कोकम हे कोकण, केरळ, गोवा आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे या प्रांतातील खाद्यशैलीवर कोकमाचा प्रभाव दिसून येतो. कोकमाची फळं सुकवून त्याच्या सालीपासून आमसूल तयार केलं जातं. कोकमाच्या फळाचा स्वयंपाक आणि औषधासाठीही वापर केला जातो. आंबट असूनही आमसूल (Amsul In Marathi) हे आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे आहारात त्याचा प्रमाणात वापर केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. याचं कारण कोकम हे एक पाचक फळ असून त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अपचन, मूळव्याधी, जुलाब, अंगाचा दाह अशा अनेक त्रासांमध्ये कोकम खाण्याचे फायदे होतात. एवढंच नाही तर कोकमापासून तयार केलेल्या तेल आणि क्रीमचा वापर तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील करू शकता. यासाठीच जाणून घ्या आमसूल खाण्याचे फायदे (Benefits Of Amsul In Marathi)
Table of Contents
कोकम किंवा आमसूल म्हणजे काय | Meaning Of Amsul In Marathi
कोकम हे लाल रंगाचं आंबटगोड चवीचं फळ आहे. साधारणपणे कोकण प्रांतात म्हणजेच समुद्र किनारच्या भागात कोकमाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. कोकमाचे फळ सोलून ते मिठाच्या पाण्यात बुडवून कडक उन्हात वाळवले जाते. या खारवलेल्या सालीला आमसूल (Amsul Marathi) असं म्हणतात. साधारणपणे उन्हाळ्यात कोकणात कोकमापासून मोठ्या प्रमाणावर आमसूल आणि आगळ तयार करण्यात येतो. कोकमाची साल मिठाच्या पाण्यात सुकवताना त्यातून तो रस निघतो तो आगळ म्हणून वापरतात. त्यामुळे बारा महिने या प्रांतात आमसूल, कोकम सरबत आणि आगळ विक्रीसाठी उपलब्ध असतात. कोकणात अनेक पदार्थांमध्ये या आमसूल मोठ्या प्रमाणावर जाते. अनेक प्रकारच्या भाजी, चटणी, सोलकढी, कोकमाचे सार,माशाचे सार, माशाचे तिखलं, कोकमाचे सरबत करण्यासाठी आमसूल वापरले जाते.
आरोग्यासाठी आमसूल खाण्याचे फायदे | Health Benefits Of Amsul In Marathi
कोकमात अनेक पोषक घटक असतात. ज्याचा तुमच्या शरीरावर चांगला फायदा होतो. कोकमातील व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर्स आणि पाचक घटकांमुळे आहारात त्याचा वापर करणं फारच गरजेचं ठरतं. जाणून घ्या आमसूल चे फायदे (Amsul Benefits In Marathi)
रोगप्रतिकार शक्ती वाढते
कोकमामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की कोकमातील पोषक तत्त्व तुमचे आजारपणापासून संरक्षण करतात. ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांनी कोकमाचे सार अथवा सरबत नियमित पिणे गरजेचं आहे.ज्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही शिवाय तुमची प्रतिकार शक्ती अधिक मजबूत होईल. यासोबतच जाणून घ्या प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)
वजन नियंत्रित राहते
आजकाल वाढते वजन ही अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. मात्र जर तुमच्या आहारात नियमित कोकम असेल तर तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. कारण कोकमाच्या फळात कोणतेही सॅच्युरेटेड फॅट्स नाहीत शिवाय त्याच्यामधील कॅलरिजचे प्रमाणही इतर फळांच्या मानाने कमी आहे. म्हणूनच कोकमाचा आहारात समावेश केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
ह्रदयासाठी उत्तम
कोकमाचा समावेश आहारात असेल तर तुम्हाला ह्रदयसमस्या कमी जाणवतात. कारण यामुळे तुमचे ह्रदय रोगापासून संरक्षण होते. कोकमाच्या फळात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, बी कॉप्लेक्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असे पोषक घटक असतात. ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीराला या पोषक घटकांची गरज असते. सहाजिकच जेव्हा तुमच्या आहारात कोकम असतं तेव्हा तुम्हाला ह्रदयविकार अथवा स्ट्रोक येण्याचा धोका कमी असतो. ह्रदयाचे कार्य उत्तम चालण्यासाठी आहारात कोकमाचा समावेश करणं नक्कीच उत्तम ठरेल.
मधुमेह नियंत्रणात राहतो
कोकमामध्ये अॅंटि डायबेटिक गुणधर्म असतात. आमसूल चे फायदे (Amsul Benefits In Marathi) अनेक आहेत त्यातील एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मधुमेहींसाठी कोकम वरदान ठरू शकते. कोकमामध्ये असलेल्या अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीरात इन्सुलीनची निर्मिती नियंत्रणात राहते.ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि मधुमेहींच्या समस्या नियंत्रणात राहतात. त्यामुळे जर तुम्ही मधुमेही असाल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोकमाचा समावेश करा.यासाठीच जाणून घ्या कसा असावा मधुमेहींचा आहार
चिडचिड आणि नैराश्य कमी होते
आजकालची धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताणतणाव याचा नकळत परिणाम तुमच्या स्वभाव आणि आरोग्यावर होत असतो. या जीवनशैलीमुळे अनेक जण नैराश्याच्या आहारी जातात. सतत काम करताना चिडचिड होत असेल तर वेळीच योग्य ते उपचार करणं नक्कीच गरजेचं आहे. कोकमामध्ये फ्लेवॉनॉइड, अॅंटि ऑक्सिडंट भरपूर असतात. ज्यामुळे तुमच्या मेंदूला शांतता मिळते. ज्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो आणि नैराश्यामधून बाहेर पडण्यास मदत होते.
पचनशक्ती सुधारते
आजकाल चुकीच्या आहारशैलीमुळे अनेकांना अपचनाच्या समस्या जाणवतात. पोट फुगणे, गॅस होणे, उलटी, जुलाब असे त्रास अनेकांना वारंवार जाणवतात. यासाठी तुमची पचनशक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. जर तुमच्या आहारात कोकमाचा समावेश असेल तर तुमचा अपचन, मुळव्याधी, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण कोकम एक पाचक फळ आहे. यासाठी दररोज आहारात सोलकढी, कोकमाचं सार यांचा समावेश जरूर करा.
मूड सुधारतो
कोकमाच्या फळाचा मानसिक स्वास्थावर चांगला परिणाम होतो. कोकमाच्या सेवनामुळे चिडचिड, ताणतणाव, नैराश्य दूर होण्यास मदत होते. कोकमाचे सरबत पिण्याने मनाला शांतता वाटते आणि मूड लगेच चांगला होतो कारण कोकमामध्ये तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स संतुलित करणारे गुणधर्म असतात. कोकमामुळे मेंदूला चालना मिळते आणि उत्साह वाढतो. मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर मूड चांगला करण्यासाठी तुम्ही कोकमाचे सरबत पिऊ शकता.
अॅंटि फंगल
कोकमातील अॅंटि फंगल आणि अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे कोणत्याही इनफेक्शनपासून तुमचे रक्षण होते. शिवाय कोकम टिकवून ठेवता येत असल्यामुळे तुम्ही वर्षाचे बारा महिने त्याचा वापर करू शकता. ज्यामुळे वर्षभर तुम्हाला आहारात कोकमाचा वापर करता येतो. कोकमाचा वापर करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. जर तुम्हाला सतत फंगल इनफेक्शनचा त्रास होत असेल तर आहारात कोकमाचा वापर करणे नक्कीच फायद्याचे ठरेल.
सौंदर्यासाठी आमसूल चे फायदे | Beauty Benefits Of Amsul In Marathi
कोकमाचा फायदा आरोग्यावर जितका होतो तितकाच तुमच्या केस आणि त्वचेवरही होतो. कोकम तेल अथवा क्रीमचा वापर तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील करू शकता. यासाठीच जाणून घ्या कोकम फायदे (Amsul Benefits In Marathi)
पायांच्या भेगा दूर होतात
हिवाळ्यात पायाच्या टाचांना भेगा पडण्याचा त्रास अनेकांना जाणवतो. कोरडे हवामान आणि त्यामुळे होणारी कोरडी त्वचा याचा परिणाम पायाच्या टाचांवर होतो. पायाच्या टांचाना भेगा पडल्या की त्यातून रक्त येते आणि साधे चालणेदेखील कठीण होते. यासाठीच वेळीच पायाच्या भेगांवर उपचार करायला हवेत. कोकम तेल पायाला लावण्यामुळे पायाच्या भेगा कमी होतात आणि पाय मुलायम दिसू लागतात. यासाठी हिवाळ्यात घरात कोकमाचे तेल असायलाच हवं. याशिवाय पायांच्या भेगांपासून जास्त त्रास होत असेल तर, घरच्या घरी करा ‘हे’ उपाय (How To Heal Cracked Heels In Marathi)
स्किन केअर
कोकमातील अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे तुम्ही याचा वापर केस आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी नक्कीच वापरू शकता. कोकमाच्या तेलामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायमपणा होते. विशेषतः थंडीच्या दिवसात कोकमतेलाचा वापर जरूर करावा. कोकम तेलाला काही लोक मुठीया असंही म्हणतात. ते वितळवून ते त्वचेवर लावलं जातं. ज्यामुळे त्वचेचं पोषण होतं आणि त्वचा कोरडी पडत नाही. हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी हा नैसर्गिक घरगुती उपाय तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल. स्किन केअर प्रॉडक्टमध्येही यामुळे आजकाल कोकम तेल आवर्जून वापरले जाते.
भाजलेली जखम लवकर बरी होते
कोकमाचे तेल अथवा मुठिया या एखाद्या मलमाप्रमाणे कार्य करतात. ज्यामुळे भाजण्यामुळे झालेली एखादी जुनाट अथवा मोठी जखम लगेच भरून निघते. पूर्वीच्या काळी जखमा बऱ्या करण्यासाठी कोकम तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. कोकमातील अॅंटि बॅक्टेरिअल घटक जखमांना चिघळू देत नाहीत आणि नवीन त्वचेचा थर लवकर निर्माण करण्यास मदत करतात. म्हणूनच घरात स्वयंपाक करताना भाजल्यास एखादी छोटी जखम बरी करण्यासाठी कोकमाचे तेल प्राथमिक उपचार म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही.
शरीराला नैसर्गिक थंडावा देते
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना पित्ताचा त्रास जाणवतो. मात्र जर तुमच्या अंगावर पित्ताचे चट्टे, पुरळ उठत असेल आणि त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर कोकम तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. कोकमाचं सरबत पिण्यामुळे तुमची पित्ताची समस्या कमी होऊ शकते. कारण कोकमाचे फळ हे शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे आहे. यासाठीच उन्हाळ्यात कोकमाचे सरबत अथवा सोलकढी पिण्यास चांगला फायदा होतो.
केसांसाठी उत्तम
कोकम त्वचेप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. कारण कोकमाचे तेल अथवा कोकम बटर वापरल्यामुळे केसांना व्हिटॅमिन ईचा पूरवठा होतो. ज्यामुळे केसांच्या वाढीसाठी चालना मिळते. केसांच्या मुळांनान नारळाच्या तेल आणि कोकमाचे तेल लावण्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या दूर होते. स्काल्पचे योग्य पोषण झाल्यामुळे केसांच्या अनेक समस्या कोकम तेलामुळे कमी होतात. यासाठी अनेक हेअर प्रॉडक्टमध्ये कोकम तेलाचा वापर केला जातो.
कोकम खाण्याचे फायदे आणि निवडक प्रश्न – FAQ’s
1. कोकमाचा वापर कसा करावा ?
कोकमाचा वापर निरनिराळ्या प्रकारे केला जातो. स्वयंपाकात भाजी, चटणी, सोलकढी, सरबत, सार करण्यासाठी तुम्ही कोकमाचे आमसूल आणि आगळ वापरू शकता. त्याचप्रमाणे कोकमाचे तेल तुम्ही त्वचा, केसाचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरू शकता.
2. कोकमाचे दुष्पपरिणाम काय आहेत ?
कोकमाचे काही दुष्पपरिणाम देखील नक्कीच आहेत. जर तुम्हाला आमसुलाची अॅलर्जी असेल तर त्वचेवर कोकमतेलाचा वापर करणं टाळा. त्याचप्रमाणे कोकमाचे अती प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या शरीरावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. शिवाय ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी कोकमाचा वापर कमी प्रमाणात केलेलाच बरा.
3. कोकमाचे फळ कच्चे खाणं योग्य आहे का ?
कोकमाचे फळ कच्चे खाल्ले जाते. आंबटगोड चवीचे कोकमाचे फळ खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र ते अती प्रमाणात खाऊ नये. कोकमाचे फळ खाण्यापूर्वी ते काही काळ थंड पाण्यात बुडवून ठेवावे.