ADVERTISEMENT
home / Fitness
Home Remedies For Ranjanwadi In Marathi

डोळ्यांना येणाऱ्या रांजणवाडीवर हे करा घरगुती उपाय (Home Remedies For Ranjanwadi)

डोळ्यांच्या आजारांकडे मुळीच दुर्लक्ष करुन चालत नाही. डोळ्याला जराही त्रास जाणवत असेल तर त्याच्यावर योग्य इलाज योग्यवेळी करणे फारच गरजेचे असते. नाहीतर अंधत्व येण्याची शक्यता असते. डोळ्यांसंदर्भात असणाऱ्या वेगवेळ्या त्रासासंदर्भात आपण या आधीही माहिती घेतली आहे. डोळ्यांच्या त्रासामध्ये डोळा येणे,मोतिबिंदू, काचबिंदू, पाझरु,रांजणवाडी असे काही त्रास डोळ्यांना होतात. यापैकी अगदी सगळ्यांनाच कधी तरी डोळ्यांना होणारा त्रास म्हणजे ‘रांजणवाडी’. एखादी पुळी आल्याप्रमाणेच ती दिसते. डोळ्यांच्या वरच्या भागाला एक पुळी येते. त्यामुळे डोळा सतत दुखत राहतो. घरीच त्याची योग्य काळजी घेतली तर ती जाते देखील. म्हणूनच आज डोळ्यांना रांजणवाडी हा होते? आणि त्यावरील घरगुती उपाय कोणते ते आज विस्तृतपणे आज जाणून घेऊया.

रांजणवाडी म्हणजे काय ? (What Is Eye Stye)

रांजणवाडी का होते

Instagram

ADVERTISEMENT

रांजणवाडी का होते या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी रांजणवाडी म्हणजे काय ते जाणून घेणे फारच गरजेचे आहे. डोळ्यांच्या पापण्यांच्या मुळाशी रांजणवाडी येते. त्या ठिकाणी एक आधी एक बारीक पुळी येते. त्यामध्ये पू साचतो आणि मग ती मोठी जाते. काही तासातच यामध्ये पू साचतो.यामध्ये पू साचल्यामुळेच डोळा सतत ठुसठुसत राहतो. डोळ्यांना काहीही लावल्यास कळ येते. डोळ्यांचा त्रास मधील रांजणवाडी हा एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन असून याची योग्य काळजी घेतली तर रांजणवाडी ही अगदी आठवड्याभरात निघून जाते. रांजणवाडी अर्थात पुळीमधून पू निघून गेला की  बरे वाटते.

रांजणवाडीचे प्रकार (Types Of Stye)

रांजणवाडीचे प्रकार

Instagram

ADVERTISEMENT

रांजणवाडी का होते हे जाणून घेतल्यानंतर रांजणवाडीचे प्रकार जाणून घेऊया कारण रांजणवाडी ही दोन पद्धतीने डोळ्यांवर येत असते. तुम्हाला आलेली रांजणवाडी कोणत्या प्रकारातील आहे हे जाणून घेणे फारच गरजेचे असते. 

बाहेरील रांजणवाडी (External Hordeolum)

रांजणवाडी ही डोळ्यांना येत असली तरी काहींना ती पापण्यांच्या बाहेरच्या बाजूला येते. ही पुळी आलेली अगदी सहज आणि पटकन दिसते. बाहेरुन आलेल्या या पुळीवर मलम लावता येते. ही पुळी बाहेरच्या बाजूने असल्यामुळे सहज घरगुती इलाज पटकन करता येतो. 

आतील रांजणवाडी (Internal Hordeolum)

रांजणवाडी ही आतल्या बाजूने देखील येते. त्याला आतील रांजणवाडी असे म्हणतात. आत आलेली रांजणवाडी ही जास्त त्रासदायक असते. कारण डोळ्यांना काहीही लावताना तुम्हाला खूप विचार करावा लागतो. आतील रांजणवाडी ही खूप दुखते. अनेकांना डोळ्यात सतत पाणी येत राहते. आतील रांजणवाडी आली की, त्यामुळे चेहराही सुजतो. आतल्या बाजूला आलेल्या रांजणवाडीमुळे बराच त्रासही होतो. पण योग्य काळजी घेतली की, आतील रांजणवाडीही बरी होते. 

ADVERTISEMENT

रांजणवाडी येण्याची कारणे (Causes Of Stye)

रांजणवाडी येण्याची कारणे

Instagram

रांजणवाडीचे प्रकार पाहिल्यानंतर रांजणवाडी येण्याची कारणे देखील जाणून घेऊया. कारणं जाणून घेतल्यानंतर डोळ्यांना रांजणवाडी का येते ते देखील जाणून घेऊया.

अस्वच्छता (Lack Of Cleanliness)

वैयक्तिक स्वच्छता ही कोणत्याही गोष्टीसाठी फारच महत्वाची असते. डोळ्यांच्या बाबतीतही स्वच्छता फारच महत्वाची आहे. रांजणवाडी हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामळे जर एखाद्याला रांजणवाडी आली असेल आणि त्याचा कपडा किंवा त्यांनी वापरलेली कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या डोळ्यांना असा कपडा लावू नका. कारण त्यामुळे तुम्हाला रांजणवाडी येऊ शकते. डोळ्यांची अस्वच्छता हे रांजणवाडी येण्याचे एक प्रमुख कारण असू शकते.

ADVERTISEMENT

मधुमेह (Diabetes)

मधुमेही व्यक्तिंना एखादी जखम झाली की, ती जाता जात नाही. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असेल आणि त्यांच्या पापण्याचे केस ओढले गेले तर त्यांना देखील डोळ्यांच्या ठिकाणी अशी पुळी येण्याची शक्यता असते. या पुळीत पू होण्याची शक्यता असते. मधुमेही व्यक्तींना डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे मधुमेह हे देखील याागील एक कारण असू शकते.

खालावलेली रोग प्रतिकारशक्ती (Lack Of Immunity)

निरोगी आयुष्य हवे असेल तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. जर रांजणवाडी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे खालावलेली प्रतिकारशक्ती त्रासदायक ठरु शकते. कारण त्यामुळे तुम्हाला हा संसर्ग होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी तुम्ही चांगला आहार घ्यायला हवा. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन असणे फारच गरजेचे असते.

अपुरा आहार (Improper Diet)

रोगप्रतिकारशक्तीशी निगडीत असलेली गोष्ट म्हणजे आहार. जर तुम्ही योग्य जेवत नसाल तरी देखील तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. अपुऱ्या आहारामुळे तुमच्या डोळ्यांना आवश्यक असलेले घटक मिळत नाहीत. त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळेचांगला आहार घेणे टाळू नका. 

प्रदूषित वातावरण (Pollution)

वाढते प्रदूषण हे देखील रांजणवाडीसाठी कारणीभूत ठरु शकते. कारण प्रदूषित घटक डोळ्यात गेल्यामुळे डोळे कोरडे होण्याची शक्यता असते. कोरड्या डोळ्यांमुळे रांजणवाडी येण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या पापण्यांना त्रास झाल्यामुळे रांजणवाडी येऊ शकते. 

ADVERTISEMENT

रांजणवाडी घरगुती उपाय (Home Remedies For Ranjanwadi)

रांजणवाडीचे प्रकार जाणून घेतल्यानंतर आणि त्यामागची कारणे जाणून घेतल्यानंतर राजणवाडीवर तुम्ही घरगुती उपाय षोधत असाल तर तुम्ही हे काही घरगुती उपाय करु शकता.

गरम पाण्याचा मसाज (Hot Water Massage)

सगळ्यात सोपा आणि पटकन करता येईल असा उपाय म्हणजे डोळ्यांना गरम पाण्याचा शेक देणे. रांजणवाडी आल्यानंतर डोळ्यांना येणाऱ्या पुळीमध्ये पस साचलेला असतो. तो बाहेर येणे फारच गरजेचे असते. ती पुळी योग्य पद्धतीने फुटली. पस बाहेर निघून गेला की खूप बरे वाटते. त्यामुळे एक स्वच्छ कपडा घेऊन तो गरम पाण्यात बुडवा आणि मग तो डोळयांना लावा. डोळ्यांचे ठुसठुसणे कमी होईल. शिवाय जर पुळीला तोंड आले नसेल तर ते देखील येईल त्यामुळे पुळी योग्यवेळी फुटेल. 

लसणीचा रस (Garlic Juice)

लसणीचा रस

ADVERTISEMENT

Instagram

लसूण ही उष्ण असते. तिचा रस थोडासा कापसावर घेऊन रांजणवाडीवर लावला. तर ती पुळी लवकर बरी होण्यास मदत करते. शक्य असेल तर एका स्वच्छ भांड्यात लसणीची पाकळी घेऊन ती कुटून घ्या. त्याचा रस काढून तो स्वच्छ बोटाने डोळ्यांच्या वर लावा.  लसणीचा रस लावल्यानंतर थोड चुरचुरल्यासारखे वाटेल. पण तुम्हाला थोड्यावेळाने नक्कीच बरे वाटेल. आठवड्याभरात तुमची ही पुळी फुटून तुमचा डोला पूर्ववत होईल. 

केस काढणे (Affected Hair Plucking)

केस परतल्यामुळे जसा आपल्याला  केसतोडीचा त्रास होतो. अगदी त्याच पद्धतीने पापणीचा केस दुखावला की हा त्रास होण्याची शक्यता असते. रांजणवाडीमध्येही पापणीच्या एका केसाखाली सगळा पू अडकलेला असतो. जर तो पापणीचा केस इतर कोणत्याही केसांना न हलवता काढता आला की, त्या पुळीमधून सगळा पू अगदी सहजपणे बाहेर पडतो. असे करताना तुम्हाला पुळी दाबण्याची मुळीच गरज नसते. तुम्ही अगदी सहजपद्धतीने तुमचा तो केस काढलात की, तुम्हाला रांजणवाडीपासून त्वरीत आराम मिळेल.

धण्याचे दाणे (Coriander Seeds)

धण्याचे दाणे

ADVERTISEMENT

Instagram

धणे हे देखील रांजणवाडीवर उत्तम काम करतात. धण्याचा पाण्याने जर तुम्ही डोळे अलगद धुतले तर ते एखाद्या मलमाप्रमाणे काम करतात. तुमच्या डोळ्यांमधील घाण आणि रांजणवाडी पुळी कमी करुन त्याला आराम धण्यामुळे मिळते. एका भांड्यात एक चमचा धण्याचे दाणे घेऊन ते चांगले उकळा. पाणी थंड झाले की, एका स्वच्छ कपड्याने डोळ्यांना लावून ठेवा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

हळद (Turmeric Powder)

हळद ही अँटीसेप्टिक असून अनेक जखमांवर ती रामबाण असा इलाज आहे. शिवाय नैसर्गिक असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत नाही. हळद भिजवून ती डोळ्यांना लावून ठेवली तरी देखील तुमच्या रांजणवाडीवर आराम मिळतो.  हळदीचा लेप तयार करुन डोळ्यांना लावत असाल तर तो काढून टाकताना ही योग्य काळजी घ्या. डोळ्यांना लावलेला हा लेप  योग्य पद्धतीने काढणेही गरजेचे असते. 

बेबी शँम्पू (Baby Shampoo)

बेबी शँम्पू

ADVERTISEMENT

Instagram

अस्वच्छता हे रांजणवाडीचे महत्वाचे कारण आहे. जर तुम्हाला डोळ्यांची स्वच्छता या काळात राखायची असेल तर तुम्ही बेबी शँम्पूचा उपयोग करा. त्वचा किंवा केस धुताना याचा वापर केला तर डोळ्यांत कोणतेही हानिकारक केमिकल्स जात नाहीत. शिवाय डोळे स्वच्छ होण्यासही मदत मिळते. त्यामुळे बेबी शँम्पू हा त्यावर एक उत्तम इलाज आहे.

कोरफडीचा गर (Aloe Vera Gel)

कोरफडही थंड असते. रांजणवाडीमध्ये डोळे सतत जळजळत असतात. डोळ्यांची आग होते. डोळ्यांमधून पाणी आल्यासारखे होते. अनेकदा ही पुळी इतकी मोठी होते की, डोळे उघडण्यासही अडथळा होते. डोळ्यांचे सतत दुखणे त्रासदायक ठरते. अशावेळी डोळ्यांना थंडावा देण्याचे काम कोरफरडीचा गर करते. अगदी कमीत कमी कोरफड गर लावून थोडा वेळ आराम करा. जळजळ कमी होईल. 

पेरुची पाने (Guava Leaf)

पेरुची पाने

ADVERTISEMENT

Instagram

पेरुची पाने ही देखील रांजणवाडीवर अत्यंत गुणकारी असतात. पेरुचे एक ताजे पान घेऊन ते कुटून रांजणवाडी आलेल्या डोळ्यांना लावावे. पेरुच्या पानांमुळे डोळ्यांना आराम मिळतो. रांजणवाडी बरी होण्यास मदत मिळते. दिवसातून एकदा जरी तुम्ही हा गर लावला तरी देखील तुम्हाला होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.

बटाट्याचा रस (Potato Juice)

बटाटा हा अनेक ठिकाणी वापरला जातो. बटाट्यामध्ये असलेला स्टार्ज त्वचेसाठी जसा फायदेशीर असतो. अगदी त्याच पद्धतीने बटाट्याचा रस रांजणवाडीवर काम करतो. रांजणवाडीवर बटाट्याचा रस लावल्यामुळे पुळी सुकण्यास मदत मिळते. शिवाय डोळ्यांचे ठुसठुसणे कमी होते. रांजणावाडीमुळे डोळ्यांवर राहणारे डागही कमी होतात. 

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’S)

1. डोळ्यांना रांजणवाडी येण्याची कारणं कोणती?

अपुरी स्वच्छता, पापण्यांचा केस निघणे, अपुरा आहार, प्रदूषण या सगळ्यामुळे तुम्हाला रांजणवाडी होण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त हा आजार संसर्गामुळे होतो.

2. रांजणवाडी संसर्गजन्य आहे का?

रांजणवाडी हा संसर्गजन्य आजार आहे. एखाद्याला रांजणवाडी आली असेल आणि तुम्ही जर त्याच्या खासगी वस्तू काही काळासाठी वापरत असाल तर अशामुळे हा आजार पसरण्याची शक्यता ही फार जास्त असते. त्यामुळे रांजणवाडीचा त्रास हा 100 % संसर्गजन्य आहे. पण जर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हा त्रास तुम्हाला सहज होत नाही.

3. रांजणवाडीत कधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते?

रांजणवाडीमध्ये डोळ्यांच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे पुळ्या येण्याची शक्यता असते. आत येणारी रांजणवाडी ही तुलनेने जास्त त्रासदायक असते. अशी पुळी तुम्हाला आली असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार करा. बाहेर आलेल्या रांजणवाडीचा त्रासही जास्त होत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जा.

आता रांजणवाडी आली तर तुम्ही घरगुती उपाय करुन नक्की बघा. आणि तुमच्याकडे काही घरगुती उपाय  माहीत असतील तर ते आम्हालाही कळवा. 

06 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT