अभिनेत्री नेहा कक्करने आपल्या चाहत्यांना आनंदाची गोड बातमी दिली आहे. नेहा कक्कर (Neha Kakkar Pregnant) लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही गोड बातमी देत आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. आपला नवरा रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) याच्यासह अत्यंत क्यूट आणि रोमँटिक फोटो शेअर करत नेहाने ही बातमी शेअर केली आहे. इतकंच नाही तर नेहाने आपला बेबी बंपदेखील फ्लॉन्ट केला आहे. डेनिम डंगरीमध्ये नेहाने आपला हा फोटो शेअर केला आहे. नुकताच हा फोटो शेअर केला असून नेहावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
10 वर्षाच्या नात्यानंतर पूजा गोरचा वेगळं होण्याचा निर्णय, चाहत्यांना धक्का
चाहत्यांना सुखद धक्का
नेहाने आपण रोहनप्रीतशी लग्न करत असल्याचे सांगत काही महिन्यांपूर्वीच ‘चट मंगनी पट ब्याह’ केला होता आणि आता नेहाने पुन्हा एकदा लगेचच चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आपण गरोदर असून लवकरच आई होणार असल्याचेही नेहाने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. आपल्या नवऱ्यासह नेहाने फोटो शेअर केला असून लवकरच दोघेही अत्यंत आनंदी दिसून येत आहेत. तर नेहाने #KhyalRakhyaKar असा हॅशटॅग देत हा फोटो शेअर केला. चाहत्यांना हा खूपच मोठा सुखद धक्का मिळाला असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नेहा ही अशी सेलिब्रिटी आहे जिचे सोशल मीडियावर 50 मिलियन चाहते आहेत. तर नुकताच तिला सन्मानही मिळाला आहे. दोन महिन्यापूर्वीच नेहाचं लग्न झाल्यामुळे ही बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे.
उर्वशी रौतेलाने मित्राच्या लग्नात नेसली लाखोंची साडी, किंमत ऐकून व्हाल थक्क
सोशल मीडियावरच केली होती लग्नाची घोषणा
नेहाने 24 ऑक्टोबरला रोहनप्रीत सिंहबरोबर लग्न केले. तिची रोहनप्रीतसह लॉकडाऊनमध्येच भेट झाली आणि तिने लग्नाचा निर्णय घेत आपण प्रेमात जास्त वेळ काढू शकत नाही असं त्याला स्पष्ट केलं होतं. तर लग्नाच्या आधी काही दिवसच तिने रोहनप्रीतशी लग्न करत असल्याचे सांगून पटकन लग्नही केले. नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वीच तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, देवाच्या कृपेने सर्व काही मिळालं आहे, मला लग्न करून सेटल व्हायचं होतं. रोहनप्रीत नेहापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. पण तरीही त्यांच्या नात्यात वयाचं कोणतंही बंधन आलं नाही. दोघांच्या घरच्यांनीही कोणताही नकार न देता त्यांचं लग्न पार पडलं. दरम्यान दुबईमधील त्यांचे हनिमूनचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. आता नेहाने ही गोड बातमी देत पुन्हा एकदा चाहत्यांना धक्का दिला आहे हे नक्की. नेहाची गाणीच नाही तर नेहाचे वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिले आहे. अगदी पहिला बॉयफ्रेंड असो अथवा पटकन लग्न असो आणि आता नेहाने बाळाची बातमीही अगदी पटकन दिल्यामुळे चाहत्यांचाही गोंधळ उडाला आहे. पण नेहाचे चाहते तिच्यासाठी अत्यंत आनंदी असून तिच्यावर सध्या सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसंच नेहाला अनेक जण आता काळजी घेण्यासही सांगत आहेत. सध्या नेहा एका रियालिटी शो ची परीक्षक म्हणून काम पाहत आहे.
NCB च्या रडारवर पुन्हा करण जोहर, हाऊस पार्टीचे मागितले व्हिडिओ
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक