ADVERTISEMENT
home / Diet
या कारणांसाठी पावसाळ्यात खा ‘मक्याचं कणीस’

या कारणांसाठी पावसाळ्यात खा ‘मक्याचं कणीस’

धो धो पडणारा मुसळधार पाऊस, हुडहुडी भरवणारी थंडी आणि मीठ, तिखट आणि लिंबूरस लावलेलं. खरपूस भाजलेलं मक्याचं कणीस. क्या बात है… नुसतं नाव काढताच तोंडाला पाणी सुटलं ना. पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याची मौजच न्यारी आहे. काहीजण याला भुट्टा असंही म्हणतात. पावसाळ्यात अनेक पर्यटन स्थळांवर भुट्टा विकणारे बसलेले असतात. त्यामुळे पावसाळी पिकनिकला गेल्यावर भुट्टयावर ताव मारण्याचा बेत हमखास ठरतो. मक्याचं कणीस खायला जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते आरोग्यासाठी उत्तम असतं.

shutterstock

मक्याच्या कणीसाचे आरोग्यदायी फायदे

शरीराला ऊर्जा मिळते

मक्याच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असते. शिवाय यामध्ये कार्बोहायड्रेट देखील अधिक असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.  यासोबतच मेंदू आणि त्याचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. कारण एक कप मक्याच्या दाण्यांमध्ये 29 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. म्हणूनच जर तुम्ही खेळाडू असाल अथवा तुम्ही शारिरीक मेहनत अधिक घेत असाल तर तुम्हाला मक्याचं कणीस खाण्याची अत्यंत गरज आहे.

ADVERTISEMENT

सर्दीचा त्रास कमी होतो

पावसाळा आला की सर्दी, खोकला ही आजारपणं आपोआप पाठी लागतात. कधी पावसात भिजल्यामुळे तर कधी बदललेल्या वातावरणामुळे तुम्हाला सर्दीचा त्रास होतो. जर तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल आणि नाक बंद झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा उपाय जरूर करा. मका खाऊन झाल्यावर उरलेल्या कणीसाचे दोन तुकडे करा आणि त्याच्या आतील भागाचा वास घ्या. मक्याच्या गंधाने तुमचे बंद नाक मोकळे होण्यास मदत होईल.

वजन नियंत्रणात राहतं

वजन जास्त असेल आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय करून तुम्ही थकला असेल तर मक्याचे दाणे तुमच्यासाठी फायद्याचे आहेत. कारण मक्याच्या दाण्यांमध्ये पुरेसे फायबर असते. यासाठी दररोज नास्त्यामध्ये उकडलेली मक्याचे दाणे खा. ज्यामुळे तुमचे पोट खूप वेळ भरलेले राहील आणि तुम्ही नको असलेले पदार्थ कमी प्रमाणात खाल. सहाजिकच पौष्टिक मक्याचे दाणे खाण्याने तुमचे योग्य पोषण देखील होईल.

shutterstock

ADVERTISEMENT

अॅनिमियावर गुणकारी

अॅनिमियाचं सर्वात महत्त्वाचं कारण रक्ताची कमतरता हे आहे. रक्त कमी असल्यामुळे तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं. मात्र मक्याच्या दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 12, लोह आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. मक्याचे दाणे नियमित खाण्यामुळे तुमचा अशक्तपणा कमी होऊ शकतो.

गरोदरपणात उपयुक्त

गरोदर महिलांनी त्यांच्या आहारात मक्याच्या दाण्यांचा जरूर समावेश करावा. कारण यामुळे तुमचे आणि तुमच्या गर्भाचे योग्य पोषण होते. कारण मक्यात फॉलिक अॅसिड भरपूर असते जे गरोदर महिलांसाठी उपयुक्त असते.

कर्करोगापासून बचाव होतो

आजकाल कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे. मात्र जर तुम्हाला कर्करोगापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर मका जरूर खा. एका संशोधनानूसार मक्याच्या दाण्यांमधील अॅंटीऑक्सिडंट कर्करोगापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे विशेषतः यकृत आणि स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

ADVERTISEMENT

shutterstock

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते

माणसाच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्टॉल असे दोन प्रकार असतात. जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढले तर ह्रदयरोगाचे प्रमाण वाढते. मात्र गुड कोलेस्ट्रॉल नियंत्रित असेल तर शरीर निरोगी राहते. मक्याच्या दाण्यांमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

पचनशक्ती सुधारते

मक्याच्या दाण्यांमध्ये आणि मक्याच्या पीठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात खालेल्या अन्नाचे योग्य पचन चांगले होते. यासाठी जेवताना मक्याचे सॅलेड जरूर खा.

मक्याच्या कणसापासून करा या स्वादिष्ट रेसिपीज

भुट्टा कसा तयार कराल –

ADVERTISEMENT

भुट्टा तयार करण्यासाठी मक्याचे कणीस सोलून घ्या. ते उकडून घ्या अथवा गॅसवर खरपूस भाजून घ्या. गरमागरम मक्याच्या कणसावर लिंबू, मीठ, तिखट, चाट मसाला अथवा आमचूर पावडर लावा आणि खा.

मक्याचे सॅलेड-

मक्याचे दाणे सोलून ते उकडून घ्या. उकडलेल्या दाण्यांवर हळद, तिखट, चाट मसाला, आमचूर पावडर टाका. हवं असल्यास कांदा आणि टोमॅटोचे तुकडे देखील तुम्ही या सलाडमध्ये टाकू शकता.

मक्याच्या दाण्यांचे कटलेट

ADVERTISEMENT

मक्याचे दाणे उकडून घ्या. दाणे मिस्करमध्ये वाटून ते उकडलेल्या बटाट्याच्या मिश्रणात टाका. या मिश्रणात हिरवी मिरची, कोथिंबीरीचे वाटण, हळद, तिखट, मीठ टाकून छोटे छोटे गोळे बनवा. हो गोळे ब्रेडक्रममध्ये घोळवा त्याला दोन्ही हातांनी थोडंसं प्रेस करून छान शेप द्या आणि शॅलोफ्राय करा. टोमॅटो सॉस आणि मक्याचे कटलेट तुमची पावसाळी संध्याकाळ अगदी बेस्ट करतील.

आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

अधिक वाचा

कढीपत्त्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू

ADVERTISEMENT

जाणून घ्या पोट कमी करण्यासाठी अकुंरित धान्य (Sprouts) कसे आहेत फायदेशीर

सौंदर्य खुलविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नियमित खा ‘पपई’

फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम

14 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT