ADVERTISEMENT
home / मनोरंजन
gashmeer-and-mrunmayee-love-story-vishu

‘विशू’मध्ये फुलणार गश्मीर आणि मृण्मयीची प्रेमकहाणी

मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित ‘विशू’ हा चित्रपट प्रेमाची एक अनोखी कहाणी घेऊन 8 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर झळकले होते. समुद्राच्या संथ लाटांवर अलगद हेलकावे घेणारा ‘विशू’ म्हणजेच गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यात दिसत होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून यात गश्मीरसोबत मृण्मयी गोडबोले (Mrunmayee Godbole) दिसत आहेत. दोन वेगवेगळ्या विश्वात जगणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात नक्की काय घडामोडी चालू आहेत हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. ‘विशू’च्या निमित्ताने गश्मीर आणि मृण्मयी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.  निसर्गरम्य कोकण आणि तिथे हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला ‘विशू’मध्ये पाहायला मिळणार आहे. मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित या सिनेमात गश्मीर, मृण्मयीसह ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

एक गोड प्रेमकहाणी 

vishu

आपल्याकडे प्रेमकहाणीच्या कथा कधीच जुन्या होत नाहीत. प्रेमकहाणी या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नेहमीच यशस्वी होतात. मराठीमध्ये फारच कमी प्रेमकहाणीवर चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. विशू ही अशीच एक गोड प्रेमकहाणी आहे. थोडी वेगळी अशी ही कहाणी घेऊन पहिल्यांदाच गश्मीर आणि मृण्मयी ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदेने सांगितले की, ‘’हा एक कौटुंबिक चित्रपट असून ‘विशू’मधून एक गोड प्रेमकहाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपटाविषयी मी जास्त काही बोलणार नाही फक्त एकच सांगेन की, काही गोष्टींची जाणीव आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे यांनी पुढे सांगितले की, ‘’या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मी खूपच उत्सुक आहे. गश्मीर, मृण्मयी बरोबरच विशूमधील सगळ्याच कलाकारांसोबत काम करताना खूप मजा आली. मुळात हे सगळेच कसलेले कलाकार आहेत. दोन परस्परविरोधी स्वभाव जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होते, हे एका गोड प्रेमकहाणीमधून दाखवण्याचा प्रयत्न ‘विशू’मधून करण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

श्री कृपा प्रॅाडक्शनचा ‘विशू’ हा दुसरा चित्रपट असून येत्या काळात श्री कृपा प्रॅाडक्शनचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बाबू कृष्णा भोईर यांची असून मयूर मधुकर शिंदे यांनी ‘विशू’चे कथालेखन केले आहे. तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर छायाचित्रणाची धुरा मोहित जाधव यांनी सांभाळली आहे. तसेच ‘विशू’ला ऋषिकेश कामेरकर यांचे मधुर संगीत दिले असून या संगीताला मंगेश कांगणे यांचा आवाज लाभला आहे.

गश्मीरची तुफान क्रेझ 

मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणावं लागेल. थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपट पाहून दाद देऊ लागले आहेत. तर नवा येणारा चित्रपट विशू यामध्ये गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेमध्ये आहे. गश्मीर सध्या एका हिंदी मालिकेतही काम करत आहे. त्याचा खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही क्षेत्रांमध्ये गश्मीरने भक्कम पाय रोवले आहेत. दिसायला अत्यंत सुंदर आणि तितकाच सहज अभिनय यामुळे गश्मीरची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येते. याशिवाय गश्मीर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही तितकाचा अॅक्टिव्ह दिसून येतो. अत्यंत उत्तम डान्सर असल्यामुळे आपल्या डान्सचे अनेक व्हिडिओ गश्मीर पोस्ट करत असतो आणि या व्हिडिओचे अत्यंत उत्तम व्ह्यूजदेखील त्याला मिळतात. प्रेमकहाणी म्हणजे नक्की काय आहे? नायकाच्या मनातील वादळ काय आहे असे अनेक प्रश्नही आता प्रेक्षकांना पडायला लागले असून प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा चित्रपट लवकरच येतोय. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT