आयब्रोज अथवा भुवया हा तुमच्या चेहऱ्यामधील एक महत्त्वाचा भाग असतात. कारण त्यांच्या आकार आणि दाटपणामुळे तुमच्या संपू्र्ण चेहऱ्याचा लुक बदलतो. काळ्याभोर, दाट आणि कोरीव भुवयांमुळे कोणत्याच्याही नजरा तुमच्यावर खिळून राहू शकतात. अनेकींना अशा दाट आणि जाड भुवयांचे जन्मतःच वरदान मिळते. काही जणींना मात्र विरळ आणि पातळ भुवयांवरच समाधान मानावे लागते. मात्र जरी तुमच्या आयब्रोज घनदाट नसल्या तरी एका घरगुती उपायाने तुम्ही त्या दाट करू शकता. नारळाचे तेल तुमच्या भुवयांसाठी वरदान ठरू शकते. दररोज भुवयांवर नारळाचे तेल लावण्यामुळे तुमच्या आयब्रोजही दाट होतील. यासाठीच जाणून घ्या कसा करावा हा उपाय
नारळाच्या तेलाने कशा होतात आयब्रोज दाट
नारळाचे तेल भुवयांवर लावण्यापूर्वी तुम्हाला नारळाच्या तेलाचे फायदे माहीत असायला हवे. नारळाच्या तेलात भरपूर अॅंटि ऑक्सिडंट आणि फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे नारळाचे तेल फक्त त्वचेसाठीच नाही तर तुमच्या केसांसाठीही फायदेशीर ठरते. डोक्यावरच्या केसांप्रमाणेच आयब्रोजचे केस वाढण्यासाठीही तुम्ही नारळाचे तेल नक्कीच वापरू शकता. नारळाच्या तेलात मॉईस्चाईझ करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते आणि केस घनदाट होतात.
नारळाच्या तेलामुळे आयब्रोजचे केस गळत नाहीत
केसांप्रमाणेच तुमच्या आयब्रोजदेखील गळू शकतात. ज्यामुळे त्या दिवसेंदिवस विरळ आणि पातळ होतात. जर तुमच्या आयब्रोज अशाच अचानक पातळ होत असतील तर तुम्ही त्यावर नारळाचे तेल नक्कीच लावू शकता. कारण नारळाचे तेल लावून मालिश केल्यामुळे तुमच्या आयब्रोजचे केस वाढतात आणि दाट होतात. यासाठी अंघोळ केल्यावर अथवा झोपण्यापूर्वी नेहमी थोडंसं नारळाचं तेल भुवयांवर लावा. त्याचप्रमाणे आयब्रोज दाट करण्यासाठी इतर उपायही जरूर करा.
नारळाच्या तेलामुळे आयब्रोज दाट होतात
आयब्रोज दाट करण्यासाठी नारळाचे तेल लावणं हा नक्कीच फायदेशीर उपाय आहे. कारण यामुळे तुमच्या केसांची जलदगतीने वाढ तर होतेच शिवाय आयब्रोजनां चांगला शेपही मिळतो. यासाठी झोपण्यापूर्वी न विसरता आयब्रोजनां नारळाचे तेल लावण्याची सवय लावा. ज्यामुळे रात्रभर तुमच्या भुवयांवर नारळाचे तेल राहील. नारळाच्या तेलात अॅंटि एजिंग गुणधर्म असतात. त्यामुळे आयब्रोजसोबत तुम्ही नारळाचे तेल तुमचे डोळे आणि अंडर आयवरही लावू शकता. हलक्या हाताने संपूर्ण डोळे आणि डोळ्यांखाली भाग यावर मसाज करा. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांकडील भागांचे रक्ताभिसरण सुधारेल. डोळ्यांच्या जवळील त्वचा मऊ होईल. भुवयांचे केस वाढण्यासाठी यामुळे प्रोत्साहन तर मिळेलच शिवाय तुमचे डार्क सर्कल्सदेखील कमी होतील.
नारळाच्या तेलाने तुमची त्वचा मऊ आणि मुलायम
नारळाचे तेल हे एक नैसर्गिक मॉईस्चराईझर आहे. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. बऱ्याचदा त्वचा कोरडी झाल्यामुळेही आयब्रोज गळतात अथवा आयब्रोजमध्ये त्वचेचे विकार निर्माण होतात. मात्र जर तुम्ही नियमित आयब्रोजनां नारळाचे तेल लावत असाल तर तुमची त्वचा कोरडी पडत नाही. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या आयब्रोजवर होतो. नारळाचे तेल नियमित वापरण्यामुळे तुमच्या आयब्रोज काळ्याभोर आणि दाट होतात.
सूचना – असं असलं तरी जर तुमच्या आयब्रोज खूप गळत असतील आणि प्रमाणापेक्षा पातळ झाल्या असतील तर घरगुती उपाय करण्यासोबतच यावर तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्या. कारण केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात ज्यावर वेळीच योग्य ते औषधोपचार करणे आवश्यक आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –