रितेश देशमुख आणि जेनेलिया डिझूजा देशमुख बॉलीवूडचं एक क्यूट कपल आहे. या दोघांना दोन गोंडस मुलंदेएखील आहेत. 5 ऑगस्टला जेनेलियाचा वाढदिवस होता. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रितेशने त्यांचे काही फोटो आणि एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. रितेशने शेअर केलेल्या फोटोंमधुन जेनेलिया पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक करत असल्याचं वाटत आहे. रितेशने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये जेनेलिया साऊथचा अभिनेता राम पोथिनेनी एकत्र दिसत आहेत. शिवाय या फोटोसोबत रितेशने READY 2 Already !!!! अशी कॅप्शन दिली आहे. ज्यावरून जेनेलिया आणि राम लवकरच एखाद्या चित्रपटात काम करणार असल्याचं वाटत आहे. रेडी या 2011 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात राम आणि जेनेलियाने एकत्र काम केलं होते. ज्यावरून ते या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या कॅप्शनवरून ते दोघं नेमकं कोणत्या चित्रपटात काम करणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काहिही असलं तरी जेनेलियाचा हा कमबॅक तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंद देणारा आहे.
रितेशने जेनेलियाचा वाढदिवस असा केला साजरा
जेनेलियाने रितेश देशमुखसोबत तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटात रितेश आणि जेनेलियाच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. जेनेलियाने अनेक हिंदी आणि तेलुगू ,तामिळ चित्रपटातून काम केलं आहे. मात्र कुटुंब आणि मुलांच्या संगोपनासाठी जेनेलिया अनेक दिवस चित्रपट सृष्टीपासून दूर होती. 5 ऑगस्टला जेनेलियाचा वाढदिवस होता. रितेशने जेनेलियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहीली आहे. ज्यामध्ये त्याने शेअर केलं आहे की, “आयुष्य खूप सुंदर होतं जेव्हा तुमची बेस्ट फ्रेन्ड तुमची जीवनसाथी होते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग बायको. मला माहीत आहे की तू एक स्ट्रॉंग आई आहेस. ज्यामुळे तू कुटुंबाला जोडून ठेवलं आहेस. पुढच्या जन्मी मी पुन्हा तुझाच नवरा व्हावं अशी मी देवाजवळ प्रार्थना करेन.” या पोस्टवरून आणि त्याने शेअर केलेल्या फोटोवरून रितेशचं त्यांच्या बायकोवर म्हणजेच जेनेलियावर मनापासून प्रेम असल्याचं दिसत आहे.
Life is bliss-when your best friend becomes your life partner.Happy Birthday my darling Baiko @geneliad You are the strongest mother I know, you are the adhesive that holds our family together. For all the good deeds in this life may god bless you with the same husband in ur next pic.twitter.com/x2D4kvwEOl
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 5, 2019
जेनेलिया आणि रितेश बॉलीवूडची बेस्ट जोडी
रितेश आणि जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट 2003 मध्ये एकत्र केला. त्यानंतर जवळजवळ 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश व जेनेलिया 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. या जोडप्याला रियान आणि राहील ही दोन गोंडस मुलं आहेत. मुलांच्या संगोपनासाठी जेनेलिया गेली काही वर्ष चित्रपटांपासून दूर होती.रितेश व जेनेलिया या जोडीने यापूर्वी ‘तेरे नाल लव्ह हो गया’ ‘तुझे मेरी कसम’ ‘मस्ती’ या बॉलीवूड चित्रपटांमधून एकत्र दिसली होती. शिवाय लयभारी आणि माऊली चित्रपटातदेखील रितेश आणि जेनेलियाची एकत्र छलक प्रेक्षकांना पाहता आली होती. मुलांचा सांभाळ करण्यासाठी काही वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर राहील्यावर जेनेलिया आता पुन्हा एकदा या क्षेत्रात आपलं नशिब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. आजंही चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. त्यामुळे जेनेलियाच्या या कमबॅकमुळे ते दोघं पुन्हा एकत्र काम करण्याची आशा प्रेक्षकांना वाटत आहे.
अधिक वाचा
शिल्पा शेट्टी 13 वर्षांनी दिसणार सिल्व्हर स्क्रिनवर, ‘निकम्मा’ चित्रपटातून करणार कमबॅक
म्हणून लोकांना आवडतेय ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका
#BBM2 मधून रूपाली भोसलेची अनपेक्षित एक्झिट
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम