“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे”. मात्र आजकाल सुखवस्तू जीवनशैली आणि पैसे कमाविण्याची शर्यंत यांच्यामागे धावता माणसाला निरोगी आयुष्य दुर्मिळ झाले आहे. हिंदीमध्ये ‘शिर सलामत तो पगडी पचास’ अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे जर शरीर सुदृढ असेल तरच जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा आनंद आपण लुटू शकतो. भरपूर धन-दौलत आणि यश मिळालं पण शरीर प्रकृती खराब झाली तर या यशाचा आणि संपत्तीचा काहीच फायदा होत नाही. जीवनात जर काही महत्त्वाचं आणि अमुल्य असेल तर ते आहे मानवी शरीर. मात्र निसर्गाकडून माणसाला मानवी शरीर अगदी फुकट मिळाल्यामुळे त्या शरीराचे महत्व वाटत नाही. जेव्हा शरीराचा एखादा अवयव बिघडतो अथवा आरोग्य बिघडते तेव्हा कितीही पैसे खर्च केले तरी ते जसेच्या तसे पुन्हा मिळवणे कठीण जाते. उशीर झाल्यावर शहाणपण येण्यापेक्षा वेळीच प्रयत्न करणे नेहमीच चांगले. निरोगी राहण्यासाठी मानवी शरीराला नियमित व्यायाम, सतुंलित आहार आणि सकारात्मक विचारांची गरज असते.
आजकाल फिटनेस आणि सौंदर्याबाबत सर्वच जागरूक होताना दिसत आहेत. मात्र धावत्या जीवनशैलीमुळे फिटनेसबाबत जागरूक असूनही व्यायामासाठी पुरेसा वेळ आणि संतुलित आहार घेणे शक्य होतेच असे नाही. शिवाय प्रत्येकीलाच आपण आयुष्यभर सुंदर दिसावं असं वाटत असतं. असं चिरतरूण दिसण्यासाठीदेखील निरोगी जीवनशैली फार महत्त्वाची आहे. यासाठीच जीवनशैलीत काही विशिष्ठ बदल करून आणि नियमित काही गोष्टी कटाक्षाने करून तुम्ही कसे निरोगी ठेवू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत निरोगी आरोग्यासाठी टिप्स शेअर करीत आहेत.
निरोगी राहायचं आहे मग फॉलो करा या आरोग्य टिप्स (Marathi Health Tips)
फिटनेसची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत काही विशिष्ठ बदल करणं गरजेचं आहे. काही Health Tips In Marathi फॉलो करून तुम्ही तुमचं आयुष्य निरोगी ठेवू शकता.
सकाळी लवकर उठा (Wake Up Early In The Morning)
“लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्यसंपदा लाभे” असं म्हटलं जातं. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी लवकर उठण्याची सवय लावली पाहीजे. मात्र आजकालची जीवनशैली पूर्वीप्रमाणे नाही त्यामुळे अनेकलोक रात्री उशीरा झोपतात. रात्री उशीरा झोपल्यामुळे सकाळी लवकर उठण्यााठी त्रास होतो. यासाठी शक्य असल्यास रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल. मात्र रात्री उशीरा झोपण्याची इतकी सवय लागलेली असते की प्रयत्न करूनही रात्री लवकर झोप येत नाही यासाठी आम्ही दिलेले हे उपाय जरूर करा. अगदी पहाटे नाही पण कमीतकमी सकाळी सहा अथवा सातच्या आधी उठण्यासाठी तुम्हाला रात्री कमीतकमी साडे- दहा ते अकरा वाजेपर्यंत झोपावे लागेल. यासाठी रात्री उशीरापर्यंत टीव्ही,मोबाईल पाहणे बंद करा. झोपण्याआधी अर्धा तास गॅझेट्स बंद करण्याचा प्रयत्न करा. उशीरापर्यंत लॅपटॉपवर काम करणे अथवा पुस्तक वाचणे टाळा. कारण त्यामुळे तुमच्या मेंदूला झोपेचा संदेश मिळत नाही. बेडरूममधील मंद उजेडाचे दिवे लावा अथवा संथ चालीचे संगीत ऐका ज्यामुळे तुम्हाला झोप लवकर येईल. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि दिवसभर फ्रेश वाटेल.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायामाबद्दल देखील वाचा
नियमित व्यायाम करा (Exercise Regularly)
फिट राहण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करण्यासाठी सवय लावावी लागेल. कारण व्यायामामुळे शरीर निरोगी आणि फ्रेश होतं. दिवसभरात कितीही कामाचा व्याप असला तरी कमीतकमी पंधरा ते वीस मिनीटे स्वतःच्या निरोगी जीवनासाठी काढणे मुळीच कठीण नाही. यासाठी सकाळी लवकर उठा आणि वीस ते तीस मिनीटे व्यायाम करा. फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम हा करायलाच हवा. दिवसभरातून तीस मिनीटे रोज व्यायामासाठी देणं फार अवघड नक्कीच नाही. निरोगी जीवनशैलीसाठी चालणे, जॉगिंग, कार्डियक एक्सरसाईज असे व्यायाम करणे फार गरजेचे आहे. व्यायामासाठी अनेकजणी जीम जॉईंट करतात. मात्र सुरुवातीला काही दिवस जीमला गेल्यावर त्यांचा उत्साह बारगळतो आणि जीमला जाणं पुन्हा बंद होतं. यासाठी आठवड्याचा दिनक्रम आधीच ठरवा. आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस जीमला जाण्याचा प्रयत्न करा. कारण केवळ चालणे फिट राहण्यासाठी पुरेसे नाही. पाच दिवसांपैकी तीन दिवस कठीण व्यायाम आणि दोन दिवस हलके व्यायाम करा. ज्यामुळे तुम्हाला व्यायामाचा अधिक ताण जाणवणार नाही.
योगासने आणि प्राणायमांचा सराव करा (Yoga And Pranayam)
योगासने आणि प्राणायमदेखील फार महत्त्वाचे आहेत. योगासने केल्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात आणि प्राणायमामुळे तुमच्या श्वासावरील नियंत्रण वाढते. योगासने आणि प्राणायमामुळे तुमच्या शरीराला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहतो. अशी अनेक योगासने आहेत ज्यामुळे तुमच्या आरोग्य समस्या दूर होऊ शकता. मात्र या योगासने आणि प्राणायमाचा सराव हा योग्य तज्ञांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे. व्यायामाच्या आठवड्याच्या दिनचर्येमध्ये काही मिनीटे योगासने आणि प्राणायमासाठीदेखील द्या. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल.
ध्यानधारणा (Meditation)
ध्यानधारणा आणि प्रार्थना याचा जीवनावर नेहमीच सुपरिणाम होत असतो. यासाठी दैनदिन जीवनात सकाळी अथवा संध्याकाळी काही मिनीटे ध्यानधारणेसाठी अवश्य काढा. ध्यानधारणेचा संबध थेट तुमच्या मनासोबत जोडला जातो. मन हे एवढं शक्तीशाली आहे की ते तुम्हाला जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी प्राप्त करून देऊ शकतं. मनातील विचारांचा तुमच्या आरोग्यावरदेखील परिणाम होत असतो. शिवाय सकाळी मेडीटेशनमुळे तुमच्या दिवसाची सुरूवात फ्रेश आणि सकारात्मक होते. जर रात्री मेडीटेशन अथवा प्रार्थना केली तर तुम्हाला चांगली झोप मिळते. रात्री गाढ झोप लागल्यामुळेदेखील तुम्ही सकाळी उठल्यावर फ्रेश दिसता ज्याचा परिणाम तुमच्या दिवसभरातील कामावर होत असतो. त्यामुळे नियमित मेडीटेशन आणि प्रार्थना अवश्य करा.
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा ‘हे’ थोडेसे बदल
सकारात्मक विचार (Positive Thinking)
विचार आपल्या जीवनावर परिणाम करीत असतात. सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही नेहमी फ्रेश राहू शकता. सकारात्मक विचारांचा तुमच्या शरीराप्रमाणेच संपूर्ण व्यक्तिमत्वावरच चांगला परिणाम होतो. सकारात्मक विचार करणारे लोक नेहमी सर्वांना आवडतात. शिवाय सकारात्मक विचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टीच घडतात.
संतुलित आहार (Balanced Diet)
संतुलित आहार निरोगी जीवनासाठी गरजेचा आहे. सतत जंक फूड आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा यांचा आहारात समावेश करा. दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी प्या. सकाळचा नास्ता करण्यास कधीच टाळाटाळ करू नका. यासाठी तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी बनवा ‘ह्या’ रेसिपीजने (Healthy Breakfast) डाएट करताना तुमचे योग्य पोषण होत आहे का हे अवश्य तपासा कारण चुकीच्या डाएटमुळे तुमच्या शरीरप्रकृतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.
वाचा – महिला दिवस कोट
आत्मविश्वास वाढवा (Be Confident)
फिट राहण्यासाठी आत्मविश्वास असणेदेखील तितकेच गरजेचे आहे. आत्मविश्वास कमी असल्यामुळे जर तुम्ही सतत निराश आणि उदासीन असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो. आत्मविश्वासाने जगल्यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहते.
मद्यपान आणि धुम्रपान टाळा (Avoid Alcohol and Smoking)
आयुष्यात कोणतीही परिस्थिती असेल तरी व्यसनांच्या आहारी मुळीच जाऊ नका. शिवाय आजकाल अनेकींना फॅशन अथवा थ्रील म्हणून सहज धूम्रपान आणि मद्यपान करण्याची सवय असते. धूम्रपान आणि मद्यपानाचे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. यासाठी जाणिवपूर्वक व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
भरपूर पाणी प्या (Drink Plenty of Water)
निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेश्या पाण्याची गरज असते. पाण्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहतं. निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेश्या पाण्याची गरज असते. पाण्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहतं. डिहायड्रेशन झाल्यास तुमची त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते. निरोगी त्वचेसाठी स्वतःला डायड्रेट ठेवा. डिडायड्रेशनचा थेट प्रभाव तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीराला देखील भोगावे लागतात. एका संशोधनानूसार, तुमच्या शरीराला पुरेसा पाण्याचा पुरवठा झाल्यावरच तुमच्या त्वचेसाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा त्वचेला केला जातो. यासाठी सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी पुरेसं पाणी प्या.
छंद जोपासा (Play Games)
जर तुम्हाला तुमच्या शरीराला सुडौल शेप द्यायचा असेल तर आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस तुमच्या आवडीचा खेळ खेळा. जर तुम्हाला खेळ खेळण्यात रस नसेल तर कोणतीही एखादी एक्टिव्हिटी जसे की स्केटींग, डान्स, स्विमिंग तुम्ही करू शकता.
वाचा – पुणेकरांच्या फिटनेससाठी बेस्ट जिम्स
नियमित हेल्थ चेकअप करा (Regular Health Checkup)
निरोगी राहण्यासाठी वर्षांतून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करणं फारच गरजेचं आहे. कारण काही सायलेंट विकार असतात
ज्यांची लक्षणे पटकन दिसून येत नाहीत. असे आजार वेळेवर समजले तर योग्य उपचार करून निरोगी राहता येऊ शकतं. महिलांनी चाळीसीनंतर दरवर्षी हेल्द चेकअप करणे अत्यंत महत्वाचे आहे.
या काही सोप्या आणि सहज आरोग्यासाठी टिप्स तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.
FAQ’s
1. दिवसभर ऑफिस आणि घरातील कामातून फिटनेससाठी वेळ कसा काढावा ?
फिटनेससाठी वेळ काढणं फार कठीण नाही. आधी सांगितल्याप्रमाणे उत्तम शरीर प्रकृतीला प्रत्येकाने प्राधान्य देणं आर गरजेचं आहे. जर तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला असाल तर तुमच्या ऑफिसमधील आणि घरातील कामाचे योग्य नियोजन करा. ज्यामुळे दिवसभरात वीस मिनीटे तुम्हाला व्यायामासाठी नक्कीच काढता येतील. शिवाय सकाळचा नास्ता करण्यास मुळीच विसरू नका. घराबाहेर असताना शक्य असल्यास पौष्टिक खाण्याचा प्रयत्न करा.
2. व्यायामासाठी योग्य वेळ कोणती ?
सकाळी उठल्यावर व्यायाम केल्यामुळे दिवसभर ताजे वाटते. मात्र सकाळी तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळीदेखील व्यायाम करू शकता. मात्र लक्षात ठेवा व्यायाम करण्यापूर्वी कमीतकमी दोन तास पोट रिकामे ठेवा. खाल्यानंतर लगेच व्यायाम करू नका.
3. ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करणाऱ्यांनी फिट राहण्यासाठी काय करावे ?
दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या लोकांनी फिटनेसबाबत जास्त जागरूक असणं फार गरजेचं आहे. कारण बैठ्या जीवनशैलीमुळे हळूहळू अनेक विकारांना तुम्ही आमंत्रित करत असता. यासाठी दररोज सकाळी नियमित व्यायाम करा. कमीतकमी तीस मिनीटे चाला. व्यायाम अथवा चालण्यास वेळ नसेल तर ऑफिस आणि घरी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. दर एक तासाने पाच मिनीटे ब्रेक घेऊन थोडे चाला. ज्यामुळे तुमच्या शरीराची थोडी हालचाल होईल. दर एक तासाने एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. दररोज सतुंलित आहार घ्या.
4. कोणत्या वयातील महिलांनी व्यायाम करणे गरजेचे आहे ?
खरंतर सर्वच वयोगटाच्या माणसांनी व्यायाम करायलाच हवा. मात्र महिलांना व्यायामाची अधिक गरज असते. महिलांना घर आणि ऑफिस अशी दोन्हीकडची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे अनेक महिलांना असे वाटत की कामातून त्यांचा आपोआप व्यायाम होत आहे. मात्र असे मुळीच नसते. व्यायाम आणि दगदग या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शरीराला दररोज पुरेश्या व्यायामाची गरज असते. म्हणून प्रत्येक वयातील महिलेने दिवसभरात कमीतकमी अर्धा तास व्यायाम करायलाच हवा. शिवाय महिलांना आयुष्यात मासिकपाळी, गरोदरपण, रजोनिवृत्ती अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. या टप्प्यांमध्ये त्यांच्यामधील हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होतात. ज्यामुळे त्यांची सतत चिडचिड होत असते. मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी महिलांनी व्यायाम आणि प्राणायम, मेडीटेशन जरूर करावे. ज्यामुळे त्यांना काम करण्याचा उत्साह आणि ऊर्जा मिळेल.
5. महिलांनी मासिकपाळीच्या काळात व्यायाम करावा का ?
होय, नक्कीच अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळामध्ये पोटात क्रॅंप येणे, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागतो. या त्रासांमुळे महिला मासिक पाळीच्या काळात व्यायाम अथवा प्राणायम करीत नाहीत. मात्र या काळात हलकी योगासने अथवा प्राणायम करण्यास काहीच हरकत नाही. जड व्यायामप्रकार अथवा जीममधील व्यायाम नक्कीच करू नयेत. मात्र चालण्यासारखा हलका व्यायाम जरूर करावा. कारण व्यायामामुळे तुमच्या मासिक पाळीच्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतील.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
You Might Like These:
Weight Loss Diet Plan In Marathi
Home Remedies For Weight Loss In Marathi
Hormonal Imbalance Causes In Marathi
बेलीफॅट कमी करण्यासाठी सोप्या टीप्स- Tips To Reduce Belly Fat
घरच्या घरी करा हे बेस्ट 25 एरोबिक्स व्यायाम प्रकार