आजकाल अनेकांना सांधेदुखीप्रमाणेच टाचा दुखण्याचा त्रासही मोठ्या प्रमाणावर जाणवतो. दिवसभर उभं राहणं, बैठी जीवनशैली, नियमित हिल्स घालणं, शारीरिक हालचाल कमी करणं, व्यायामाचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे तुम्हाला टाचदुखी जाणवू शकते. बऱ्याचवेळा तर बाहेर कुठेही न जाता टाचांमधुन प्रचंड वेदना जाणवतात. सकाळी उठल्यावर अथवा चालताना पाय जमिनीवर ठेवणं कठीण जाऊ लागतं. आपल्या पायांच्या टाचेत अनेक प्रकारची हाडे, सांधे आणि स्नायू जोडलेले असतात. टाच ही माणसाच्या पावलामधील एक महत्त्वाचा भाग असते. चालण्यासाठी, उभं राहण्यासाठी, आधारासाठी पायातील टाचेचा वापर सर्वात महत्त्वाचा ठरतो. यासाठी टाचदुखीची कारणं आणि त्यावर काय घरगुती उपाय करावेत हे तुम्हाला माहीत असायलाच हवं.
Shutterstock
टाचदुखींसाठी करा हे घरगुती उपाय
- जर तुम्हाला सतत टाचदुखी जाणवत असेल तर बाहेर जाताना चांगल्या फुटवेअरची निवड करा. कारण चपला अथवा बूटांच्या चुकीच्या आकारामुळे तुमच्या पावलांवर अतीताण येऊ शकतो. यासोबतच घरात चांगल्या आणि मऊ स्लिपर्स वापरा. ज्यामुळे तुमच्या पायांच्या टाचांची योग्य निगा राखली जाईल. नियमित हिल्सचे फुटवेअर घालणे टाळा. कधीतरी हिल्स घालण्यास काहीच हरकत नाही. मात्र दररोज हिल्स घातल्यामुळे तुमच्या पायाच्या टाचा दुखण्याची शक्यता जास्त आहे.
- फार तुम्हाला टाचदुखी फारच जाणवत असेल रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात मीठ घालून पायांना शेक द्या.
- निरगुडीच्या पानं गरम पाण्यात बूडवून त्या पानांनी पायाच्या टाचांना शेक द्या.
- फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेले व्यायाम नियमित करा.
- पायांच्या टाचा फार दुखत असतील तर तुम्ही बर्फाचा शेक देऊ शकता. कारण बर्फामुळे तुमच्या पायांमधील ताण कमी होतो.
- आठवड्यातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पाय आणि टाचांवर मालिश करा. तिळाच्या तेलाने मालिश केल्यामुळे पायातील स्नायू शिथिल होतात. ज्यामुळे पायांमधील रक्तप्रवाह सुधारतो. जर तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर तुम्ही नारळाच्या तेलानेदेखील मालिश करू शकता.
- शरीरातील कोणत्याही वेदना कमी करण्यासाठी तुम्ही गरम दूध, केशर आणि हळद एकत्र करून घेऊ शकता. ज्यामुळे तुमच्या पायातील वेदना कमी होतात.
- फार काळ बसून काम करावे लागत असेल तर अधून मधून पाच मिनीटे पाय आणि पावलांना स्ट्रेच करा. पायांचे तळवे सर्क्युलर मोशनमध्ये उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने कमीत कमी दहा ते पंधरावेळा फिरवा.
- जर तुम्हाला दिवसभर सतत उभं राहून काम करावं लागत असेल तर शक्य असेल तेव्हा पाच ते दहा मिनीटे बसा. कारण असं केल्यामुळे तुमच्या पाय आणि तळव्यांवर जास्त ताण येणार नाही.
- महिन्यातून एकदातरी तळव्यांना मसाज आणि स्पा बाथ द्या. ज्यामुळे तुमच्या पायांचे स्नायू आणि टीश्यूजनां आराम मिळेल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
रात्री शांत झोप येत नाही का, मग फॉलो करा या टिप्स
कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय
गोड खाण्याने नाही तर ‘या’ पेयांमुळे वाढतं वजन, शक्यतो टाळा ही पेयं