ADVERTISEMENT
home / सौंदर्य
सिल्की आणि शायनी केस हवेत मग वापरा हे घरगुती हेअर मिस्ट

सिल्की आणि शायनी केस हवेत मग वापरा हे घरगुती हेअर मिस्ट

केसांची निगा राखण्यासाठी फार खर्च करण्याची अथवा महागडे प्रॉडक्ट वापरण्याची गरज नाही. कारण सतत वातावरणात होणारे बदल, प्रदूषणाचा परिणाम तुमच्या केसांवर होत असतो. जर तुम्ही काही घरगुती उपाय तुमच्या डेलि हेअर केअर रूटिनमध्ये समाविष्ट केले तर तुमचे केस नक्कीच मऊ, मुलायम दिसतील. एवढंच नाही तर त्यामुळे तुमच्या केसांवर नैसर्गिक चमकदेखील येईल.  तुमच्या कोरड्या आणि  रूक्ष केसांसाठी नारळाचे तेल, गुलाबपाणी अशी घरगुती वस्तू वापरून तुम्ही एक छान हेअर मिस्ट बनवू शकता. जाणून घ्या हेअर मिस्ट बनवण्याची सोपी पद्धत…

हेअर मिस्ट कसे बनवाल

घरच्या घरी काही नैसर्गिक घटक वापरून तुम्ही हेअर मिस्ट बनवू शकता. यासाठी फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप पद्धत

हेअर मिस्टसाठी साहित्य –

  • दोन चमचे नारळाचे तेल
  • एक कप गुलाबपाणी

हेअर मिस्ट बनवण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • एक कप गुलाबपाण्यात दोन चमचे नारळाचे तेल मिक्स करा. एका स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण टाका आणि बॉटल चांगली ढवळून घ्या. 
  • हेअर मिस्टचा वापर तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर केसांवर करू शकता.
  • केस धुतल्यानंतरही तुम्ही हेअर मिस्ट केसांवर स्प्रे करू शकता.
  • केस धुण्याआधी केसांना तेल लावलेले नसेल तर अर्धा तास आधी केसांना हेअर मिस्ट लावा.
  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोरफडाचा गर, जास्वंदीच्या फुलांचा अर्क, मेथीच्या  दाण्याचे पाणी, ग्लिसरिन असे अनेक घटक वापरू  शकता.

केसांची कशी राखाल काळजी

केस कोरडे झाल्यास ते  तुटतात आणि गळू लागतात. यासाठी केसांची अशी राखा निगा

  • केसांना दिवसभरात एकदा  तरी होममेड हेअर मिस्ट लावा. 
  • दर तीन महिन्यांनी केस ट्रिम करा. ज्यामुळे तुमच्या केसांना फुटलेले फाटे निघून जातील आणि केसांची वाढ चांगली होईल.
  • आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना हॉट ऑईल मसाज करा. यासाठी तुम्ही नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल अथवा तुमच्या आवडीचे हेअर ऑईल वापरू शकता.
  • केस कधीच गरम पाण्याने धुवू नका. केसांवर गरम पाणी वापरल्यामुळे केसांची मुळं कमजोर होतात आणि तुटतात. यासाठी केसांवर कोमट पाणी वापरा.
  • केसांवर वारंवार स्ट्रेटनिंग, आर्यनिंग, ब्लो ड्राय अशा ट्रिटमेंट करू नका. या उपकरणांमुळे केसांना अती उष्णता मिळाल्यास केसांचे नुकसान होते.
  • केस धुतल्यावर टॉवेलने रगडून केस पुसू नका. केस पुसण्यासाठी जुन्या सूती कपड्याचा अथवा टी शर्टचा वापर करा. धुतलेल्या केसांचे पाणी आधी टिपून घ्या मग केस कोरडे करा.

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या हेअर केअर टिप्स आणि  हेअर मिस्ट बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेट बॉक्समधून जरूर कळवा. यासोबतच तुम्हाला केसांची निगा राखण्यासोबत  आणखी कोणत्या टिप्स हव्या आहेत किंवा केसांबाबत तुमच्या काय समस्या आहेत तेही आम्हाला जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

कुरळ्या केसांसाठी हेअर केअर रूटीन, नक्की घ्या जाणून

सतत करत असाल या हेअर स्टाईल कर केस होतील खराब

कोंडा का होतो आणि कशी सुटका मिळवावी (How To Remove Dandruff In Marathi)

05 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT