हळद त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी हळद आहे एक आयुर्वेदिक औषध ही मसाल्यांच्या पदार्थांमधील एक प्रमुख घटक आहे. कारण हळदीशिवाय अनेक भारतीय पदार्थ तयारच होऊ शकत नाहीत. एवढंच नाही तर भारतीय आयुर्वेद शास्त्रातदेखील हळदीला अगदी महत्त्वाचं स्थान आहे. एखादी गंभीर जखम हळदीमुळे भरून निघू शकते तर हळदीचं दूध प्यायल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार पटकन बरे होतात. म्हणूनच अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी हळद एक गुणकारी औषधदेखील आहे. हळदीचा लेप लावल्यामुळे तुमचं सौदर्य अधिक खुलून येतं आणि चेहरा उजळतो म्हणूनच अनेक सौंदर्य उपचारांमध्ये हळदीचा आवर्जून वापर केला जातो. भारतासह अनेक दक्षिण आणि पूर्व आशियाई देशात हळदीचे उत्पादन केले जाते. यासाठीच जाणून घ्या हळदीचे फायदे (halad benefits in marathi) आणि हळदीचे उपयोग.
भारतात केला जाणारा हळदीचे उपयोग
हळदीत आहेत हे औषधी गुणधर्म
हळदीचे फायदे
हळदीचा वापर कसा करावा
त्वचेवर होणारे हळदीचे फायदे
भारतात केला जाणारा हळदीचे उपयोग (Turmeric Use In Marathi)
भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत जे हळदी शिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. म्हणूनच भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यात हळद ही असते. कारण हळदीचे अनेक उपयोग दैनंदिन जीवनात होत असतात. पिवळ्या धम्मक हळदीला एक उग्र सुवास असतो. चिमुटभर हळद खाद्यपदार्थांना एक विशिष्ठ स्वाद देते. खाद्यपदार्थांना हळदीमुळे पिवळा रंग मिळतो. ज्यामुळे पदार्थ दिसायला आकर्षकआणि चवीला स्वादिष्ट होतात. हळदीचा पिवळा रंग इतका गडद असतो की तो जर चुकून कपड्यांना लागला तर तो काढून टाकणे कठीण असते.
हळदीत आहेत हे औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Haldi In Marathi)
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे हळद अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. हळदीमध्ये असलेल्या अॅंटी ऑक्सिडंट, अॅंटी व्हायरल, अॅंटी फंगल, अॅंटी म्युटाजेनिक आणि अॅंटी इनफ्लेैमटरी गुणधर्मांमुळे आरोग्य समस्या कमी होतात. शिवाय खाद्यपदार्थांतून हळद नियमित पोटात गेल्यामुळे अनेक आरोग्य समस्या तुमच्यापासून दूर राहू शकतात. त्वचेवर हळदीचा लेप अथवा फेसपॅक लावल्यामुळे त्वचा समस्या कमी होतात. भारत आणि चीनमध्ये हळद प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरली जाते. आतातर पाश्चात्य देशात देखील हळद वापरण्यास सुरूवात झाली आहे.
हळदीचे फायदे (Halad Benefits In Marathi For Health)
हळद ही अनेक आजारांवर औषध म्हणून वापरली जाते यासाठीच जाणून घ्या हळदीचे फायदे
आर्थ्राटीसवर गुणकारी (Beneficial In Arthritis)
हळदीमध्ये अॅंटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे आर्थ्राटीसवर उपचार करण्यासाठी हळद गुणकारी ठरते. हळदीमधील अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्म पेशींचे नुकसान करणाऱ्या जीवजंतूंना नष्ट करतात. आर्थ्राटीसच्या रूग्णांना वेदना आणि सूजेपासून आराम मिळण्यासाठी हळद फारच उपयुक्त ठरते. असं असलं तरी केवळ हळद या आजारावर उपचार करण्यास समर्थ नाही. यामुळे रुग्णाला काही काळ आराम नक्कीच मिळू शकतो. मात्र इतर वैद्यकीय उपचारदेखील यासोबत घेणं फार गरजेचं आहे.
ह्रदयाचे आरोग्य सुधारते (Good For Heart)
ह्रदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण राखणे गरजेचं आहे. हळदीमधील करक्युमिन आणि व्हिटॅमिन 6 कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. ज्यामुळे तुमचे ह्रदय मजबूत आणि निरोगी राहते.
यकृताचे संरक्षण होते (Protects Liver)
हळदीमुळे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. यकृत डिटॉक्स झाल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यकृताचे इनफेक्शनपासून संरक्षण झाल्यामुळे यकृत निरोगी राहण्यास मदत होते.
अल्झामरपासून सुरक्षा मिळते (Protects Against Alzheimer)
हळदीमध्ये टरमेरॉन हा घटक तुमच्या मेंदूच्या पेशींना सुरक्षित ठेवतो. नियमित हळदीचे सेवन केल्यामुळे स्ट्रोक आणि अल्झामर सारख्या आजारांपासून सुरक्षा मिळते. याशिवाय हळदीतील गुणकारी घटकांमुळे अल्झामर रूग्णांची स्मरणशक्ती पुन्हा सुधारण्यास मदत होते. मेंदूचे कार्य सुधारते आणि मेंदूला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होतो.
मधुमेहावर गुणकारी (Benefitial In Diabetes)
हळदीमधील अॅंटी इनफ्लेेमटरी आणि अॅंटी ऑक्सिडंट गुणांमुळे प्री-डायबेटीजच्या रूग्णांना टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका टाळता येतो. शिवाय यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची निर्मिती वाढण्यास मदत होते. इन्शुलिनची निर्मिती योग्य प्रमाणात होऊ लागल्यास तुमच्या मधुमेहाच्या समस्येमधून तुम्हाला सुटका मिळू शकते. मात्र यासाठी वैद्यकीय उपचार करणे सोडू नये कारण प्रत्येकाच्या शरीरप्रकृतीनुसार उपचारांचा फरक जाणवत असतो. यासाठी हळदीच्या वापरासोबत वैद्यकीय उपचार आणि औषधेदेखील घेणे गरजेचे आहे.
वाचा – ब्लड प्रेशर कमी करण्याचे घरगुती उपाय
पचन क्रिया सुधारते (Improves Digestion)
पचनक्रिया बिघडली असल्यास कच्ची हळद फायदेशीर ठरते. कारण कच्ची हळद पचनक्रिया सुरळीत करते. कारण हळद पित्ताशयातील पित्ताच्या निर्मितीला अर्थात पित्ताच्या त्रासाला उत्तेजन देते. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होते. हळदीच्या वापरामुळे पोटातील गॅस आणि आतड्यांची सूजदेखील कमी होण्यास फायदा होतो.
गंभीर जखमा बऱ्या होतात (Heals Wounds)
पूर्वीच्या काळी जेव्हा जखम अथवा दुखापत होत असे तेव्हा त्याच्यावर हळदीचा लेप लावून उपचार केले जात असत. कारण हळदीमध्ये नैसर्गिक अॅंटी सेप्टिक आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे जखमांचे जंतूपासून संरक्षण होते, दाह कमी होतो आणि जखम भरून निघण्यास मदत होते. यासाठी जर तुम्हाला एखादी जखम झाली तर प्रथमोपचारांसाठी त्यावर शुद्ध हळद लावण्यास काहीच हरकत नाही.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Immunity Booster)
हळदीमधील अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी व्हायरल आणि अॅंटी फंगल गुणधर्मांमुळे माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी रोज रात्री एक ग्लास कोमट दुधात एक चिमुट हळद टाकून ते प्या. ज्यामुळे तुम्हाला ताप,सर्दी, खोकला होणार नाही.
हळदीच्या दूधाचे आरोग्यदायी फायदे (Turmeric Milk Benefits In Marathi)
शरीरावर बाहेरून अथवा अंतर्गत जखम झाल्यास ती भरून निघण्यासाठी हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. अंगदुखी कमी करण्यासाठीदेखील हळदीचे दूध फायदेशीर ठरते. सर्दी, खोकला झाल्यास हळदीच्या दूधाने घशाला आराम मिळू शकतो. हळदीच्या दुधामुळे छातीत साठलेला कफ कमी होण्यास मदत होते. श्वासाची समस्या असलेल्या लोकांनी हळदीचे दूध प्यायल्याने त्यांच्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि श्वास घेण्यास मदत होते.
पाण्यातून हळद घेल्याने काय फायदा होतो (Turmeric With Water)
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातून हळद घेतल्यामुळे पोट आणि छातीतील जळजळ कमी होते. ज्यांना सकाळी पोटात जळजळ अथवा अॅसिडिटीचा त्रास होत असेल त्यांना कोमट पाण्यातून हळद घेतल्यामुळे आराम मिळू शकतो.
हळदीचा वापर कसा करावा (Turmeric Uses In Marathi)
भारतीय स्वयंपाक घरात हळद ही असतेच. त्यामुळे तुम्ही अनेक खाद्यपदार्थांत हळद वापरू शकता. हळद एक औषधी गुणधर्म असलेला मसाला असल्यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या जेवणात दररोज हळद जाईल याची काळजी घ्या. भाजी, सार, आमटी, वरण, स्मूदी, गरम दूध, सूप, सॅलेड, पुलाव, बिर्याणी अशा अनेक पदार्थांमध्ये तुम्ही हळदीचा वापर करू शकता. यासोबत दररोज सकाळी हळद टाकलेलं कोमट पाणी प्या ज्यामुळे तुमचे आरोग्य अगदी चांगले राहील.
हळद कशी साठवून ठेवावी (How To Store Haldi)
जर तुम्ही ताजी आणि ओली हळद वापरणार असाल तर ती किसून एखाद्या हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. दोन ते तीन आठवडे तुम्ही ही हळद नक्कीच वापरू शकता. यासोबत ओली हळद स्वच्छ करून त्याचे तुकडे करूनदेखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेऊ शकता. अशा प्रकारे दोन ते तीन महिने तुम्ही हळद साठवून ठेवू शकता. वाळवलेली हळद चांगल्या वाटून त्याची पावडर करा. अशी हळद एक ते दोन वर्ष तुम्ही साठवून ठेवू शकता. मात्र हळद हवाबंद डब्यात ठेवा. कारण उघड्यावर ठेवल्यास ती लवकर खराब होऊ शकते. हळद नेहमी सेद्रिंय पद्धतीने उत्पादित केलेलीच घ्या.
वाचा – काळ्या मिरीचे औषधीय गुण
त्वचेवर होणारे हळदीचे फायदे (Halad Benefits In Marathi For Skin)
हळदीमध्ये अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळेडाग कमी होतात. तेलकट त्वचेच्या लोकांसाठी हळद गुणकारी आहे. यासाठीच भारतीय लग्नसमारंभात वर आणि वधूला हळद लावण्याची प्रथा आहे. हळद लावण्याचा विधी लग्नसोहळ्यात फार पवित्र मानला जातो.
हळदीचा फेसपॅक कसा कराल (Haldi Facepack)
हळदीमध्ये दूध, बेसण आणि मध टाकून एक पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा सुकल्यावर चेहरा स्वच्छ करा. या फेसपॅकमुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते.
त्वचेवर ग्लो येतो (Skin Glows)
हळद, ताजी साय, गुलाबपाणी यांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. ज्यामुळे चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो.
चेहऱ्यावर उजळपणा येतो (Brightness On Face)
बेसण, दही, हळद पावडर आणि पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर चेहरा धुवून टाका असे नियमित केल्यास तुमचा चेहरा नितळ आणि फ्रेश दिसेल.
त्वचेवरील डाग कमी होतात (Skin Blemishes Are Reduced)
सतत बदलणारे हवामान आणि प्रदूषण यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. कधी कधी पिंपल्समुळेदेखील चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. या काळ्या डागांना दूर करण्यासाठी हळद एक उत्तम उपाय आहे. यासाठी दोन चमचे हळद आणि चमचाभर दूध एकत्र करून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. महिन्यातून एकदा अथवा दोनदा हा उपाय करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करू शकता.
चेहऱ्यावरील केस कमी होतात (Facial Hair Are Reduced)
चेहऱ्यावरील केस दिसू नयेत यासाठी तुम्ही ब्लिचिंग करता. मात्र सतत ब्लिचिंग केल्यामुळे त्यातील केमिकल्समुळे तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. शिवाय चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठीदेखील हळद तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. यासाठी हळदीत कोमट नारळाचं तेल टाकून एक फेस पॅक तयार करा. चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा आणि काही मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. नियमित असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी होण्यास मदत होईल.
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते (Natural Glow On Face)
हळद, दूध आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागेल. दहा ते पंधरा मिनीटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर हाताच्या बोटांनी हलका मसाज करून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
हळद एक उत्तम स्क्रबर (Haldi As A Scrubber)
त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी हळद फारच उपयुक्त आहे. हळद आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर एखाद्या स्क्रबर प्रमाणे लावा आणि मसाज करा. दहा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. डेड स्किन निघून गेल्यामुळे आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तुमची त्वचा एकदम फ्रेश दिसू लागेल.
तेलकट त्वचेसाठी परफेक्ट (Perfect For Oily Skin)
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदन पावडर, हळद आणि संत्र्याचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा अथवा संत्र्यांच्या सालीचा फायदाही करून घेऊ शकता. या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि तुमची त्वचा नितळ आणि मऊ दिसेल.
स्ट्रेच मार्क्स कमी होतात (Reduces Stretch Marks)
चंदन पावडर, दूध, हळद आणि गुलाबपाणी स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. या सर्व घटकांना एकत्र करून त्याची पेस्ट तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर नियमित लावा. दररोज असे केल्यास हळू हळू तुमचे स्ट्रेच मार्क्स कमी होऊ लागतील.
पायांच्या टाचा सुंदर होतात (Heels Become Beautiful)
पायांच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर कधी कधी त्यातून रक्त येऊ लागतं. अशा वेळी पायांच्या टाचांना हळद आणि नारळाचं तेल एकत्र करून लावा. ज्यामुळे तुमच्या टाचांना आराम मिळेल.
पिंगमेंटेशन कमी होतं (Reduces Pigmentation)
जर वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर पिंगमेटेशनच्या खुणा दिसू लागल्या असतील तर त्यावर हळदीचा लेप जरूर लावा. हळदीमुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होऊ लागेल.
हळदीचे दुष्परिणाम (Side Effects Of Turmeric In Marathi)
हळदीचे अनेक आरोग्य, सौंदर्यांवर चांगले फायदे होत असले तरी हळद नेहमी प्रमाणातच वापरावी. कारण अती प्रमाणात हळद सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागू शकतात. कोणताही पदार्थ अती प्रमाणात वापरणे नुकसान कारक ठरू शकते. त्यामुळे हळद प्रमाणातच सेवन करा. अती प्रमाणात हळद सेवन केल्यास पोटाच्या समस्या, चक्कर येणे, मळमळ अथवा उलटीचा त्रास होऊ शकतो. शिवाय वापरण्यापूर्वी ती भेसळयुक्त नाही याची खात्री जरूर करून घ्या.
गरोदरपणात हळदीचा वापर अती करू नका (Avoid Turmeric During Pregnancy)
हळदीमुळे मासिक पाळीला उत्तेजन मिळते. कारण हळदीमुळे गर्भाशयाच्या कार्यात बदल होतो. यासाठी गरोदरपणी हळद कमी प्रमाणात वापरण्याचा सल्ला दिला जातो.
किडनीस्टोनच्या रूग्णांनी हळद कमी प्रमाणात वापरावी (Avoid For Kidney Stones Patients)
अती प्रमाणात हळद सेवन केल्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. यासाठीच हळद अती प्रमाणात वापरणे नुकसानकारक ठरू शकते.