • आयुष्यात अशी खूप कमी लोक भेटतात जी तुम्हाला खरोखरच मानतात. त्यामुळे चुकूनही त्यांना दूर करू नका. 
  • जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करावा. नाहीतर तो दुरावा वाढतच जातो. 
  • जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य बनवाल तेव्हा तुमचं आयुष्यही चांगल बहरत जाईल.

  लांब पल्ल्याच्या संबंधात करण्याच्या गोष्टी

  खऱ्या नात्यांसाठी (Real Relationship Quotes)

  काही नात्यांना व्यक्त करण्याची गरज नसते तर कधी कधी काही नात्यांना रिलेशनशिपबाबत व्यक्त व्हावं लागतं. त्यासाठी खास true relationship quotes.

  • प्रेम आणि आपलेपण हे relations मध्ये खत आणि पाण्याचं काम करतात. 
  • सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये दोन व्यक्ती काहीही न बोलता एकमेकांच्या मनातल समजून घेतात. 
  • आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात, ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते. 
  • एकतर्फी संबंध कधीही जास्त काळ निभावता येत नाहीत. 
  • ती नाती अनमोल असतात, जिथे समोरची व्यक्ती कोणत्याही अपेक्षेविना तुमची सोबत करते. 
  • गैरसमज ही किड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते. म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करावेत. 
  • अंधविश्वास कधीही चांगला नसतो. ही गोष्ट नात्यांनाही लागू होते. त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. 
  • चांगल्या आणि खऱ्या नात्यांना ओळखण्याची कला शिका. ही छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य सुखकर बनवेल. 
  • जिथे अविश्वास आणि व्देष असतो तिथे कोणतंही नातं नसतं. 
  • गोड-गोड गोष्टी कोणीही करू शकत पण जोपर्यंत त्या सत्यात उतर नाहीत तोपर्यंत त्या महत्त्वहीन असतात. 

  वाचा - ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा या शुभेच्छा, स्टेटस आणि कोट्सनी

  नात्याचा क्युटनेस वाढवण्यासाठी (Cute Relationship Status For Whatsapp)

  Instagram

  कधी कधी एखादं क्युट स्टेटस एखाद्याला तुमच्या चटकन प्रेमात पाडतं, तर तुमच्या प्रेमात असलेल्या व्यक्तीला अजून जवळ आणतं. अशाच व्यक्तींसाठी खास क्युट relationship whatsapp status

  • True love म्हणजे आपल्या Gf सोबत लग्न करणं. 
  • आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासरा श्रीमंत पाहिजे आणि मुलगी एकुलती एक.
  • माझं आयुष्य आहेस तू पागल...लव्ह यू अ लॉट. 
  • इतकं गोड हसू नकोस की, लोकांची नजर लागेल कारण...प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासारखं प्रेम नाही. 
  • सगळ्यांपासून लपवलेलं माझं सर्वात मोठं सिक्रेट आहेस तू.
  • हे जीवन जरी परफेक्ट नसलं तरी तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा परफेक्ट आहे. 
  • तू फक्त माझी मैत्रीण नाहीस तू माझी लाईफ लाईन आहेस.
  • चांगल्या आणि सज्जन मुलांची थेट बायको बनते गर्लफ्रेंड नाही. 
  • कधी कधी एकच गोष्ट अख्खं आयुष्य व्यापून टाकते तुझं माझ्या आयुष्यात येणं हेही तसंच काहीसं. 
  • ना कुठला ईगो ना कुठला एटीट्यूड माझा गर्लफ्रेंड आहे खूप Cute. 

  मग मित्र-मैत्रिणींनो हे कोट्स आणि स्टेटस तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या Whatsapp आणि Insta वर शेअर करा.