ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
रात्री जागरणामुळे लागत असेल भूक तर खा हे हलके पदार्थ

रात्री जागरणामुळे लागत असेल भूक तर खा हे हलके पदार्थ

आधुनिक युगात सर्वांची जीवनशैलीच बदलली आहे. ज्यामुळे जेवणाच्या चुकीच्या वेळा असणं, रात्री उशीरापर्यंत काम करणं, सकाळी उशीरा उठल्यामुळे रात्री उशीरा झोप न येणं हा जीवनशैलीचा एक भागच झाला आहे. जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसल्यामुळे अथवा रात्रीच्या जागरणामुळे तुम्हाला रात्री उशीरा भूक लागू शकते. रात्री भूक लागली की भूक भागवण्यासाठी हाताला जो पदार्थ मिळेल तो खाल्ला जातो. रात्री सहसा ब्रेड, इन्संट पिझ्झा, पास्ता, न्यूडल्स अथवा माव्याची बिस्किटे, केक, फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले असे पचायला जड आणि अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. एकतर हे पदार्थ पचायला जड असतात शिवाय ते पौष्टिकही नसतात. ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला पित्त, अपचन, पोट दुखणे, गॅस होणे अशा आरोग्य समस्या जाणवू लागतात. अर्थातच यामुळे तुमची सकाळ फ्रेश न होता कंटाळवाणी आणि उदास होते. यासाठीच जाणून घ्या रात्री भूक लागल्यास नेमके कोणते पदार्थ खावे जे पचायला हलके आणि आरोग्यासाठी योग्य असतील. 

लो फॅट दूध

रात्री कधीही भुक लागली तर ती भूक भागवण्याचा सोपा प्रकार म्हणजे एक ग्लास दूध पिणं. दूध पिणं कधीही चांगलंच. पण जर तुम्ही रात्री उशीरा दूध पिणार असाल तर त्यासाठी लो फॅट दूध प्या. कारण यामध्ये फॅट्स कमी असतातच शिवाय त्यात असणाऱ्या ट्रिप्टोफेनमुळे तुमच्या शरीराला अमिनो अॅसिड मिळतं. स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करण्यासाठी अथवा शांत झोप लागण्यासाठी हे शरीराला गरजेचं असतं. शिवाय त्यातून शरीराला भरपूर प्रोटिन्स मिळतात आणि पचायला जड नसल्यामुळे पोट खूप भरल्यासारखं वाटत नाही.

पॉपकॉर्न

जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसतील तर रात्री जागरणामुळे लागणारी भूक भागवण्यासाठी पॉपकॉर्न खा. पॉपकॉर्न हा एक हलका स्नॅक्सचा प्रकार आहे. शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरिज आणि फायबर्स असतात. मात्र लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी बटरचा वापर न केरता रोस्ट केलेलेच पॉपकॉर्न खा. ज्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि तुम्हाला शांत झोपही लागेल. 

मूठभर सुकामेवा

रात्रीच्या वेळी जड पदार्थ खाणे टाळून अनेक हलके पदार्थ खाण्याचे पर्याय तुम्हाला घरातच मिळू शकतात. जसं की मूठभर ड्रायफ्रूट अथवा सुकामेवा खाणं. यासाठी रात्रीची भूक भागवण्यासाठी दहा बारा बदाम, थोडे शेंगदाणे, काजू, अक्रोड आणि पिस्ता मिक्स करून खा, सुकामेव्यात चांगले फॅट्स आणि प्रोटिन्स, फायबर्स असतात. ज्यामुळे तुम्हाला  लगेच भूक लागत नाही. पिस्त्यामध्ये तर मेलाटोनिनदेखील असते. पिस्ता रात्री झोपण्यापूर्वी खाण्यामुळे शांत झोप लागू शकते. 

ADVERTISEMENT

सफरचंद

घरात फळं तर असतातच त्यामुळे रात्री भुकेमुळे झोप लागत नसेल तर फळं खाणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र रात्री केळं, चिकू, अननस अशी गोड फळं खाण्यापेक्षा रात्रीच्या वेळी भूक लागली तर फक्त एक सफरचंद खा.  ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषक पदार्थ मिळतील. पोट पटकन भरल्यासारखं वाटेल आणि शांत झोपही लागेल. सफरचंद आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे रात्रीप्रमाणेच दिवसा एक सफरचंद प्रत्येकाने खायलाच हवं. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

हे घरगुती उपाय करतील भूक वाढविण्यास मदत

ADVERTISEMENT

वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे गोलो डाएट

भूक वाढवण्यासाठी उपाय, वापरा या सोपी युक्ती (How To Increase Appetite In Marathi)

09 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT