ADVERTISEMENT
home / मनोरंजन
neha dhupia and angad bedi

नेहा धुपिया पुन्हा झाली आई, अंगदने शेअर केली पोस्ट

गेल्या दोन वर्षात बॉलीवूडमध्येही आनंदाचे वारे वाहत आहेत. यामध्ये अनेक कलाकरांनी गोड बातमी शेअर करत आपल्या मुलामुलींचे फोटोही शेअर केले आहेत. त्यात आता भर पडली आहे ती नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि अंगद बेदीची (Angad Bedi). नेहा आणि अंगदने काही वर्षांपूर्वी अचानक लग्न करून चाहत्यांना धक्का दिला होता तर काही महिन्यातच त्यानंतर मेहेरचा (Meher Bedi) जन्म झाला. आता नेहा दुसऱ्यांदा गरोदर होती. मागच्याच आठवड्यात नेहा आपल्या मुलीला घेऊन इनाया खेमूच्या (Inaya Khemu) वाढदिवसाला गेल्याचेदेखील दिसून आले होते. आता अंगदने आपल्या घरात गोंडस मुलगा जन्माला आल्याचे शेअर केले आहे. नेहाने मुलाला जन्म दिल्याचे तिचा पती अंगदने सोशल मीडियावर शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. यानंतर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

अधिक वाचा – कोविड लसीच्या व्हिडिओमुळे मिताली मयेकर झाली ट्रोल

अंगदने व्यक्त केल्या भावना

अंगदने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून आपला आनंद व्यक्त केला आहे. त्याने एक अप्रतिम फोटो शेअर करत आपल्याला मुलगा झाल्याचे सांगितले आहे. ‘देवाच्या आशीर्वादाने आज आम्हाला मुलगा झाला आहे. नेहा आणि बाळ दोघेही उत्तम आहेत. #BEDIS BOY वाहेरगुरूची अशीच कृपा राहू दे. या दरम्यान नेहाने जी काही हिंमत दाखवली त्यासाठी तिचे खूप खूप आभार आणि आता यापुढचा आपल्या चौघांचा प्रवास नक्कीच अविस्मरणीय ठरेल’ असे कॅप्शन दिले आहे. अंगद आणि नेहा गेले अनेक वर्ष एकमेकांना ओळखतात. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यातच नेहाने मुलीला जन्म दिल्याने लग्नाआधीच नेहा गरोदर असल्याची कुजबूज सुरू झाली होती आणि ही गोष्ट अंगदने स्वीकारलीदेखील आहे. तर नेहाने आपण दुसऱ्यांदा गरोदर आहोत हेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जाहीर केले होते. 3 ऑक्टोबर रोजी नेहाने बाळाला जन्म दिला असून दोघेही सुखरूप आहेत. तर 2018 मध्ये नेहा आणि अंगदने लग्न केले होते. 

अधिक वाचा – Biggboss Marahti 3: गायत्री आणि मीरामुळे जय जातोय चुकीच्या दिशेला

ADVERTISEMENT

मिस इंडियाचा किताब

नेहा धुपिया ही 40 वर्षांची असून तिने 2002 मध्ये मिस इंडिया (Miss India) हा बहुमान मिळविला होता. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. मात्र तिचा हा प्रवास तितका यशस्वी ठरला नाही. पण नेहा नेहमीच सामाजिक कार्यात आणि इतर कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसून आली. तसंच ती सोशल मीडियावरही खूपच अॅक्टिव्ह आहे 2003 मध्ये तिने बॉलीवूडमधील आपला प्रवास सुरू केला. काही चित्रपटांमध्ये ती प्रमुख भूमिकेतही दिसली. मात्र तिचे चॅट शो खूपच प्रसिद्ध आहेत. निवेदक म्हणून तिने चांगलेच नाव कमावले आहे.   दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी या दोघांवरही प्रेमाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. दिया मिर्झाने शुभेच्छा देत बाळाला हातात घेण्यासाठी उत्सुक आहे असं म्हटलं आहे तर सानिया मिर्झानेही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील ग्रोव्हर, अपारशक्ती खुराणा, हिना खान, ताहीरा कश्यप, रितेश देशमुख, सोफी चौधरी, सागरिका घाटगे सर्वांनीच अंगदच्या या पोस्टवर आपला आनंद व्यक्त केला आहे. अजूनही अंगद अथवा नेहाने बाळाचा फोटो पोस्ट केला नाही. त्यामुळे त्यांचे चाहते बाळाला पाहायलाही उत्सुक आहेत. 

अधिक वाचा – Biggboss Marathi 3: विकासला पाहून होते का राहुल वैद्यची आठवण

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT