आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की, त्यातून बाहेर पडण्याची कोणतीच दिशा सापडत नाही. आयुष्य एकाच ठिकाणी थांबून राहिले आहे असे वाटते. अशावेळी खूप रडावेसे वाटते आपले दु:ख कोणालातरी सांगावेसे वाटते.पण हे सगळं करुनही तुम्हाला आयुष्य जगण्याची दिशा सापडत नाही. अशावेळी तुम्हाला गरज असते ती प्रेरणेची. अशावेळी तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी खास Heart Touching Love Quotes In Marathi, Heart Touching Status In Marathi, Konich Konach Nast Status In Marathi, Emotional Love Quotes In Marathi तुमच्यासाठी शेअर करत आहोत.
Heart Touching Love Quotes In Marathi | हार्ट टचिंग लव्ह कोट्स
- तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.
- तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही,
कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही - आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
- काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
- कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
- तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही,साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
- समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की, तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. अशा वेळी ती व्यक्ती तुम्हाला जास्त ignore करु लागते.
- तू माझा होऊ शकत नाही म्हणून प्रेम करणं सोडू का रे..असं अर्ध्यावर सोडायचं असतं तर मी जीवच लावला नसता.
- तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.
- तुला घट्ट मिठीत घेता,
प्रेम सुखाचा आभास होतो,
म्हणूनच या वेड्या मनाला,
तुझ्या भेटीचा ध्यास होतो. - जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात
अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो - खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू, आपले मानून बघ - खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं,
पण आता वेळ निघून गेली,
एकट्याला सोड्याचा खेळ,
नियतीही खेळून गेली - मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त,
तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे… - घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी माझं प्रेम नेहमी असेच राहील मनापासून ‘फक्ततुझ्यासाठी’
- नाही आठवण काढली तरी चालेल,
पण विसरुन मात्र जाऊ नकोस. - कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग
कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही… - आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते…
पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते…
तेव्हाच ती आपल्या जवळ नसते? - कोणाची इतकी पण काळजी घेऊ नका की, तुम्ही त्यांच्यासाठी careless जाल
- हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही
आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही
Best Long Distance Relationship Quotes In Marathi
Heart Touching Friendship Quotes In Marathi | दोस्ती यारीमध्ये इमोशनल करणारे कोट्स
दोस्तांची यारी जिंदगीभर सुटत नाही आणि मग अशी मैत्रीसाठी स्टेटस तर आपण ठेवणारच. मग तुमच्या दोस्त-यारांना नक्कीच इमोशनल ( Marathi Emotional quotes) करतील हे कोट्स.
- खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
- मैत्री.. ना सजवायची असते.. ना गाजवायची ..ती तर नुसती रुजवायची असतो.
मैत्री असावी मना- मनाची,मैत्री असावी जन्मा- जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
मैत्री असावी फक्त ‘तुझी आणि माझी’ - Girlfriend पेक्षा एक मैत्रीण बरी जी स्वत: message करुन काय रे कसा आहेस? असे हक्काने विचारते
आयुष्यात सगळे सोडून गेले तरी तू माझी साथ कधीच सोडणार नाही.. कारण मैत्रीची घेतलेली तू कधीच तोडणार नाही.. - आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत… हे त्यांनाही कळू द्या - दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
- आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे तुझ्यासाठी खूप मित्र असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे… - चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते - फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
- मैत्री नावाच्या नात्याची
वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात…प्रत्येक नात्यांची उणीव - देव माझा सांगून गेला
पोटापुरतेच कमव….जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव - जीवन आहे तिथे आठवण आहे
आठवण आहे तिथे भावना आहे - भावना आहे तिथे मैत्री आहे…आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस…
- कोणी कितीही बोललं तरी,कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो
तरी मित्रांची साथ कधी सोडायची नाही - मित्रांचा कितीही राग आला तरी त्यांना सोडता येत नाही,
कारण दु:खात असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला एकटे टाकत नाही. - जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय - जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती फक्त मैत्री - मैत्री आणि प्रेमात फरकं एवढाचं की,
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही… - सागराचे पाणी कधी आटणार नाही
मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही. - माझी मैत्री कळायला तुला थोडा वेळ लागेल
पण ती कळल्यावर तुला माझं वेड लागेल - मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली.. तुझ्या रुपाने..मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच ब रसून थांबणारी… - मैत्री असावी रिमझिम सरी सारखी….मनाला सुखद गारवा देणारी. वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स जे जपतील तुमची मैत्री
वाचा – दु:खात साथ देतील अशा शायरी
Heart Touching Status In Marathi | मनाला भिडणारे असे स्टेटस
- आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं… तर आपली झोपं उडवते ते खरं स्वप्न असते.- डॉ. अब्दुल कलाम आझाद
- माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
- तुम्ही प्रत्येक वेळी काही नवीन चूक करत असाल तर समजा तुमची नक्की प्रगती होत आहे.
- जी गोष्ट तुम्ही साधेपणाने समजवू शकत नाही… याचा अर्थ तुम्हाला ती गोष्ट कळलेली नाही.
- कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.
- जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.
- दु:खाशी दोन हात केल्याशिवाय सुख मिळत नाही.
- स्वत:च्या स्वप्नांवर इतके फोकस करा की, त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात कोणी आलं नाही पाहिजे.
- जी व्यक्ती आपल्या प्रगतीत व्यग्र असतो त्याला दुसऱ्याचं वाईट चिंतायला वेळ मिळत नाही.
- जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता… तेव्हा आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडतात.
- ज्यांचे विचार मोठे असतात जग नेहमी त्यांच्याच विरोधात असते.
- जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका… स्वत: चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
- कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही.. कारण त्याला तुमची मन:स्थिती बदलायची असते.
- रस्ता सापडत नसेल तर स्वत:चा रस्ता स्वत: तयार करा.
- गंजून संपण्यापेक्षा झिंजून संपणे नेहमीच चांगले
- जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
- दु:खामध्ये हसत राहावं वेळ सर्वांचीच येते.. झालं तरं आयुष्याचं सोनं व्हाव.. राख तर सर्वांचीच होते.
- तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर चांगल्या गोष्टी आपोआप घडतात.
- संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतो.
- वेळ मिळेल तेव्हा हसत राहा कारण आयुष्य प्रत्येक वेळी स्वत:हून हसण्याची संधी देत नाही.
वाचा – Cute Love Relationship Status In Marathi
Heart Touching Quotes In Marathi About Life | आयुष्याला दिशा देणारे कोट्स
- आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे
- आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध.. तुमच्यामुळे कोणाच्यातरी डोळ्यात अश्रू येणे.
- भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो.. आणि रिकामी झालेला खिसा दुनियेतील खरी माणसं
- प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.
- आयुष्यात आलेली संधी आणि गेलेले दिवस परत येत नाही.
- जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतात.. तुम्ही नाव कमावण्यात व्यग्र राहा
- देव प्रत्येक पक्ष्याच्या चोचीसाठी खास तयार करतो… पण तो घास तो घरापर्यंत कधीच आणून देत नाही.
- आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
- चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही..त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.
- बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा.
- का कोणास ठाऊक पण आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही.
- एकदा एका व्यक्तीने मला विचारलं, कोणी तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही काय कराल? मी म्हणालो, जी माणसं आपली असतात. ती आपल्याला कधीच सोडून जात नाही. जी सोडून जातात ती माणसं आपली कधीच नसतात.
- आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
- खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
- समस्या नाही असा मनुष्य नाही….आणि उपाय नाही अशी समस्या नाही.
- यशस्वी कथा वाचू नका…त्यांनी केवळ संदेश मिळतो… अपयशाच्या कथा वाचा त्यामुळे यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात.
- काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे.. पावलांचा वेग वाढवतात.
- आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
- समोरच्याला आदर देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळविणे हा सर्वात मोठा सन्मान असतो.
- शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.
वाचा – विश्वासावरील मराठी सुविचार
Breakup Heart Touching Quotes In Marathi | ब्रेकअपनंतर रडवतील हे कोट्स
- माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार निघून जातात.
- उशीरा बोलली जाणारी सत्य ही कधी कधी खोटं बोलण्यासारखीच असतात.
- कधीही कोणांच्या भावनांसोबत खेळू नका.
- तुम्ही हा खेळ सहज जिंकाल.. पण
तुमच्या या खेळात त्या व्यक्तीला आयुष्यभर गमावून बसाल. - तुला जायचं होतसं तू गेलीस,
मला गमवायचं होत मी गमवलं,
फरक फक्त इतकाचं की,
तू आयुष्यातला एक क्षण गमावलास आणि मी सगळं आयुष्य - ज्या व्यक्तीवर आपला सर्वात जास्त विश्वास असतो.. तिचं व्यक्ती आपला विश्वासघात करते.
- आठवणी ज्या माझ्यासाठी अनमोल होत्या… आज त्या माझ्यासाठी भूतकाळ होऊन बसल्या.
- तू मला आठव किंवा नको आठवू… मला तुझी आठवण येते हे लक्षात ठेव
- सगळे खेळ खेळा पण कोणांच्या भावनांशी कधीच खेळू नका
- हृदयाचा कोपरान कोपरा तुझ्या आठवणींनी भरलाय आणि अजूनही तुला माझ्या प्रेमावर प्रश्न पडलाय.
- भावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतं.. आपलं काम झालं की, नातं आपोआप संपतं
- आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील…अलगद अशा पापण्यांवरुन अश्रू ओघळून जाईल.
- एकटं कसं राहायचं हेच शिकवायला कदाचित आयुष्यात व्यक्ती येतात.
- प्रेम अशाच व्यक्तींवर करा ज्यांच्याकडून ते परत मिळण्याची अपेक्षा असते… नाहीतर तुम्हाला तुमचे प्रेम वाया गेल्याचे दु:ख आयुष्यभर होईल.
- तू सोडून गेलीस मला तरी मी वाट पाहणार .. अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझाच राहणार
- खूप रडावसं वाटतं मला… पण सावरतोय मी स्वत:ला,
फक्त एक सांग मला, माझ्याशिवाय तू तरी राहू शकशील का? - खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावरही करु शकत नाही,
खूप स्वप्न पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाही - तुम्ही कोणाचे मन दुखावूनही ती व्यक्ती तुमच्याशी चांगली वागत असेल,
तर ती व्यक्ती तुमच्यावर खरे प्रेम करते असे समजावे. - प्रेम केल्यावर हे जग खूप सुंदर वाटतं.
पण breakup नंतर हेच जगं नकोसं वाटायला लागतं - काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाही,
याचा अर्थ त्या दुखत नाही असे होत नाही - नाती ही झाडांच्या पानांप्रमाणे असतात,
एकदा गळून पडली की, निर्जीव होऊन जातात.
वाचा – Vishwas Marathi Status
Heart Touching Quotes For Parents | खास तुमच्या पालकांसाठी कोट्स
- आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा पाहण्याआधीपासूनच माझ्यावर प्रेम करते.
- आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.
- आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
- ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही,तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.
- आई-बाबा… तुमच्या चेहऱ्यावरील हास्य तसेच राहू दे…आणि माझ्या जीवनात ते असेच राहू दे.
- आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
- पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
- झोप मोडली तरी चालेल आई-वडिलांचे स्वप्न मोडले तरी चालेल.
- मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
- मुलगा कामाला लागतो. बाबा निवृत्त होतात… पण आई मात्र कायमच राबत असते.
- इतर कोणाचीही पूजा करण्यापेक्षा नेहमी आई-बाबांची पूजा करा फळ नक्की मिळेल.
- जगातील अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले ‘आईवडील’
- आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका…कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
- आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.
- आई दिव्याची ज्योत असते आणि तो प्रकार कुटुंबाला मिळाला म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा ‘बाप’ असतो.
- वडील आणि मुलामधल्या वाढत जाणाऱ्या ‘Genration gap’ नावाच्या दरीला जोडणारा पूल हा ‘आई’असतो.
- जो आधी रडवतो… पण नंतर प्रेमाने समजावतो तो ‘बाप’ असतो. आणि जी रडवून स्वत:सुद्धा रडते ती ‘आई’ असते.
- हे देवा आयुष्यात कधीच काही नको फक्त माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर कायम हसू असू दे.
- मी आहेस तू घाबरु नकोस असं बोलणारा एकमेव व्यक्ती म्हणजे ‘बाबा’
या नव्या युगात मेसेज, कॉल करता आला नाही म्हणून काय झालं एक व्यक्ती तुमची कायमच काळजी करत असते ती म्हणजे ‘आई’
हे देखील वाचा –
आईची आठवण येतेय मग तिला पाठवा हे मेसेज (Miss You Aai Messages In Marathi)
ब्रेकअपवर अशी करा मात (How To Deal With Breakup In Marathi)