बरेचदा खाण्यामध्ये असे काही घटक येतात की, त्याचा परिणाम हा आरोग्यावर होऊ लागतो. पित्तासंदर्भात होणारा त्रास म्हणजे अंगावर पित्त उठणे. खूप जणांना अंगावर पित्त उठण्याचा त्रास होतो. यालाच पित्ताचे चट्टे उमटणे किंवा शरीरावर गांध उमटण्याचा त्रास होणे असे म्हणतात. पित्ताचे हा प्रकार हा ‘शीतपित्त’ या नावाने ओळखला जातो. शीतपित्ताचा त्रास हा आहारात नको असलेले पदार्थ आल्यामुळे होतो. एखाद्या पदार्थाची एलर्जी तुम्हाला असेल तर त्याचे चट्टे शरीरावर उमटू लागतात. हे चट्टे उमटले की, त्वचेवर विलक्षण खाज उठायला सुरुवात होते. ही खाज इतकी तीव्र असते की, शरीरावर त्यामुळे जखमा ही होऊ शकतात. काही पदार्थ असे असतात की, ज्यामुळे असे डाग येऊ शकतात. सर्वसाधारणपणे अंडी, शेंगदाणे, काजू, मासे, हरभरा, गहू, तूर, मासांहार, काही फळे आहारात आल्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो. पित्तामध्ये तुमच्याही संपूर्ण अंगावर चट्टे उठून आग आग होत असेल तर तुम्हाला झालेला हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. अंगावर पित्त उठणे घरगुती उपाय (Urticaria Treatment In Marathi) हे उपाय घरीच करणे सोपे आहे. जाणून घेऊया पित्तावर घरगुती उपाय.
कोकम (Kokam)
अनेकांच्या घरी जेवणात कोकमाचा वापर सर्रास करतात. कोकम हे चवीला आंबट असते. एखाद्या पदार्थाची चव वाढवण्याचे काम ते करते. कोकमाचा उपयोग करुन सोलकढी तयार केली जाते. कोकम हे पचनाला मदत करते. कोकम किंवा आमसूल हे शीत पित्तावरील चट्टे घालवण्यासाठी फारच योग्य आहेत. पित्तावर घरगुती उपाय यामधील हा एक उत्तम असा उपाय आहे. कोकममध्ये असलेले घटक पित्ताचे गांध आलेले डाग कमी करण्यास मदत करतात.
असा करा वापर: तुमच्याकडे छान ओली कोकमं असतील तर ती थेट तुम्ही तुमच्या चट्ट्यांवर लावू शकता. शरीरावर आलेली खाज शमवण्यासाठी कोकम हा उत्तम इलाज आहे. आता जर तुम्हाला कोकम त्वचेवर चोळायची नसेल तर तुम्ही कोकमाचा रस घेऊ शकता. कोकमाच्या रसात, भाजलेली जीरा पूड आणि साखर घालून त्याचे सेवन करा तुम्हाला आराम मिळेल
आवळा सरबत (Amla Juice)
शीत पित्तावर आवळा रस ही अत्यंत गुणकारी आहे.आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते. त्यामुळे तुम्हाला पित्तापासून सुटका होण्यास मदत मिळते. पित्तावर घरगुती उपाय (Angavar Pitta Uthane Upay) म्हणून हा नक्की करून पाहा.
असा करा वापर: तुम्हाला पित्ताच्या चट्ट्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही रोज आवळ्याच्या रसाचे सेवन करा तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. ज्यावेळी तुम्हाला पित्ताचे चट्टे आले असतील त्यावेळी आवळ्याचा रस प्या. जर रस प्यायचा नसेल तर तुम्ही आवळ्याचा रस तुम्ही त्यावर लावा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.
हळद (Turmeric)
हळद ही पित्तावर उत्तम काम करते. शीत पित्तावर बडीशेप आणि जीरंही खूप गुणकारी आहे. हळदीचे सेवन करताना तुम्ही या काही गोष्टी लक्षात ठेवा.
असा करा वापर: तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही दररोज याचे सेवन करायला हवे. रात्री साधारण अर्धा चमचा बडीशेप आणि जीरं पावडर (प्रत्येकी) भिजत घाला. सकाळी या पाण्यामध्ये चवीनुसार खडीसाखर ,हळद घालून हे पाणी उपाशीपोटी प्या तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
बडीशेपचे पाणी (Fennel Seeds)
बडीशेप ही देखील थंड आहे. जेवणानंतर बडीशेपेचे सेवन केले जाते. याचे कारणच पोटाला थंडावा मिळवण्याचे असते. आपण खालेल्या अन्नाच्या पाचक रसाचे रुपांतर कोणत्याही पित्तामध्ये होऊ नये आणि ते पचावे यासाठी बडिशेपे खाल्ली जाते. शीतपित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही बडीशेपेचे पाणी पिऊ शकता.
असा करा वापर: आदल्या रात्री एका ग्लासभर पाण्यात बडीशेप टाका. साधारण 1 चमचा बडीशेप टाका. ही बडीशेप छान भिजली की, असे पाणी घोट घोट प्या तुम्हाला नक्कीच त्यामुळे बरे वाटेल.
कोरफडचा रस (Aloe Vera Juice)
कोरफड ही देखील पित्त आल्यानंतर त्यावर ती चांगली काम करते. कोरफडीच्या रसामध्येही व्हिटॅमिन C चे घटक असतात. त्यामुळे शरीरातील पाचक रस योग्य करण्याचे काम कोरफडीचा रस करतो.
असा करा वापर: हल्ली बाजारात अगदी सहज कोरफडीचा रस रेडीमेड मिळतो. कोरफडीचा रस पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही कोरफडीचा रस पाण्यात घेऊन तो हळुहळू पिऊ शकता. कोरफडीच्या रसाचे सेवन तुम्ही रोजच्या रोज केले तरी देखील चालू शकते. त्यामुळे तुमची पित्ताची प्रक्रिया नियंत्रणात राहील.
केळी (Banana)
पित्तावर केळी ही देखील एक चांगला पर्याय आहे. खूप जणांना पित्त डोक्यात चढल्यानंतर डोकेदुखी, पोटात खड्डा पडणे असे काही त्रास होऊ लागतात. जर तुम्हाला पित्ताशी निगडीत असे त्रास होत असतील तर पित्त शांत करण्याचे काम केळी करते. कोणतेही पिकलेले केळं घेऊन ते खा. त्यामुळे पोटातत पडलेली आग, जळजळ आणि मळमळ कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल.
थंड दूध (Cold Milk)
दूध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. दुधाच्या सेवनामुळेही पित्तावर आराम मिळतो. खूप वेळा पित्ताचा त्रास झाल्यानंतर मळमळ, करपट ढेकर येऊ लागतात. अशा त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी थंड दूध हा एक उत्तम असा पर्याय आहे. पोटातील पित्ताशयाची जळजळ कमी करण्याची काम थंड दूध करते.
असा करा वापर: जर तुम्हाला शरीरावर असे चट्टे उमटलेले दिसत असतील तर तुम्ही एका ग्लासात थंड दूध घ्या. हे थंडगार दूध तुम्ही एक एक घोट घेऊन प्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
पुदिना (Pudina)
शीत पित्तावर पुदिनाही खूप छान काम करतो. पुदिन्याची पाने ही शरीरासाठी फारच चांगली असता. पुदिन्यामध्ये असलेले पाचक घटक हे शरीरातील पित्त आतल्या आत कमी करण्याचे काम करतात.
असा करा वापर: पुदिन्याच्या रसाचे सेवन केले तरी पित्ताचे चट्टे कमी होऊ शकतात किंवा काही पुदिन्याची पाने घेऊन ती छान उकळवून घ्या. उकळवताना त्यामध्ये साखर घाला त्याचा छान काढा तयार होतो. अशा पद्धतीने तुम्हाला पुदिन्याचा काढा बनवून त्याचे सेवन करा. दिवसातून किमान दोन ते तीनवेळा तरी तुम्हाला याचे सेवन करावे लागते त्यामुळे आराम मिळतो. आता जर तुम्हाला पुदिन्याचा हा काढा प्यायचा नसेल तर तुम्ही पुदिन्याच्या पानांचा नुसता रस काढून जरी अंगाला लावला तरी तुम्हाला आराम मिळेल.
खोबरेल तेल (Coconut Oil)
खोबरेल तेल हे देखील पित्ताचे चट्टे आल्यावर फायद्याचे ठरते. खोबरेल तेलावर दाह शमवण्याचे गुण असतात. त्यामुळे खोबरेल तेल हे देखील त्यावर फारच लाभदायी ठरते.
असा करा वापर: पित्ताचे चट्टे तुमच्या अंगावर आले असतील तर त्यावर आरम मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल लावाय खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचेचा दाह कमी होण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर हळुहळू पित्ताचे चट्टे कमी देखील होऊ लागतात.
लिंबू (Lemon)
लिंबू हे एक सिट्रेस वर्गातील फळ आहे. चवीला आंबट असलेले हे फळ तुम्हाला नक्कीच पित्तापासून आराम देऊ शकते. पित्ताशयावरील चट्टे आले असतील तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करु शकता.
असा करा वापर: लिंबाचा रस काढून तो पित्ताच्या चट्टयांवर लावा. जर तुम्हाला लिंबाच्या रसाने बरे वाटत नसेल तर तुम्ही लिंबू पाणी देखील पिऊ शकता. लिंबू पाणी प्यायल्यामुळेही तुम्हाला बरे वाटेल.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. पित्ताचे चट्टे किती काळापर्यंत शरीरावर राहतात ?
पित्त त्वचेवर उठल्यानंतर त्याचे चट्टे काही काळासाठी तरी शरीरावर राहतात. आता प्रत्येकाच्या शरीरावर या गोष्टी अवलंबून आहे. काहींच्या शरीरावरील पित्ताचे डाग हे काहीच काळात निघून जातात. म्हणजे साधारण उपाय केल्यानंतर 15 मिनिटात ते बसून जातात. तर काहींचे पित्ताचे डाग हे जाण्यासाठी तासाभराचा तरी कालावधी लागतो. त्यामुळे तुम्ही कोणता उपाय करता यावर पित्ताचे डाग शरीरावर राहण्याचा काळ अवलंबून आहे.
2. पित्ताचे चट्टे हा गंभीर आजार आहे का ?
पित्ताचे चट्टे हा तसा गंभीर आजार नाही. खूप वेळा शरीरातील गोष्टी बिघडल्या म्हणजेच शरीरात पित्त वाढले की, असा त्रास होऊ लागतो. काही जणांना शरीरावर चट्टे येत नाहीत. अशांना डोकेदुखी, पोटदुखी, मळमळणे किंवा उलटी होणे असा त्रास होऊ लागतो. पण काहीजणांना पित्ताचे चट्टे अंगावर येतात. हे चट्टे ही आपोआप जातात. पण ज्यावेळी हे चट्टे लवकर जात नाहीत. त्यावेळी शरीरावर खाज येऊ लागते. चट्टे जास्त खाजवले की, त्यामुळे त्वचेवरुन रक्त येणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला स्किन इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्या व्यतिरिक्त गंभीर असे काही त्रास होत नाहीत.
3. पित्ताशयाचे चट्टे आल्यानंतर कोणते खाद्यपदार्थ खाऊ नयेत ?
शरीरावर पित्ताशयाचे चट्टे उमटले असतील तर तुम्ही दूध, मासे, अंडी असे काही पदार्थ खाऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला पुन्हा पित्त होण्याचा त्रास होऊ शकतो. पित्ताचा त्रास झाल्यानंतर हलके फुलके आणि गरम पदार्थ खावेत त्यामुळे तुमचे पोटाचे आरोग्य चांगले होण्यास मदत मिळते.
4. पित्ताचे डाग येण्याची लक्षणे ?
तुम्हाला पित्त झाले आहे हे कळत नसेल तर तुम्हाला काही लक्षणे पित्ताचे चट्टे आल्यावर जाणवतील. पित्ताचे चट्टे आल्यानंतर तुम्हाला शरीरावर काहीतरी लाल- लाल आल्यासारखे वाटेल.त्वचा जाड जाड वाटू लागेल. त्वचेवर अचानक खाज येऊ लागेल. असे काही झाले की, पित्ताच्या डागांचा त्रास तुम्हाला झाला असे मसजून जावे.
अधिक वाचा :
पित्ताशयातील खडे घरगुती उपाय (Home Remedies For Pittashay Stone In Marathi)