ADVERTISEMENT
home / Uncategorized
Home Names In Marathi

आनंदी वास्तूसाठी खास नावे (Home Names In Marathi)

‘घर’ ही अशी जागा आहे जिथे समाधान, प्रेम, जिव्हाळा,आपुसकी, रुसवे-फुगवे असे सगळे काही अनुभवायला मिळते. म्हणूनच तर म्हणतात ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती… तिथे असावा मायेचा ओलावा.. नकोत नुसती नाती’ अशा या घरात मायेचा ओलावा असतो म्हणूनच दिवस संपला की, आपल्या घरी परतावेसे वाटते. घरापासून दूर असणाऱ्यांना घराची सतत आठवण येत राहते. खूप कामानंतर घरी आल्यानंतर घराची पायरी चढून जे समाधान मिळते, ते समाधान कुठेही आणि कधीही कोणत्याही गोष्टीतून विकत घेता येत नाही. अशा या घरासाठी तुम्ही काही चांगले नाव सुचवले आहे का? खूप जण घराचे काम केल्यानंतर घराचे छान नामकरण करतात. आपले घर अगदी दूरदूरपर्यंत सगळ्यांना ओळखता यावे, यासाठीच घरांचा नामकरण सोहळा केला जातो. तर नव्या घरात प्रवेश करताना वास्तुशांती करण्यात येते आणि वास्तुशांती निमंत्रण पत्रिका ही पाठविण्यात येतात. सगळ्यांकडून नवीन घरांसाठी शुभेच्छा (best wishes for new home in marathi) दिल्या जातात. तुम्ही घराचे नव्याने काम केले असेल आणि तुमच्या घरांची नावे (Home Names In Marathi) ठेवण्याचा तुमचा विचार असेल तर घरांची नावे मराठी (New Home Names In Marathi) आम्ही शोधून काढले आहेत.

युनिक घरांची नावे (Unique House Names In Marathi)

House Names In Marathi
House Names In Marathi

घरांची काही युनिक नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर घरांची नावे अगदी युनिक वाटतील अशी आम्ही शोधून काढली आहेत. ही नावं घरांना ठेवल्यानंतर त्याचा अर्थ काय ते एकदा तरी तुम्हाला जवळचे विचारतील. चला जाणून घेऊया युनिक घरांची नावे (Unique House Names In Marathi).

घरांची नावे नावांचे अर्थ
अनुग्रहकृपा
अमृतबिंदूअमृताचा थेंब
अभीरपुरमसुंदर वास्तू
अनुथमउत्तम
कदंबएक वृक्ष
गिरिराजएक उंच पर्वत
विसावाजिथे शांतता मिळते असे ठिकाण, आराम
कोंदणअलंकारासाठी केलेली बैठक किंवा जागा
विरंगुळाआवड
कुटीरझोपडी ( घरासाठी ठेवलेले नाव)
श्रम साफल्यपरिश्रमाने तयार केलेली वास्तू
निकुंजवन-वाटिका कुंज
उत्तमसर्वात चांगले
स्वप्न साकारस्वप्न पूर्ण होतात तेव्हा
अनुमतीपरवानगी
आर्षतीपवित्र
बोध गयासे ठिकाण जेथे गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली
शुभ चिंतनचांगले विचार
चारु हास्यआनंदी हसणे
ध्रुवअढळ

वाचा – यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स

नव्या घरांची नावे अर्थासह (New Home Names In Marathi)

New Home Names In Marathi
New Home Names In Marathi

काही नवीन नावे (New Home Names In Marathi) देखील तुम्ही तुमच्या घरासाठी ठेवू शकता. ही नावं तुम्हाला नक्कीच आनंद मिळवून देतील आणि तुमच्या घराला नवी ओळखही मिळवून देतील.

ADVERTISEMENT
घरांची नावे नावांचे अर्थ
निकुंजिकावाटिका
अतुल्यअलौकिक
यज्ञश्रीयज्ञाचे वैभव
युगंधरायुग बदलण्याची क्षमता असणारी
पृथापृथ्वी
रौनकचमकदार
अमोलीमौल्यवान
अवनीभूमी
आरुणीपहाट
आज्ञेयीआदेश
स्वरकुंजस्वर गुंजणारे ठिकाण
योगायोगजुळून येणारी वेळ
बासुरीएक वाद्य
इशाइश्वराची कृपा
फुल्कीएक तेजोमय ठिकाण
धनाधनाने भरलेले
द्वारकाश्रीकृष्णाचे गाव
गर्वअभिमान
हंसएक सुंदर पांढरा पक्षी
ह्रजूसरळ

वाचा – Vastu Tips For Home In Marathi

बेस्ट घरांची नावे अर्थासह (Best House Names In Marathi)

Best House Names In Marathi
Best House Names In Marathi

तुमच्या घराला नाव ठेवायचं असेल तर तुम्ही घराची नावं अगदी बेस्ट ठेवायला हवी. काही जुनी आणि युनिक नावे देखील बेस्ट (Best House Names In Marathi) वाटतात.

घरांची नावे नावांचे अर्थ
भाग्यं निवासलाभदायक अशी वास्तू
स्वप्नपूर्तीस्वप्न पूर्ण करणारी वास्तू
अरिंदामभगवान शिव
देवलोकदेवाचे आवडीचे ठिकाण, देवाच्या राहण्याची जागा
हेमनसोने
आस्थाविश्वास
पद्मजाकमळावर बसलेली
वृद्धीवाढ
माझे घरआपल्या घराची भावना
गंगा दत्तगंगेची भेटवस्तू
आनंद सागरआनंद सागर बनून वाहतो तेव्हा
ह्रदेशह्रदयातील जागा
हिंमाशूचंद्र
हविशादान
इंद्रनभगवान इंद्र
सगंधसुगंधीत
इन्दीवरनीळकमल
अंकुशहत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढआस
निखिलसंपूर्ण

वाचा – वास्तुशास्त्रानुसार देवघर

नव्या घरासाठी रॉयल नावे (Royal And New Home Names In Marathi)

Royal And New Home Names In Marathi
Royal And New Home Names In Marathi

घरांना रॉयल ठेवायला कोणाला आवडणार नाही. तुमच्या घरांसाठी तुम्ही काही रॉयल नावं शोधत असाल तर तुमच्यासाठी काही रॉयल नावे (Royal And New Home Names In Marathi) देखील आम्ही शोधून काढली आहेत.

ADVERTISEMENT
घरांची नावेनावांचे अर्थ
नक्षत्रआकाशातील तारा
भारद्वाजभाग्यशाली पक्षी
चिरायूचिरंतर आयुष्य, टिकणारे
देवकंठदेवाच्या आवडीचे
फाल्गुनअर्जुन
गगनआकाश
गिरि  उंच पर्वत
इंद्रप्रस्थपांडवाचे राहण्याचे ठिकाण
इंद्रधनुसप्तरंगी ठिकाण
ईशावास्यमइश्वराचा वास असतो अशी जागा
तमन्नाइच्छा
श्रीतेजगणपतीचे तेज असलेले ठिकाण
सूर्योदयसूर्याचा उगम होण्याची वेळ
ऐक्यएकी
फाल्गुनीएक मराठी महिना
सगंधालयआपल्या माणसांचा आसरा
स्नेहांचलस्नेहाचा सहवास असलेले ठिकाण
प्रपंचसंसार
आश्रयडोक्यावर छप्पर असणे
आभातेज

ही काही छान नावे तुमच्या नव्या वास्तूला किंवा घराला ठेवू शकता.

14 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT