ADVERTISEMENT
home / मनोरंजन
gosht-eka-paithanichi-and-mi-vasantrao-got-68-th-national-award-in-marathi

68व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘मी वसंतराव’ आणि “गोष्ट एका पैठणीची” बाजी

सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य… आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येण्या आधीच यंदाच्या मनाच्या समजल्या जाणाऱ्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ”गोष्ट एका पैठणीची” (Gosht Eka Paithanichi) या चित्रपटाने पटकावला आहे . प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने  या चित्रपटाची निर्मिती केली  आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव (Sayali Sanjeev), सुव्रत जोशी (Suvrat Joshi), शशांक केतकर (Shashank Ketkar), मिलिंद गुणाजी (Milind Gunaji), मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 

आशा निराशेने सजलेला स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो जणू  एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आता लवकरच येणार आहे. 

तर उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडेची निवड

mi-vasantrao-teaser-released-by-ustad-zakir-hussain

यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांची निवड करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसंच सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन पुरस्कारदेखील अनमोल भावे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी मिळाला आहे.

या पुरस्काराबाबत राहुल देशपांडने सांगितले की, ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे (Pandit Vasantrao Deshpande) यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली.’’

ADVERTISEMENT

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने या यशाबद्दल सांगितले की, ‘’हा क्षण खूप मौल्यवान आहे. ‘मी वसंतराव’ची गाणी हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि या गाण्यांना राहुल देशपांडे यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. आणि आज त्याच्या या मेहनतीचा गौरव झाला आहे, याचा आम्हांला आनंद आहे.’’ जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, आणि निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे.

मराठी चित्रपटांचे यश 

यावर्षी अनेक मराठी चित्रपट प्रसारित झाले आणि अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे प्रेम मिळवल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी थिएटरमध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना पसंती दिली आहे. वेगळे विषय आणि कसदार अभिनय यामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातही दोन चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारल्यामुळे आता अजूनही मराठी चित्रपटांना उत्साह मिळेल असं म्हणावं लागेल. नवे चित्रपट येण्यासाठी अजून हुरूप येईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT