केसतोड हा शब्द तुम्ही हमखास ऐकला असेल. त्वचेवर असणारा एखादा केस परतला किंवा अर्धवट तुटला की, त्याजागी केसतोड येतो. केसतोडीचा त्रास हा अगदी लहानसा वाटत असला तरी तो बरा होईपर्यंत स्वस्थ बसता येत नाही. केसतोड आला की, तो मोठा होऊ नये यासाठी आपण खूप काळजी घेतो. पण केसतोड अचानक होत नाही त्यामागेही काही कारणे आहेत. म्हणूनच आज आपण केसतोड संदर्भातील सगळी माहिती जाणून घेणार आहोत. शिवाय केसतोड उपायही (kestod upay in marathi) माहीत करुन घेणार आहोत. मग करुया सुरुवात
केसतोड म्हणजे काय? (What Is Hair Follicle Boils In Marathi)
shutterstock
आपल्या शरीरावर अनेक केस असतात. या पैकी एक बारीकसा केस जरी मुळापासून बाहेर येताना तुटला किंवा तो ओढला जाऊन दुखावला गेला की, केसतोड येतो. मुळात केसांना दुखापत झाल्यामुळे तेथील भाग लाल होते आणि केसांच्या ग्रंथीना त्रास झाल्यामुळे त्या ठिकाणी पुळी येते किंवा तो भाग चांगलाच लाल होतो. ही पुळीही साधी नसते या पुळीमध्ये बरेचदा पू साचतो. त्यामुळे साहजिकच ज्या भागात केसतोड आला आहे तो भाग जास्त दुखू लागतो. शरीराच्या ज्या ज्या भागांवर केस आहेत. त्यासगळ्या ठिकाणी केसतोड होण्याची शक्यता असते. केसतोडीकडे दुर्लक्ष करण्याची चूक कधीच करु नका. कारण काही काळ जरी तो फोड लाल रंगाचा आणि लहान वाटत असला तरी नंतर पू साचून त्याचा आकार मोठा होण्याची, जास्त त्रास होण्याची शक्यता असते.
केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)
केसतोड का होतो? (Causes Of Hair Follicle Boils In Marathi)
केसतोड म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर केसतोड का होतो हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. ती कारणे कोणती ते देखील जाणून घेऊया.
अस्वच्छता (Unclenliness)
केस परतणे,केस तुटणे हे केसतोड येण्याचे एक कारण असले तरी केसतोड झाल्यानंतर फोड येण्यासाठी अस्वच्छता जबाबदार असते. आपल्या त्वचेवर कितीतरी प्रकारचे बॅक्टेरिया असतात. ‘स्टेफिलियोकोकस ऑरियस’ नावाचा बॅक्टेरीया आपल्या सगळ्यांच्या त्वचेवर असतो. तुम्ही स्वच्छता राखली नाही तर मात्र तुम्हाला एखादी दुखापत झाल्यानंतर हा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो आणि तुम्हाला केसतोड होतो. त्यामुळे अस्वच्छता हे देखील या मागचे एक कारण आहे.
मधुमेह (Diabetes)
shutterstock
मधुमेही व्यक्तिंना अनेक गोष्टी अत्यंत सावधपणे कराव्या लागतात. त्यांना एखादी जखम झाली की, ती बरी होण्यासाठी बराच कालावधी लागतो. शेव्हिंग करताना किंवा शरीरावरील केस काढताना जर केसांच्या मुळाला दुखापत झाली तर त्यांना फोड येण्याची शक्यता असते. मुळात मधुमेहाच्या शरीरामुळे जखम बरी होण्याची शक्यता कमी असते. त्यात केस परतला गेला की, त्याचा त्रास असह्य होतो. केसतोडीच्या कारणामध्ये मधुमेह असण्याचे कारणच हे आहे की, ही जखम लवकरात लवकर बरी होत नाही.
केमिकल्सचा वापर (Use Of Chemicals)
आपल्या शरीरावर जसे बारीक बारीक केस असतात तशीच बारीक बारीक छिद्र असतात. केसांची मूळ नाजूक असतात. त्याच्यावर सतत केमिकल्सचा मारा होत राहिला तर तुम्हाला फोड येण्याची शक्यता असते. घामाचा वास येऊ नये म्हणून आपण काखेत डिओ स्प्रे मारतो. हा स्प्रे थेट काखेत मारताना तुमच्या घामासोबत अनेकदा उघड्या छिद्रांमधून केमिकल्स आत जातात. केसांच्या मुळांशी जाऊन ते संक्रमित होतात.त्यामुळे केसतोड येतात.
चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही
चुकीचे खाणे (Bad Food Habits)
चुकीच्या खाण्यामुळे केसतोड येतो हे शास्त्रशुद्धरित्या कोणीही लिहून ठेवले नसले तरीही तुमच्या अंतर्गत प्रणालीवर अनेक गोष्टी अवलंबून असतात तुमच्या त्वचेवर पिंपल्स येणे हे त्यापैकीच एक आहे. कधी कधी चेहऱ्यावरच नाही तर शरीराच्या इतर भागांवरही आपल्याला पिंपल्स येतात. हा फोड केसांमधूनच बाहेर येतो. अर्थात त्वचेच्या आत असलेल्या केसांमध्ये असलेल्या तैल ग्रंथीतूनच याचा स्राव होतो. त्यामुळे चुकीचा आहार, आहार घेण्याच्या चुकीच्या वेळा यासाठी कारणीभूत ठरु शकतात.
केसांच्या काढण्याच्या चुकीच्या पद्धती (Wrong Hair Removal Methods)
केसतोडीचे मुख्य कारण असते केसांचे मुळ दुखावणे. हल्ली अनेक जण शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करता. यामध्ये प्रामुख्याने लेझर केस काढणे आणि वॅक्स करणे ही अनेकांसाठी परवडणारी आणि सहज अशी गोष्ट आहे. पण लेझर किंवा वॅक्स करताना अनेकदा केसांच्या मुळांना धक्का बसतो. जर केस काढण्याची पद्धत योग्य नसेल तर मग तुम्हाला केसतोड येण्याची शक्यता असते. शिवाय केस काढल्यानंतर तुमच्या त्वचेवर आलेल्या बारीक पुळीकडे तुम्ही दुर्लक्ष केले तरी त्याचा त्रास होऊ शकतो.
वाचा – डोक्यात फोड येण्यावर उपाय
केसतोडीवर घरगुती उपाय (Home Remedies For Baaltod In Marathi)
केसतोडीची कारणे जाणून घेतल्यानंतर अगदी घरच्या घरी तुम्हाला केसतोड वर उपाय (kestod upay in marathi) काय करता येईल ते देखील पाहुया. म्हणजे केसतोडीचा मोठा फोड होण्याअगोदरच तुमची ती पुळी कमी होईल.
लसूण (Garlic)
केसतोडीवर लसूणही चांगले काम करते. लसूण कसे लावायचे हे माहीत नसेल तर
- लसणीच्या दोन चार पाकळ्या घेऊन लसूण ठेचून घ्यावी.
- लसणीचा ज्युस काढून तो केसतोडवर लावा. हा रस तसाच राहू द्या.
- दिवसातून दोनदा तुम्ही हा रस केसतोडवर लावा.
- लसूणमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामध्ये सल्फर असते त्यामुळे तुमचे फोड बरे होण्यास मदत मिळते.
कच्चा कांदा (Raw Onion)
केसतोड आल्यानंतर कच्चा कांदा लावण्याचाही सल्ला दिला जातो. कच्चा कांदा कसा लावायचा ते देखील जाणून घेऊया.
- कांदा कापून पातळशी फोड केसतोडवर लावा.
- हा कांदा तसाच ठेवून द्यायचा असेल तर तुम्ही त्यावर पेपर टेप लावा.
- त्यामुळे कांद्याचे फायदे तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील.
- कांद्यामध्ये सल्फर, फ्लोवोनाईड्स, अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे केसतोड बरे होण्यास मदत मिळते.
गरम पाण्याचा शेक (Hot Compress)
केसतोड झाल्यानंतर गरम पाण्याचा शेक देण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाण्याचा शेक दिल्यामुळे थोडा आराम मिळतो.
- एक कापड गरम पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्या.
- त्याचा गोळा करुन तुम्हाला केसतोड झाला आहे त्या ठिकाणी शेकत राहा. दिवसातून किमान 3 ते 4 वेळा किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा शेकत राहा.
- गरम पाण्याच्या शेकमुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. शरीरातील पांढऱ्यापेशी लढण्यासाठी सक्रिय होतात. त्यामुळे केसतोडमुळे आलेली सूज कमी होते.
- केसतोड जाईपर्यंत तुम्ही हे करत राहाल तर तुम्हाला आराम मिळेल.
वेदनादायी शू बाईटवर ’15’ घरगुती उपाय आणि इतर टीप्स (How To Prevent Shoe Bites In Marathi)
टी ट्रि ऑईल (Tea Tree Oil)
केसतोडीवर टी ट्रि ऑईलही लावण्याचा सल्ला दिला जातो केसतोडीवर टी ट्रि ऑईल कसे लावावे हे जाणून घेऊया.
- एका स्वच्छ कपड्यावर टी ट्रि ऑईल घेऊन तुम्ही केसतोडीवर लावा.
- जो पर्यंत फोड बरा होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा वापर करा.
- टी ट्रि ऑईलमध्ये असलेले एंटिसेप्टिक गुणधर्म तुमच्या केसतोडीला थंड करण्याचे काम करते.
कडुनिंबाचे तेल (Neem Oil)
कडुनिंबाच्या तेलाचे फायदे लक्ष घेत कडुनिंबाचे तेलही त्यावर परफेक्ट काम करते.
- कडुनिंबाचे तेल एका कापसात बुडवून केसतोडीवर लावा. केसतोड बरा होत नाही तो पर्यंत तुम्ही कडुनिंबाच्या तेलाचा वापर करु शकता.
- जर तुमच्याकडे कडुनिंबाचे तेल नसेल तर तुम्ही कडुनिंबाच्या पानांचा रस वापरु शकता. कडुनिंबाची पाने घेऊन त्या पानाचा रस काढा आणि तो केसतोडीवर लावा.
- कडुनिंबामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात त्यामुळे तुमचा केसतोड बरा होण्यास मदत मिळते.
हळद (Turmeric)
हळदही अँटिसेप्टिक असते. घरात हळद अगदी सहज उपलब्ध असते. त्यामुळे तुम्हाला त्याचा वापर अगदी सहज करता येईल.
- हळद पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करा.
- ही पेस्ट तुमच्या केसतोडवर लावा.
- दोन चार दिवसांनी तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
- याचा वापर तुम्ही दिवसातून एक ते दोन वेळा करण्यास काहीच हरकत नाही.
जास्वंदाची पाने (Hibiscus Leaves)
जास्वंदाची पानेही तुमच्या केसतोडीवर चांगले काम करतात.
- रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी जास्वंदाची पाने चांगली असतात. जास्वंदाची पाने घेऊन ती छान कुटून घ्या.
- जास्वंदाची पाने तुम्ही केसतोडीवर लावा. जर तुमच्या केसतोडीमध्ये पू असेल तर तो निघण्यास मदत मिळते.
कलौंजीतेल (Onion Seed Oil)
कलौंजी तेलाचा वापरही तुम्हाला केसतोडीसाठी करता येऊ शकतो. कलौंजी तेल म्हणजे कांद्याचे तेल. त्यामुळे कांद्याप्रमाणेच याचे असतात.
- एका स्वच्छ कपड्यावर कलौंजीचे तेल घेऊन ते केसतोडीवर लावून ठेवा.
- केसतोडीवरचे तेल धुवू नका. जो पर्यंत तुम्हाला पूर्ण बरे वाटत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा वापर सुरु ठेवा.
- कलौंजी तेलामध्ये अँटिऑक्सिडेंट गुण असतात त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल.
तांदूळाचे पीठ (Rice Flour)
तांदुळाचे पीठ लावण्याचा सल्ला देखील अशा केसतोडीवर लावण्यासाठी दिला जातो.
- तांदुळाच्या पीठाची पेस्ट करुन केसतोडीवर लावा. तांदुळाच्या पीठामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे केसतोड बरा होण्यास मदत मिळते.
- फोड जाईपर्यंत तुम्ही तांदुळाच्या पिठाची पेस्ट लावू शकता.
अॅलोवेरा जेल (Aloe Vera)
अॅलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर हा अँटिफ्लेमेटरी असतो. तुमच्या केसतोडीची जळजळ त्यामुळे कमी होते.
- बाजारात मिळणारी अॅलोवेरा जेल किंवा कोरफडीचा गर लावल्यामुळे केसतोडीची जळजळ कमी होते. तुम्हाला थंडावा मिळतो.
- त्यामुळे तुम्ही अॅलोवेरा जेलचा वापर करायला विसरु नका.
थंडीत हे फूट स्क्रब आणि फूट क्रिम तुमचे पाय ठेवतील कोमल (Best Foot Scrubs In India)
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. केसतोड होण्यामागे शरीरात कशाची कमतरता कारणीभूत ठरते?
तुमच्या त्वचेवर काहीही येत असेल तर त्यासाठी तुमची अंतर्गत प्रणालीदेखील तितकीच कारणीभूत असते. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जराही फरक पडला तर तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या व्याधीतून ते दिसत राहते. केसतोड अनेकदा उष्णतेमुळेही येतो. शरीरातील उष्णता वाढल्यामुळेही केसतोड येऊ शकतात.
2. अस्वच्छतेमुळे केसतोड होतो का?
हो, अस्वच्छतेमुळे केसतोड होऊ शकतो हे खरे आहे. अपुऱ्या स्वच्छतेमुळे शरीराला होणारा हा विकार आहे. केसतोड कुठेही येऊ शकतात म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागावर ते येऊ शकतात. लघवीच्या जागी, काखेत, जाघांमध्ये तुम्हाला केसतोड येऊ शकतात. केसांना फोलिकले उकळण्यापासून रोखण्यासाठी चांगले केस काढण्याची क्रीम वापरू शकता.
3. नितंबावर केसतोडीचा त्रास जास्त का होतो?
नाजूक जागी फोड आला की, तो दुखतोच. अनेकांना नितंबावर केसतोड येण्याचा त्रास असतो. उष्णतेमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे हे फोड येतात.त्यामध्ये पू साचून राहिल्यामुळे ती पुळी / फोड सतत दुखत राहतो. बसतानाही आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणूनच नितंबावर केसतोड आले तर त्याचा त्रास खूप होतो.