ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Sunstroke Symptoms In Marathi

शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे (Heat Stroke Symptoms And Treatment In Marathi)

उन्हाळा सुरू झालाय. एकीकडे उन्हाची काहिली तर अचानक बरसणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे वातावरण फारच बिघडले आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात त्रास होतो तो उष्माघाताचा. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की उष्माघाताचा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. उष्माघातामुळे मृत्यु झाल्याच्या अनेक घटना उन्हाळ्यात घडत असतात. यासाठीच उष्माघातावर त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे आणि उपाय सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे.

शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे

उष्माघात म्हणजे नेमके काय? (Heat Stroke Meaning In Marathi)

आपले शरीर निसर्गनियमानूसार चालत असते. जेव्हा हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढते तेव्हा शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर घाम बाहेर टाकते. घामामुळे माणसाच्या शरीराचे तापमान उन्हाळ्यात नियंत्रित राहण्यास मदत होते. मात्र घाम बाहेर टाकण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे नसल्यास ही शारीरिक यंत्रणा बिघडते. साधारणपणे शरीराचे तापमान 34 अंश सेल्सिअस असते पण काही कारणांमुळे जर हे तापमान वाढले तर उष्माघाताचा स्ट्रोक येऊ शकतो. कारण वाढलेल्या तापमानाचा इतर शारीरिक क्रियांवर परिणाम होऊ लागतो. उष्माघातामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपूरवठा होत नाही. शरीराचे तापमान वाढल्यामुळे किडनीचे आणि ह्रदयाचे कार्य बिघडते. ह्रदयाचे कार्य मंदावल्यामुळे ह्रदयाची धडधड वाढू लागते. उष्माघाताच्या त्रासामुळे रक्तातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मंदावल्यामुळे रुग्णाला श्वास घेणे कठीण जाते. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रूग्णाला त्वरीत रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असते.

घाम कसा थांबवायचा हे देखील वाचा

ADVERTISEMENT

Heat Stroke Meaning In Marathi

उष्माघाताची लक्षणे (Heat Stroke Symptoms In Marathi)

उष्माघाताचा त्रास सुरू झाल्यास अचानक अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे या सुरूवातीच्या लक्षणांना ओळखून त्वरीत उपाय योजना केल्यास हा त्रास कमी करता येतो. मात्र या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास जीभ कोरडी पडणे, डिहायड्रेशन, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवू लागतात. उष्माघाताचा त्रास सुरू झाल्यावर ह्रदयाची धडधड वाढणे, त्वचा लाल होणे अशी लक्षणेदेखील दिसून येतात.

उष्माघात वर उपाय (Heat Stroke Remedies In Marathi)

  • जर एखाद्याला उष्माघाताचा त्रास होत असेल तर त्याला पुरेशी हवा मिळेल अशा ठिकाणी न्या
  • साधे पाणी  अथवा नारळ पाणी त्याला द्या
  • साध्या पाण्यात एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ टाकून ते पाणी त्या व्यक्तीला द्या
  • उन्हामध्ये असल्यास त्वरीत एखाद्या सावलीच्या ठिकाणी त्यांना न्या.
  • अशा व्यक्तीच्या अंगावर थंड पाण्याने स्पंजिंग करा.
  • शुदध येत नसल्यास त्वरीत डॉक्टरांकडे उपचारांसाठी न्या.

Heat Stroke Remedies In Marathi

उष्माघातापासून बचाव कसा करावा (How To Prevent Heat Stroke)

  • तीव्र उन्हात घराबाहेर पडू नका
  • कष्टदायक कामे सकाळी अथवा संध्याकाळी करा
  • उन्हात कष्टाची कामे करणे टाळा
  • दिवसभर पुरेसे पाणी प्या
  • अती थंड पाणी, अथवा चहा,कॉफी सारखी गरम पेय पिणे टाळा
  • हलक्या रंगाचे आणि कॉटनचे कपडे वापरा.
  • घराबाहेर पडताना गॉगल, टोपी आणि छत्री अवश्य जवळ ठेवा
  • उपाशीपोटी घराबाहेर पडू नका
  • थंड पाणी पिऊन अथवा एसीमधून थेट बाहेर उन्हात जाऊ नका
  • उन्हाळ्यात अती मद्यपान करू नका
  • घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत नेण्यास विसरू नका

उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ADVERTISEMENT

उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी (Tips On Foot Care In Marathi)

उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी प्या ‘लिंबूपाणी’

फोटोसौजन्य- इन्साग्राम आणि शटरस्टॉक

14 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT