home / पालकत्व
प्रेग्नंट महिलांसाठी खास गिफ्ट आयडियाज – Gifts For Pregnant Women In Marathi

प्रेग्नंट महिलांसाठी खास गिफ्ट आयडियाज – Gifts For Pregnant Women In Marathi

आई होणं हेच प्रत्येक महिलेसाठी अगदी देवाकडून मिळालेली खास भेट आहे. त्यामुळे आईपण अनुभवताना तिला वेगळ्या अशा भेटवस्तूंची गरजच नसते. पण तरीही आपल्याकडील प्रथा आणि परंपरेप्रमाणे गर्भवती महिलांवरील संस्कार म्हणून खास डोहाळेजेवणाचा घाट घातला जातो. आजकाल डोहाळेजेवणही अगदी जोरदार केलं जातं. आता असा सोहळा म्हटला की, भेटवस्तू देणं आलंच. आता हटके असं काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही आहोत ना मदतीला. आम्ही तुमच्यासाठी खास डोहाळेजेवणासाठी आणि तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणी किंवा बहिणीला काय द्यायचं हा प्रश्न सोडवला आहे. पाहा खालील लिस्ट –

डोहाळे जेवणासाठी गिफ्ट आयडिया – Baby Shower Gift Ideas

डोहाळे जेवणाचा सोहळा

Instagram

डोहाळे जेवण (Dohale Jevan) किंवा गोदभराई किंवा बेबीशॉवर हा गर्भारपणातील एक सुंदर सोहळा आहे. येणाऱ्या बाळाचं स्वागत आणि गर्भवती महिलेच्या आई बनवण्याबद्दल शुभेच्छा व आशिर्वाद यांचा सुंदर मेळ यात असतो. काहींकडे सातव्या महिन्यात तर काहींकडे आठवा महिना पूर्ण झाल्यावर हा सोहळा केला जातो.  यामागे परंपरा आणि वैज्ञानिक कारण दोन्ही आहेत. पूर्वापारपासून हा सोहळा साजरा केला जातो. 

या सोहळ्यात गर्भवती महिलेची सुक्यामेवा आणि फळं यांनी ओटी भरली जाते. यामागील शास्त्र म्हणजे फळं आणि सुकामेवा खाऊन बाळाची आणि बाळाच्या आईची तब्येत चांगली राहावी. या सुंदर सोहळ्याच्या निमित्ताने बाळाच्या होणाऱ्या आईला नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींकडून अनेक भेटवस्तू आणि उपयोगी वस्तूही दिल्या जातात. ज्यांचा वापर तिला गर्भारपणात आणि बाळाच्या आगमनानंतरही होतो.

1. हिरवीगार साडी

आपल्याकडे डोहाळे जेवणात आवर्जून हिरव्या साडीने ओटी भरली जाते. त्यामुळे तुम्हीही होणाऱ्या आईसाठी खास गिफ्ट्स मध्ये साडी देण्याचा विचार करू शकता. यासाठी तुम्ही अशी सुंदर बुट्टे असलेली कॉटन साडी जिचा पदर मात्र जरी बुट्ट्याचा आहे. ती देऊ शकता. ही साडी देऊन तुम्ही होणाऱ्या आईची ओटी भरू शकता. तसंचही साडी कॉटनची असल्याने ती नेसणं ही आरामदायी आहे.

वाचा – महिला दिन का साजरा केला जातो

2. सुंदरसा कुर्ता

आता गिफ्ट तुमच्या गर्भवती बहिणीसाठी असेल आणि तिला जर साडी आवडत नसेल तर तुम्ही तिला असा छान कुर्ताही देऊ शकता. जो घालणं तुमच्या बहिणीसाठी खूपच कंफर्टेबल ठरेल.

3. उपयोगी पडणारी डफल बॅग

अशी बॅग पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलेसाठी प्रेग्नंसी गिफ्ट्स च्या लिस्टमध्ये अगदी पहिल्या पाच वस्तूंमध्ये गणली जाते. कारण अशी बॅग अगदी हॉस्पिटलमध्ये जाताना ते आई झाल्यावर बाळाचं आणि तिचं सामान कॅरी करायला तिला खूपच उपयोगी पडेल. त्यामुळे गिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर अशी छान डफल बॅगही तुम्ही प्रेग्नंट महिलेला देऊ शकता.

