ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
हार्दिक पंड्या आणि नताशाच्या घरी आला छोटा पाहुणा, शेअर केला फोटो

हार्दिक पंड्या आणि नताशाच्या घरी आला छोटा पाहुणा, शेअर केला फोटो

टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक  पंड्या आणि नताशा स्टैनकोविक आई-बाबा झाला आहेत. गुरुवारी ही आनंदाची बातमी हार्दिक  पंड्या याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताना त्याने छोट्या बाळाचा इवलासा हात हातात घेऊन एक क्युट फोटो शेअर केला आहे. त्याने ही आनंदवार्ता दिल्यानंतर संपूर्ण टीम इंडियाने या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लॉकडाऊन दरम्यान हार्दिकने नताशा प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्या फॅन्समध्ये आधीच आनंदाचे वातावरण होते आणि आता बाळाचे आगमन झाल्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे. पाहुयात त्याने नेमकं काय शेअर केलं

आरोग्य कर्मचारी म्हणजे देवदूत, बिग बीने व्यक्त केली कृतज्ञता

अशी दिली आनंदाची बातमी

नताशासोबत साखरपुडा केल्यानंतर हार्दिक लग्न कधी करणार असा अनेकांना प्रश्न पडला होता. पण देशभरात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर एक आनंदाची बातमी त्याने सगळ्यांसोबत शेअर केली ती म्हणजे नताशा आई होणार असल्याची बातमी 31 मे रोजी दिली होती. नताशाच्या बेबी बंपकडे पाहता नताशा लवकरच आई होणार हे दिसत होते. 30जुलै रोजी नताशाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही बातमी हार्दिकने त्याच्या इन्स्टा आणि ट्विटर अकाऊंटवरुन दिली. त्याने बातमीसोबत शेअर केलेल्या बाळाच्या हाताचा क्युट फोटो पाहून अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाच्या सगळ्याच प्लेअर्सनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुशांतच्या केसमध्ये नवे वळण, रियावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

ADVERTISEMENT

ट्विटरवरुन दिली माहिती

सेलिब्रिटी लग्न आणि अफेअर्सच्या चर्चा या कायम होत असतात. हार्दिक  पंड्या हा कायम या बाबतीत चर्चेत असला तरी त्याच्या साखरपुड्याची बातमी ही अचानक सगळ्यांना कळली. त्यांनी कोणालाही कसलीही माहिती न देता नताशासोबत जानेवारी महिन्यात साखरपुडा केला. त्याने अत्यंत रोमँटिकपद्धतीने नताशाला प्रपोझ केले होते. त्या नंतर या कपलच्या लग्नाची चर्चा ही सुरु होती. पण कोविड 19 मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु झाला. मार्चपासून हा लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे त्यांना लग्नही करता आले नाही. पण काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी लॉकडाऊनमध्येच लग्न केले आहे. पण या बातमीची आम्ही पुष्टी देत नाही. 

धक्कादायक! मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या

हार्दिक पंड्या नेहमीच राहिला चर्चेत

हार्दिक पंड्या हा खेळासाठी जितका चर्चेत आहे. तितकाच तो वेगवेगळ्या कॉन्ट्राव्हर्सीजसाठी प्रसिद्ध आहे. कॉफी विथ करणच्या शो मध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्याला माफी देखील मागावी लागली. महिलांसंदर्भातील असभ्य वर्तनाचा त्याला चांगलाच फटका बसला होता. त्याच्या रिलेशनशीपमुळेही तो कायम चर्चेत राहिला आहे. हार्दिक  पंड्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल यांच्यासोबत जोडले गेले. त्यामध्ये कोलकातामधील मॉडले लिसा शर्मा, अभिनेत्री परिणिती चोप्रा, इशा गुप्ता, शिबानी दांडेकर, एली अवराम आणि उर्वशी रौतेला यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे रिलेशनशीपच्या बाबतीत तो कायमच चर्चेत राहिला. 

आता राहिला विषय भूतकाळाचा तर तो हार्दिकने मागे टाकला आहे आणि नव्या आयुष्याची सुरुवात नताशासोबत करत कुटुंबही सुरु केली आहे. 

ADVERTISEMENT
30 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT