home / xSEO
Griha Pravesh Invitation Message Marathi

वास्तुशांती निमंत्रण पत्रिका | Vastu Shanti And Griha Pravesh Invitation Message In Marathi

नवे घर घेणे ही सगळ्यांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. अशा या आनंदाच्या प्रसंगी नव्या घराची पूजा करताना म्हणजेच वास्तु शांती. या पूजेसाठी आप्तेष्टांना बोलावणे आणि आनंद साजरा करणे प्रत्येकालाच आवडते. नव्या घराच्या शुभेच्छा  घेत आपण छान नव्या वास्तुची पूजा करुन घेतो.  अशा या नव्या वास्तूत वास्तुशांती करण्याचे योजिले असेल तर खास तुमच्यासाठी वास्तुशांती निमंत्रण पत्रिका Vastu Shanti Invitation In Marathi  तुम्ही पाठवू शकता. तुमच्यासाठी आम्ही निवडक (Griha Pravesh Invitation Message In Marathi For Whatsapp,House Warming Invitation Message In Marathi) देखील निवडल्या आहेत त्या नक्की पाठवा.

वास्तुशांती निमंत्रण पत्रिका | Vastu Shanti Invitation In Marathi

वास्तुशांती निमंत्रण पत्रिका
वास्तुशांती निमंत्रण पत्रिका

 वास्तुशांतीसाठी खास निमंत्रण करायचे असेल तर खास तुमच्यासाठी आम्ही वास्तुशांती निमंत्रण पत्रिका (Vastu Shanti Invitation In Marathi) त्यावरील छानसे मजकूर आम्ही तुम्हाला शेअर करत आहोत.

 1.  आमच्या आशा, आकांक्षा आणि सदिच्छा
  या घराच्या रुपाने झाल्या पूर्ण
  तुम्ही घरात येऊन करा त्याचा आनंद
  त्यासाठी हे खास आमंत्रण
 2.  स्वप्न एक नव्या वास्तुचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने
  कार्य नूतन गृहाच्या वास्तुशांतीचे, योजिले कुलदेवतेच्या कृपेने
  तोरण या वास्तुवर चढावे, आपण सर्वांच्या साक्षीने,
  रंगत वाढवावी या कार्यक्रमाची तुमच्या सहवासाने
 3.  घर ते मजला आपुले वाटे
  जिथे निवारा सुखद वाटतो
  व्यवहाराचा  रुक्ष मुखवटा
  घरात शिरता गळून पडतो
 4.  नवीन घरात सुखशांती सद्भभावना
  यानांच चित्ती थारा मनींच्या
  वास्तुदेवता सतत तथास्तु म्हणत असतं
 5.  नवीन घराच्या लाखो शुभेच्छा
  तुमच्या आम्हाला मिळाव्यात
  त्यासाठी तुम्ही यावे आमच्या घरात
 6.  सुखाची नांदी घेऊन आले हे नवे घर
  तुम्ही उपस्थितीने घालावी त्यात भर
  वास्तुशांतीचे निमित्त साधून तुम्हीही घ्यावा याचा आनंद
 7.  नवे घर घेतले झाला त्याचा आनंद
  त्यासाठी घातला आहे वास्तुशांतीच्या पूजेचा घाट आम्ही मस्त
 8. वास्तुशांती करुन करुया नव्या घरात गृहप्रवेश
  तुमचेही आशीर्वाद आम्हाला यासाठी हवेत
 9.  झाली देवाची कृपा झाला आम्हाला आनंद
  नवीन घराचा आनंद शेअर करावा तुमच्यासोबत
  म्हणून ठेवली आहे वास्तुशांतीची पूजा
  नव्या घराच्या द्या आम्हाला वास्तुशांतीच्या शुभेच्छा
 10.  घराचा आनंद हा नवा
  तुमच्या सोबत करावा साजरा
  देऊन वास्तुशांतीचे निमंत्रण

गृहप्रवेश निमंत्रण मेसेज मराठी | Griha Pravesh Invitation Message In Marathi

Griha Pravesh Invitation Message In Marathi
Griha Pravesh Invitation Message In Marathi

 गृहप्रवेशासाठी तुम्हाला खास मेसेज करायचे असतील तर तुम्ही (Griha Pravesh Invitation Message In Marathi) पाठवू शकता. ते देखील तुमच्या आप्तेष्टांना नक्की आवडतील. तुमच्या नव्या आनंदी वास्तूसाठी नावे ठेवण्याचा विचार असेल तर ही खास नावे तुमच्यासाठी.

 1.  आनंदी वास्तुत तुम्ही येऊन साजरा करावा
  आनंद , तुमच्यासाठी देत आहोत गृहप्रवेशाचे निमंत्रण
 2.  प्रत्येकाला हवं असतं एक आकाश,
  उंच भरारी घेण्यासाठी
  प्रत्येकाला हवं असतं एक घर
  संध्याकाळी परत येण्यासाठी
  या आमच्या या सुंदर घरात आणि वाढवा आमचा आनंद
 3.  गृहप्रवेशाचा दिवस तो आला
  आनंद आमच्या मनी दाटला,
  तुम्हाला देऊन आमंत्रण गृहप्रवेशाचे दिवस आमचा धन्य जाहला
 4.  दिलेय गृहप्रवेशाचे निमंत्रण आज आम्ही तुम्हा
  चला घरातून पटकन निघा आणि द्या आम्हा नव्या घराच्या शुभेच्छा
 5.  तुम्हाला हे वाचून नक्की आनंद होईल
  की आम्ही नवे घर घेतले आहे
  त्या नव्या घरासाठी आम्ही तुम्हाला वास्तुशांतीसाठी बोलवत आहोत
 6.  आनंद झाला, मनाला घर हे आमचे नवे झाले,
  नवीन घराच्या द्या आम्हाला मनापासून शुभेच्छा!
 7.  तुमच्या पाठिंब्याने आम्हाला मिळाले बळ
  म्हणून घेतले आज आम्ही नवे घर,
  नवीन घराच्या शुभेच्छा देऊन करणार आम्ही हा दिवस साजरा
 8.  दारी तोरण बांधले नव्या वास्तुचे
  घर हे सजले तुमच्या स्वागतासाठी
  वास्तुशांतीचे निमंत्रण करतो खास तुमच्यासाठी
 9.  नव्या वास्तुत यावी नवी उर्जा
  त्यामध्ये असावी आनंदाची लाट आणि उत्साहाची वाट
  वास्तुशांतीचे आमंत्रण देतो आज
 10. आज आहे आमच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाचा दिवस
  तुम्ही येऊन करावा हा दिवस खास म्हणून हे आमंत्रण

गृहप्रवेश निमंत्रण मेसेज व्हॉटसॲपसाठी | Griha Pravesh Invitation Message In Marathi For Whatsapp

Griha Pravesh Invitation Message In Marathi For Whatsapp
Griha Pravesh Invitation Message In Marathi For Whatsapp

व्हॉटस ॲपवर खास मेसेज पाठवायचे असतील तर तुम्ही  (Griha Pravesh Invitation Message In Marathi For Whatsapp) पाठवू शकता. 

 1.  गृहप्रवेशाचा दिवस घराची वाढवा शोभा
  येऊन आमच्या घरी आमचा आनंद वाढवा
 2.  नवीन घर नवा आनंद
  तुम्हाला देतोय गृहप्रवेशाचे निमंत्रण
 3.  गृहप्रवेशाचा आनंद साजरा करावा तुमच्यासोबत
  म्हणून तुम्हाला देत आहोत आमंत्रण खास
 4.  गृहप्रवेशाचे आमंत्रण देऊन पाहतोय तुमची वाट
  तुम्ही यावे आमच्या घरात आज
 5.  प्रेमाने बनवले या घराला आम्ही
  तुम्ही येऊन वाढवावी घराची शोभा
  देतोय गृहप्रवेशाचे निमंत्रण
 6.  एक एक विट रचून बांधले आहे हे घर
  तुम्ही येऊन करावे त्याला पावन
 7.  चांगुलपणा आणि मेहनतीने घेतले आहे आम्ही हे घर
  तुम्हाला खास बोलवून आम्ही देत आहोत घर भेटीचे आमंत्रण
 8.  घराला घरपण दिले तुमच्यासारख्या लोकांनी
  म्हणूनच तुम्ही यावे या गृहप्रवेशाच्या दिवशी
 9. नवीन घराचा करतोय गृहप्रवेश तुम्ही द्यावी भेट
  आणि करावे आम्हालाही धन्य
 10. घर घेण्याचा आनंद झाला,
  तुमच्या येण्याने त्यात बहार आला,
  गृहप्रवेशाचे देतोय आमंत्रण येताना सहकुटुंब आणि सहपरिवार

वास्तुशांती निमंत्रण पत्रिका मराठी मजकूर | Vastu Shanti Nimantran Patrika Matter In Marathi

Vastu Shanti Nimantran Patrika Matter In Marathi
Vastu Shanti Nimantran Patrika Matter In Marathi

वास्तुशांती निमंत्रण पत्रिका वापरत असाल तर तुमच्यासाठी खास मजकूरदेखील आम्ही शोधून काढले आहेत. (Vastu Shanti Nimantran Patrika Matter In Marathi) खास तुमच्यासाठी

 1.  नवीन घराच्या निमित्ताने योजली आहे वास्तु शांतीची पूजा
  तुम्ही सगळ्यांनी येऊन जरुर लाभ घ्यावा
 2.  घर घेऊन झालाय आम्हाला आनंद
  त्या आनंदात भर पडण्यासाठी योजिली आहे वास्तुपूजा
  तुम्ही येऊन या आनंदात घालावा भर
  यासाठीच ठेवली आहे वास्तुशांतीची पूजा
 3.  एक विट श्रमाची, एक विट कष्टाची
  एक विट आई-वडिलाच्या आशीर्वादाची
  एक विट बहिणीच्या प्रेमाची
  एक विट आपल्या सहकार्याची
 4.  केले कष्ट अपार, घेतला स्वप्नांचा आधार
  झाली स्वप्ने साकार आज आई-बाबांच्या आशीर्वादाने
  त्याचा आनंद तुम्हीही घ्यावा येऊन वास्तुशांतीच्या पुजेच्या आमंत्रणाचा ठेवून मान
 5.  नव्या वास्तुचे स्वप्न झाले साकार, आमच्या स्वप्नांना मिळाला
  तुमच्या आशीर्वादाचा आधार
 6.  स्वप्न आम्ही पाहिलेले झाले साकार,
  तुमच्या आशीर्वादाने मिळाला आमच्या स्वप्नांना आधार
  वास्तुशांतीचे आमंत्रण देऊन
 7.  एक एक विट रचून झाले आमचे घर पूर्ण
  आज ठेवली आहे आम्ही या घराची वास्तुशांतीची पूजा
  तुम्ही सगळ्यांनी येऊन वाढवावा त्याचा आनंद
 8. वास्तुशांती करण्याचे योजिले आहे आज
  तुम्ही येऊन वाढवावा याचा थाट
   
 9.  नवीन वास्तू घेतली आज आहे त्याची वास्तू पुजा
  तुम्ही येऊन वाढवावा त्याचा आनंद
 10. वास्तुशांतीचा दिवस हा आला
  आनंद तुमच्यासोबत साजरा करावा
  म्हणून तुमच्यासाठी खास हे आमंत्रण

वास्तुशांती आमंत्रण मेसेज | House Warming Invitation Message In Marathi

House Warming Invitation Message In Marathi
House Warming Invitation Message In Marathi

एखाद्याला घरी बोलवायचे असेल आणि त्यासाठी खास पार्टी ठेवायची असेल तरी देखील तुम्ही (House Warming Invitation Message In Marathi) पाठवू शकता. 

 1. सुखाच्या माझ्या झोपडीत मिळते आनंदाची छाया
  तुम्हा सगळ्यांसाठी घरी पार्टी ठेवली आहे मी आमच्या
 2.  घरात यावा आनंद घ्यावा,यासाठी करत आहोत आमंत्रण
  घरात येऊन माझ्या तुम्ही वाढवावी शोभा हीच इश्वरचरणी प्रार्थना
 3. आठवणींच्या या पिटाऱ्यात भर घालावी काही आठवणींची
  त्यासाठी करत आहोत आमंत्रण आम्ही
   
 4.  तुमच्या येण्याने झाला हा हर्ष
  घराला मिळाले घरपण आणखी थोडे जास्त
  नव्या घरात तुमचे स्वागत करतो आम्ही मस्त
 5.  घरात तुमच्यासाठी केली आहे खास व्यवस्था
  त्यासाठी केली आहे खास निमंत्रणाची व्यवस्था
  मग येताय ना!
 6. आमच्या घराला लागावे तुमचे पाऊल
  त्याने व्हावा सगळ्यांना आनंद
  या घरी आम्ही पाहात आहोत वाट तुमची
 7.  घराला घरपण देतात ती माणसं 
  म्हणून तुम्हाला देतो आमंत्रण मस्त
 1.  घ्यावा तुम्हीही आनंद आमच्या या लाखमोलाच्या घराचा
  त्यासाठी करत आहोत आमंत्रित यावे तुम्ही आमच्या या घरा
 2.  मेहनतीने बांधलेले घर झाले आता मोठे
  तुम्ही येऊन त्याला करावे पावन
 3. नव्या घराच्या शुभेच्छा देण्यासाठी
   तुम्ही यावे माझ्या घरा, 
  आनंद साजरा कराय
    आमच्यासोबत खरा


आता तुमच्या नव्या घराचा आनंद शेअर करण्यासाठी तुम्ही असे वास्तुशांती निमंत्रण संदेश पाठवू शकता. जे तुम्हाला नक्कीच पाठवता येतील.

27 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text