नखं हा खूप महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. नखं वाढवून त्याला मस्त नेलपेंट लावणे खूप जणांना आवडते. पण काही जणांची नखं ही अगदी काही वाढीनंतर पटकन तुटू लागतात. तुमचीही नखं तुटत असतील तर त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. काहीवेळा पाण्यात खूप वेळ राहिल्यामुळेही नखं तुटतात. तर खूप वेळा आहारातील कमतरतेमुळेदेखील नखांची वाढ खुंटते आणि नखं अचानक तुटू लागतात. नखाची वाढ आणि नखं तुटणे हे जास्त अंंशी तुमच्या डाएटवर अवलंबून असते. अशावेळी तुम्ही आहारात कोणत्या गोष्टी समाविष्ट करायला हव्यात ते जाणून घेऊया.
अंडी
अंडी हा सगळ्यात उत्तम असा आहार आहे. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. ज्यामुळे हाडांना बळकटी मिळते. नखांमध्ये असलेले कॅल्शिअम वाढून नखांना घट्ट करण्याचे काम अंडी करतात. अनेकदा ज्यांचा नेलबेड पातळ असतो अशांसाठी तर कॅल्शिअमची कमतरता पूर्ण झाल्यामुळे नखांना एक चांगलाच कडकपणा मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे अंडी खात असाल तर तुमच्या आहारात अंडी ही असायलाच हवी. आठवड्यातून किमान दोनदा अंडी खाल्ली तरी देखील चालू शकतात.
पनीर
जर तुम्ही अंडी खात नसाल तर तुमच्या नखांसाठी पनीर हा एक उत्तम पर्याय आहे. दूधापासून तयार झालेल्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. जे तुमच्या शरीरासाठी चांगले असते. नखांना बळकटी हवी असेल. नखं चांगली चमकदार हवी असतील तर तुम्ही पनीरचा आहारात समावेश करायला हवा. शरीरात योग्य प्रमाणात पनीर गेले की, नखांची वाढ चांगली होण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर तुम्हाला पनीरचे फायदे मिळण्यास मदत मिळते.
डाळी
डाळी या किती पौष्टिक आहार आहे हे सांगायची काहीच गरज नाही.आरोग्यासाठी डाळी हा एक उत्तम असा पर्याय आहे. जर तुम्ही आहारात उत्तम डाळींचा समावेश केला तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळण्यास मदत मिळते. डाळीमध्ये असलेले कॅरेटीन हे नखांसाठी खूपच चांगले असते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास डाळींचा समावेश करायला हवा. डाळ ही आरोग्यासाठी खूपच चांगली असते. वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या की त्याचा फायदा तुम्हाला होतो.
सुकामेवा
सुक्यामेव्यामध्ये असलेले अनेक घटक हे आरोग्यासाठी फायद्याचे असतात. शिवाय त्यामध्ये असलेले काही घटक हे नखांच्या वाढीसाठी आणि त्याच्या मजबुतीसाठी फारच फायद्याच्या ठरतात. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास सुक्यामेव्यामधील मनुका, पिस्ता,बदाम असे खायलाच हवे. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळण्यास मदत मिळते. सुकामेवा खाणे फारच फायद्याचे असते.
आता नखांसाठी तुम्हाला उत्तम असा आहार हवा असेल तर या गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा.
नेलपेंट काढण्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हर नाही वापरा या नैसर्गिक गोष्टी