4. आरामदायी उशी

गर्भवती असताना सर्वात जास्त सल्ला दिला जातो तो आराम करण्याचा. ज्याचा फायदा होणाऱ्या बाळाला आणि आईच्या आरोग्याला होत असतो. त्यामुळे वरील आरामदायी उशी तुम्ही भेट म्हणून दिल्यास ती होणाऱ्या आईला नक्कीच आवडेल. याची गॅरंटी आहे. कारण बरेचदा डोहाळेजेवणाला बऱ्याचश्या साड्या, कुर्ते किंवा ड्रेसमटेरियल्स, बॅग आणि इतर वस्तू येतात. पण अशी वस्तू गिफ्ट म्हणून क्वचितच येते. ही उशी गरोदर असताना आणि नंतरही वापरण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. मुख्य म्हणजे ही उशी अँटी एलर्जीक आणि घाम शोषून घेणारी आहे. ज्यामुळे ही जवळ घेतल्यास गरमही होणार नाही.

5. गर्भसंस्काराची सीडी किंवा ऑडिओ सेट

आईचं आणि बाळाचं नातं हे गर्भारपणापासूनच जोडलं जातं. तुम्हालाही आश्चर्यात टाकणारी ही बाब माहीत असेलच की, गर्भात असल्यापासून बाळांना आईचा आणि इतर गोष्टींचाही आवाज कळत असतो. त्यामुळे या काळात केलेले गर्भसंस्कार हे फारच महत्त्वाचे असतात. म्हणूनच गिफ्ट देण्यासाठी हा सेट उत्तम आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, इतर शास्त्रीय संगीतातील कलाकार यांच्या आवाजाचा समावेश आहे. या सीडीत अर्थववेद आणि यजुर्वेद, ऋग्वेद मंत्र, गर्भसंरक्षक तंत्रोक्त मंत्र आहेत. जे ऐकल्यामुळे आई आणि बाळाच्या आसपास सकारात्मक वातावरण नक्कीच निर्माण होईल.

6. होणाऱ्या आईसाठी उपयुक्त पुस्तक

ऋजुता दिवेकर यांचं नाव सर्वश्रुत आहे. त्यांनी लिहीलेल्या या पुस्तकात प्रेग्नंसी आधी आणि नंतर काय करावं याबाबतच्या नोट्स लिहील्या आहेत. या पुस्तकात ऋजुता आपल्याला गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास घडवतात. प्रेग्नंट होण्याआधी काय काळजी घ्यावी, प्रेग्नंट असताना आणि प्रसूतीनंतर काळजी घ्यावी. अशा गरोदरपणातील सर्व टप्प्यांबाबतच्या नोट्स त्यांनी यात लिहील्या आहेत. या काळात काय खावं यासाठी यात काही रेसिपीजही दिल्या आहेत. त्यामुळे गरोदर असणाऱ्या तुमच्या बहिणीला किंवा मैत्रिणीला तुम्ही गर्भसंस्कार पुस्तक अवश्य द्या.

7. बायो-ऑईल

या काळात त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आई होणाऱ्या मैत्रिणीच्या काळजीपोटी हे बायो-ऑईल देऊ शकता. यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स आणि आरोग्यदायी वृक्षांच्या अर्काचा समावेश आहे. यामध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन ई, कॅलेड्युला ऑईल, लव्हेंडर ऑईल, रोजमेरी, कॅमोमाईल आणि पर्सेलिन ऑईल आहे. जे खूपच हलकं आणि अजिबात चिकट नसून त्वचेत अगदी सहज जिरतं. हे तेल स्ट्रेच मार्क आणि शरीरावरील इतर खुणाही नाहीश्या करून त्वचेचा पोत सुधारतं. हे सर्व प्रकारच्या त्वचा प्रकारांसाठी उपयोगी आहे.

8. टी-शर्ट ड्रेस

गर्भारपणात स्टाईलिश दिसू नये असं कोणी सांगितलं. तुम्हालाही आपल्या मैत्रिणीला किंवा बहिणीला असाच स्टाईलिश ड्रेस गिफ्ट म्हणून द्यायला हरकत नाही. हा प्रेग्नंट असताना घालणं आणि त्यात वावरणं अगदी कंफर्टेबल आहे.

प्रेग्नंट महिलांसाठी गिफ्ट्स – Gifts for Pregnant Women In Marathi

जर तुम्हाला डोहाळे जेवण (Dohale Jevan) किंवा इतर समारंभशिवाय तुमच्या जवळच्या प्रेग्नंट मैत्रिणीला किंवा बहिणीला गिफ्ट देण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा विचार करू शकता.

वाचा – प्रेगन्सीमध्ये कशी घ्याल तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी

1. योगा बॉटम्स

गर्भारपणात योगा करणं उत्तम असतं. त्यामुळे अशा कंफर्टेबल योगा बॉटम्सही तुम्ही होणाऱ्या आईला देऊ शकता. ज्या योगा करण्यासाठी अगदी योग्य आहेत. या बॉटम्स ऑर्गेनिक कॉटनपासून बनवलेल्या असून प्रेग्नंसीदरम्यान हालचाल करण्यासाठी सोयीस्कर आहेत. 

2. मॅटर्निटी पिनाफोर ड्रेस

हा पिनाफोर ड्रेस प्रेग्नंट असताना फिरायला जाताना किंवा डॉक्टरांकडे चेकअपसाठी घालण्यासाठी उत्तम आहे. कॉटनचा आणि हवेशीर असा ड्रेस आहे. 

3. मॅटर्निटी ड्रेस

हा ड्रेस प्रेग्नंसीमध्ये आणि प्रेग्नंसीनंतरही उपयोगी पडेल असा आहे. कारण हा बेबी बंपमध्ये वावरतानाही कंफर्टेबल आहे तर दुसरीकडे याला समोरच्या बाजूला झिप्पर आहेत. ज्यामुळे बाळाला दूध देणंही सोपं होईल. त्यामुळे हा ड्रेस तुमच्या मैत्रिणीला खूपच उपयोगी ठरेल.

4. अँटी रॅश क्रिम

हिमालयाचं हे अँटी-रॅश क्रिम हर्बल असून खाज किंवा रॅशवर लावल्यास लगेच आराम मिळतो. गर्भारपणात त्वचा ताणली जाते ज्यामुळे अंगाला खाज सुटते. अशावेळी हे क्रिम उपयोगी पडते. हे क्रिम लावल्याने लगेच आराम मिळतो. याचा सुवासही अगदी मोहक लव्हेंडरचा असल्याने होणाऱ्या आईला नक्कीच छान वाटेल.

5. कॉपर गिफ्ट्स सेट

हा तांब्याच्या म्हणजेच कॉपरच्या बाटल्यांचा सेट गिफ्ट म्हणून देण्यासाठी अगदी योग्य आहे. कारण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. या बाटल्यांचा सेट अँटी-बॅक्टेरियल असून यातलं पाणी प्यायल्याने तुम्हाला अँटी-ऑक्सीडंट्स मिळतील. तसंच रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. त्यामुळे गिफ्ट म्हणून देण्यासाठी हा सेट अगदी योग्य आहे.

6. बाथ सॉल्ट

हे जरी तुम्हाला गिफ्ट वाटलं नाहीतरी प्रेग्नंट महिलेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे गिफ्ट म्हणून एखादी उपयोगी पडणारी गोष्ट देणं कधीही चांगलंच नाही का? हे मीठ पाण्यात घालून आंघोळ केल्यास पाठदुखी, अंगदुखी कमी होते. तसंच शरीरातील विषारी घटकही बाहेर फेकले जातात. त्यामुळे हे मीठ तुम्ही प्रेग्नंसीमध्ये आणि नंतरही वापरू शकता. या मीठात कोणतेही हानीकारक केमिकल्स नाहीत. कारण हे आहे पॅराबीन फ्री.

7. बॉडी वॉश

हा बॉडी वॉशही पॅराबीन फ्री असून यात नारळातील आरोग्यदायी घटक आणि नैसर्गिक मॉईश्चराईजर्स वापरण्यात आले आहेत. जे तुमच्या त्वचेचं नैसर्गिकरित्या संतुलन करतात. यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही. होणाऱ्या आईला जर मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल तर या वॉशमधील इसेंशियल ऑईल्समुळे नक्कीच बरं वाटेल आणि त्रासही कमी होईल. 

8. अँटी-स्ट्रेच बेली बाम

100% नैसर्गिक आणि ऑर्गेनिक असलेला हा बेली बाम आहे. जो स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी उत्तम आहे. हा बेली बामसुद्धा केमिकल फ्री असून यात फक्त इसेंशियल आणि नैसर्गिक तेलं आहेत.

आम्हाला विश्वास आहे की, वरील गिफ्ट आयडियाज तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. कारण लवकरच आई होणाऱ्या मातेसाठी भेटवस्तू देताना फक्त भेटवस्तू म्हणून नाहीतर तिच्या उपयोगी काय पडेल याचाही विचार करायला हवा.

You Might Like This:

गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या

सुंदर दिवसासाठी सुंदर डोहाळे जेवण सजावट

22 Jan 2020

Read More

read more articles like this
good points logo

good points text