ADVERTISEMENT
home / Fitness
Home Remedies For Dry Cough In Marathi

कोरडा खोकला साठी घरगुती उपाय (Home Remedies For Dry Cough In Marathi)

खोकला एकदा झाला की तो पटकन बरा होत नाही अशी तक्रार आपण बऱ्याच जणांकडून ऐकत असतो. पण खोकल्यामध्येही काही प्रकार आहेत. त्यापैकी जर तुम्ही कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल आणि हा खोकला बरा होत नसेल तर तुम्हाला काळजी घेणं आणि वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. कोरड्या खोकल्यावर नक्की काय उपाय आहेत आणि घरगुती उपायांनी तुम्ही कसा हा खोकला बरा करू शकता हे आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. खरं तर पहिला प्रश्न हा निर्माण होतो की , कोरडा खोकला होण्याचा काही काळ आहे का? तर असं काहीही नाही. कोरडा खोकला कोणत्याही हंगामात तुम्हाला होऊ शकतो. तुम्हाला कोणतीही अलर्जी असेल किंवा प्रदूषणाचा त्रास असेल तर कोरडा खोकला हा निश्चितच होतो. खरं तर कोरड्या खोकल्यामध्ये कफ नसतो आणि घसा कोरडा पडून तुम्हाला सतत खोकला येत राहतो. यावर बऱ्याचदा आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का? यावर तुम्ही घरगुती उपचारदेखील करू शकता. पाहूया आपण काय आहेत कोरडा खोकला साठी घरगुती उपाय.

1. गायीच्या दुधाचं तूप आणि काळी मिरी

Shutterstock

आता हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण हा उत्तम उपाय आहे. गायीच्या दुधाचं तूप तुम्ही साधारण 15-20 ग्रॅम घ्या आणि त्यामध्ये 10-12 काळी मिरी घेऊ एका वाटीत गॅसवर गरम करायला ठेवा. जेव्हा यातील काळी मिरी फुटायला लागेल तेव्हा तुम्ही हे गॅसवरून खाली उतरवा. त्यानंतर जास्त वेळ ठेऊ नका. हे मिश्रण जरा थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेली खडीसाखर मिक्स करा आणि काळ्या मिरीचं हे मिश्रण कोरडा खोकला असणाऱ्यांना खायला द्यावं. एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे खाल्ल्यानंतर साधारण एक तास तुम्ही काहीही खाऊ अथवा पिऊ शकत नाही. हा उपाय तुम्ही कोरडा खोकला जाईपर्यंत एक ते दोन दिवस आड करावा. याचा चांगला परिणाम होऊन खोकला ठीक होण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

जेवणात स्वाद वाढवण्यासह काळी मिरीचे असेही फायदे

2. हळद आणि दूध

हळद आणि दूध

हा उपाय तर सगळ्यांना माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, दूध गरम केलेलं असावं. गरम दुधात केवळ हळद मिक्स करावी आणि त्या गरम दुधाचं सेवन करावं. त्यामुळे तुमच्या घशाला आराम मिळतो आणि कोरडा खोकला लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते. 

3. खडीसाखर

खडीसाखर चघळत राहिल्यानेदेखील कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते. इतकंच नाही तुम्ही खडीसाखरेची पावडर करून ती थोड्या थोड्या वेळाने खात राहिल्यासदेखील तुमच्या घशाला त्रास होत नाही. तसंच तुम्हाला वरचेवर जर खोकल्याचा त्रास होत असेल तर नेहमी खडीसाखर तुम्ही जवळ ठेवावी. यामुळे तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास होणार नाही. नियमित खडीसाखर खात राहिल्यास, तुमच्या घशावर प्रदूषणाचा परिणाम न होता खोकलादेखील दूर राहातो.

ADVERTISEMENT

4. मध

मध

मधामध्ये अँटिबॅक्टेरियल तत्व असतात. त्यामुळे घशाला कोरड पडायला लागल्यावर अथवा जास्त कोरडा खोकला यायला लागल्यावर मध दिलं जातं. हा अनेक वर्षांपासूनचा घरगुती उपाय आहे. अतिशय सोपा आणि रामबाण उपाय म्हणून कोरड्या खोकल्यावर मधाच्या चाटणाचा वापर केला जातो. यासाठी तुम्ही शुद्ध मधाचा वापर करायला हवा हे मात्र कायम लक्षात ठेवा. तसंच तुम्ही नियमित सकाळी रोज एक चमचा मध घेतल्यास, तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास होणार नाही हे नक्की. 

5. हळद, सुंठ आणि गूळ

हळद,  सुंठ आणि गूळ

हादेखील कोरड्या खोकल्यावरील रामबाण उपाय आहे. तुम्हाला जर कोरड्या खोकल्याची उबळ येत असेल तर तुम्ही हळद, सुंठ आणि गूळ मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवून ठेवा आणि साधारण अर्धा तासाने ही गोळी खा. फक्त एक लक्षात ठेवा या गोळीचा आकार अत्यंत लहान असणं गरेजचं आहे अन्यथा शरीरावर अन्य परिणाम होण्याची शक्यता असते. 

ADVERTISEMENT

दररोज धण्या-जिऱ्याचं पाणी प्या आणि निरोगी राहा

6. डाळिंबाच्या सालीचा काढा

डाळिंबाच्या सालीचा काढा

हे वाचल्यानंतर थोडंसं तोंड आधीच खराब नक्की होईल. पण डाळिंबाची साल अथवा या सालीचा काढा करून त्यात तूप आणि सैंधव मीठ घाला. हे करून कोरड्या खोकल्यावर प्यायला दिल्यास, कितीही खोकला झाला असेल तरी त्वरीत बरा होतो. 

 

ADVERTISEMENT

देखील वाचा – 

जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

27 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT