ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
तूरडाळ बाधत असेल तर आहारात असाव्यात या डाळी

तूरडाळ बाधत असेल तर आहारात असाव्यात या डाळी

डाळ हा भारतीय घरात रोज खाल्ला जाणारा पदार्थ आहे. विशेषत: तूरडाळ ही जास्तीत जास्त खाल्ली जाते. तूरडाळ शिजवून त्याला वेगवेगळ्या चविष्ट फोडणी देऊन डाळ केली जाते. पण बरेचदा काही जणांना तूरडाळीचा त्रास होतो. तूरडाळ खाल्ल्यामुळे गॅस होणे, पिक्त पडणे, वात असे काही त्रास होऊ लागतात. अशांना तूरडाळ खाऊन चालत नाही. पण आहारातून डाळ वगळणे हे मुळीच चांगले नाही. कारण डाळीमध्ये असलेले पोषक घटक शरीराला आवश्यक असतात. अशावेळी या डाळींना पर्याय म्हणून तुम्ही काही अन्य डाळी खाऊ शकता.या डाळींचे सेवन आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते. चवीत फरक पडला तरी त्याचे दुष्परिणाम होत नाहीत.

 #FoodFact : डाळ-भात खा आणि निरोगी राहा

मूगडाळ

मूगडाळ

Instagram

ADVERTISEMENT

तूरडाळीला पर्याय म्हणून मूगडाळ ही नेहमी खाल्ली जाते. मूगडाळीपासून तयार केलेले वरण हे पचायला हलके असते. त्यामुळे त्याचा त्रासही होत नाही. मूगडाळ शिजवण्याची पद्धत ही तूरडाळीसारखी असते. मूगडाळ ही भिजत ठेवावी लागत नाही. ती कुकरमध्ये पटकन शिजते. पोटाचे काही विकार असतील किंवा शरीर कणल्यासारखे वाटत असेल अशावेळी मूगाची डाळ पोटाला आराम देण्याचे काम करते. त्यामुळे मूगडाळीचे सेवन हे आरोग्यासाठी फारच फायदेशीर ठरते.

अशा पद्धतीने तयार होईल घरीच थालिपीठाची परफेक्ट भाजणी

मसूर डाळ

मसूर डाळ

Instagram

ADVERTISEMENT

केशरी रंगाची ही डाळ चेहऱ्यासाठी अनेकदा वापरली जाते. पण आहारातही तिचा समावेश फारच फायदेशीर ठरतो. ही डाळही अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. मसूर डाळीला तूरडाळीच्या तुलनेत चव नसली तरी तिचे फायदे पाहता याचा समावेश आहारात करणे फायद्याचे ठरते. मसूर डाळीला तशी चव नसते त्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या डाळी मिक्स करुन त्याचा उपयोग करतात. तूरडाळीमध्ये मसूरडाळ घालूनही ही डाळ केली जाते. ही डाळ करताना फोडणी चुरचुरीत असली तरच ही डाळ चवीला छान लागते. 

सालवाली मूगाची डाळ

सालवाली मूगाची डाळ

Instagram

खिचडीसाठी वापरली जाणारी साल असलेली मुगाची डाळही फार पौष्टिक असते. या डाळीचा उपयोग करुनही तुम्हाला छान झणझणीत आणि थोडी हटके डाळ बनवता येऊ शकते. अनेकांच्या जेवणात साल असलेल्या मूगाच्या डाळीचा उपयोग केला जातो. ही डाळ पचते आणि याचा इतर कोणताही त्रास होत नाही. ही डाळ करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण ही डाळ छान शिजवून आणि घोटवून मगच त्याला फोडणी दिली जाते. त्यामुळेच या डाळीची चव वाढते.

ADVERTISEMENT

मिश्र डाळींपासून बनवा या हेल्दी रेसिपीज

मटकीची डाळ

मटकीची डाळ

Instagram

मटकीची उसळ ही तुम्ही आतापर्यंत  वाचली असेल पण तुम्ही कधी मटकीची डाळ ऐकवी आहे का? मटकीची डाळ ही आरोग्यासाठी चांगली असते. मटकीची डाळ अनेक ठिकाणी विकत मिळते. ज्याप्रमाणे मटकी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मटकीची डाळही आहारात समाविष्ट करण्यास काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

सगळ्या डाळींची चव ही वेगवेगळी असली तरी देखील तुम्ही आहारात समाविष्ट करताना त्याची फोडणी अधिक चांगली चुरचुरीत करा. त्यामुळे ती अधिक चविष्ट लागेल. तूरडाळीमुळे होणारा त्रास या डाळीमुळे होणार नाही.

09 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT