ADVERTISEMENT
home / भविष्य
17 जानेवारी 2019 चं राशीफळ

17 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार नाही. विशेषत: रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी आज विशेष काळजी घ्यायची आहे. कुठल्याच गोष्टीची चिंता किंवा जास्त विचार, दगदग आज करू नका. आज शक्य तितके इतरांचे आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करा. त्याने प्रसन्नतेचे वातावरण तयार करण्यास तुम्हाला मदत होईल व मनशांतीचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता. आज महत्त्वाची जी कागदपत्रे असतील ती सांभाळून ठेवा. नाही तर वेळेवर ती मिळणार नाहीत. संतती आज सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करेल.

कुंभ – मुलांच्या वागणूकीकडे दुर्लक्ष करा

कोणत्याही सुज्ञ आई-वडीलांचे आपल्या मुलांकडे बारीक लक्ष असतं. अर्थातच त्यांच्या चांगल्यासाठीच ते असतं. मात्र ते करीत असतांना मुलांनी आपल्या आवडीप्रमाणे वागवं असा पालकांचा हट्ट होऊन बसतो. हा हट्ट आज तुम्हाला सोडावा लागेल. कारण आज मुलं तुमच्या आवडीप्रमाणे वागणार नाहीत. त्याकरीता आज त्यांच्या वागणूकीकडे थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल. एखादं काम अपूर्ण असेल तर आज प्रयत्न वाढवायला हरकत नाही. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. कुटुंबात एखाद्या प्रसंगी आज तुम्ही धैर्याने निर्णय घेणार आहात. त्या निर्णयाचं स्वागतही होऊ शकतं. आज नवीन ओळखीही तुमच्या होऊ शकतात.

ADVERTISEMENT

मीन – व्यवसायात यश मिळेल

व्यवसायात चढ उतार सुरुच राहत असतात. चढ व उतार दोन्ही गोष्टींमध्ये सतर्क राहणं व्यावसायिकाला आवश्यक असतं. आज याचा प्रत्यय तुम्हाला येऊ शकतो. आज सतर्क राहिल्याने तुम्ही व्यवसायात यश प्राप्त करु शकतात. त्याचा व्यावसायिकांनी योग्य लाभ करुन घ्यावा. आज धार्मिक कार्यातून तुम्हाला आनंद प्राप्त होईल. त्यामुळे मनशांतीचाही तुम्ही अनुभव घेऊ शकतात. आज तुमच्या संततीलाही यश प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे घरातही आनंदाने वातावरण राहील. एकंदरीतच आज तुम्ही आत्मवि•ाासाने परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे आजच्या दिवसाचा योग्य लाभ करुन घ्यावा.

वृषभ – लहान भावांची काळजी घ्या

आयुष्य म्हणजे तडतोड व सोबत असणाऱ्या सर्वांची काळजी घेत सुख-दु:खाचा सामना करीत राहणे असे आपण सर्वसाधारणपणे म्हणून शकतो. मात्र आपल्या दिनचर्येत किंवा कामाच्या व्यापामध्ये आपले आपल्याच व्यक्तींकडे दुर्लक्ष होत जाते. आज तुम्हाला ते टाळावे लागणार आहे. आज घरात लक्ष घालून विशेषत: लहान भावंडाची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. त्यातून तुम्हाला आनंदही प्राप्त होऊ शकतो. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज दिवस सर्वाेत्तम आहे. त्यामुळे आज आपले सर्व लक्ष अभ्यासात असू द्यावे. यश मिळविण्यासाठी परिश्रमांसह भाग्याची साथ लागते. आज आधी परिश्रम नंतर भाग्य याचा अनुभव तुम्हाला मिळू शकतो.

ADVERTISEMENT

मिथुन – संपत्तीचा वाद मिटेल

परिवारातील संपत्तीचा वाद हा अनेक घरांमध्ये विष पसरविण्याचे काम करत असतो. या वादातून अनेक परिवार विभक्त झालेले आपण बघत असतो. त्यामुळे हा वाद टाळलेलाच बरा असतो. तुमच्या परिवारामध्ये असा वाद असेल तर आज खूप चांगला दिवस आहे. त्यामुळे आज वाद मिटवि­ण्यासाठी तुम्हाला जितके प्रयत्न करणे शक्य आहे ते करायला आज अजिबात चुकू नका. तसेच आज तुम्ही तुमच्या शब्दांवरही नियंत्रण ठेवायला पाहिजे. जे बोल ते तोलून मोलूनच बोलले पाहिजे. व्यवसायत आज यश प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे व्यावसायिकांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. आज अन्नबाधाही होऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी तुम्हाला आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे.

कर्क – योग्यतेची उंची वाढेल

जीवनात असे अनेक काही प्रसंग येतात, ज्या प्रसंगांमधून आपल्या योग्यतेची, पात्रतेची जगाला ओळख होत असते किंवा त्यांच्या दृष्टीमध्ये आपल्या योग्यतेची उंची वाढत असते. अशा गोष्टींमुळे आपल्या मानसन्मानामध्येही वाढ होत असते. आजा अनुभव आपल्याला करुन देणारा आजचा दिवस आहे. आज तुमच्या योग्यतेची उंची वाढून मानसन्मानातही वाढ होण्याचे योग आहे. त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करुन घ्या. आज तुमच्या विचरांचे विरोधक असणारे शत्रुही पराभूत होऊ शकतात. त्यामुळे आनंदात वाढ होऊ शकते. मात्र आज  तुम्ही जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न कराल. सासूरवाडीकडून एखाद्या गोष्टीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.

ADVERTISEMENT

सिंह – धार्मिक कार्यात आनंद मिळेल

धार्मिक कार्यातील सहभाग हा नेहमीच आपल्याला आनंद मिळवून देत असतो. मानसिक शांती प्राप्त करण्याचे आजच्या काळातील ते एक साधनही आहे. याचा आज तुम्ही अनुभव घेऊ शकता. वैवाहिक आयुष्यातील विविध रंगही आज तुम्ही अनुभवू शकता. त्यामुळे घरामध्ये आनंदी आनंद असेल. मात्र थोडी लवचिकता वाढवा. तडजोडीचे धोरण स्विकारा. प्रत्येक गोष्टीमध्ये आपलाच हेका प्रत्येकवेळी मिरविणे योग्य नसते. संसार म्हणजे तडजोड व सर्वांना सोबत घेऊन चालणे ही सत्यता लक्षात घ्या. तरच आजचा तुमचा दिवस आनंददायी होईल.

कन्या –  शत्रू वरचढ होतील

आयुष्यामध्ये आपला कुणाशी वैयक्तिक वाद नसला तरी आपल्या विचारांचे समर्थक व विरोधक हे आपोआप तयार होत असतात. समर्थक आनंद देतात तर विरोधक आपल्या कार्यात अडचणी निर्माण करणारे ठरतात. आपला काहीही दोष नसतानासुद्धा हे घडून येतं. याचा अनुभव आज तुम्हाला मिळू शकतो. कारण आज तुमचे शत्रू वरचढ होणार आहेत. मात्र त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते त्यांचं काम करीत आहेत, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. आज एखाद्या गोष्टीवर विनाकारण तुम्हाला रागही येऊ शकतो. त्यामुळे चित्त विचलित होणार नाही, याची काळजी घ्या. आज तुमचा वडीलांशीही संघर्ष होऊ शकतो. जी चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे वाद वाढणार नाही किंवा होणारच नाही याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आज तुमचा खर्चही होऊ शकतो. मात्र त्यातूनही तुम्ही आनंद मिळविण्याचा प्रयत्न कराल.

ADVERTISEMENT

तूळ – वैरभावनेचा त्याग करा

जीवन जगत असताना एखाद्याशी मतभेद होणं ही साहजिक गोष्ट आहे. मात्र वाद हा वैचारिक असावावैरभावना तर अजिबात नकोच. कारण कोणताही व्यक्ती हा पूर्णपणे चांगला किंवा वाईट असूच शकत नाही. म्हणून आज वैरभावनेचा त्याग करावा. त्यातच तुमचा लाभ आहे. तसेच आज शब्दांवरही तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. भावनांच्या आहारी जाऊन तडका फडकी एखाद्याविषयी शेरेबाजी करणे आज चुकीचे ठरु शकते. तसेच आज तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी चिंतनही करणार आहात. मात्र त्या चिंतानाचे चिंतेत रुपांतर होऊ देऊ नका.

वृश्चिक – भावंडांशी मतभेद होतील

घरात जसं प्रेम बहराला येतं तसंच एखाद्या दिवशी मतभेदही होतात. हे साहजिक असलं तरी त्याचं वादात रुपांतर होता कामा नये. झालं तर तो वाद अधिक खेचता कामा नये. नाही तर घरात, संबंधांमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता असते. ही काळजी आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे. कारण आज तुमच्या भावडांशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे वाद होणार नाही, झाला तरी वाढणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आज तुमचे मनस्वाथ्यही बिघडू शकते. त्यामुळे त्याची काळजी घ्यावी. संपत्तीतूनही आज लाभ मिळू शकतो. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.

ADVERTISEMENT

धनु – आरोग्याकडे लक्ष द्या

रोजच्या दिनचर्येमध्ये व्यक्ती इतका गुरफटून जात असतो, की आयुष्यात ज्या गोष्टींकडे त्याने विशेष लक्ष दिले पाहिजे त्याकडे लक्ष देणे त्याला शक्य होत नाही. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे आपले आरोग्य होय. ही सत्यता आज आपण स्विकारली पाहिजे. आज थोडं आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. ते सुदृढ राहिलं तर बाकीच्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने तुम्ही करु शकाल. आज तुम्हाला जोडीदाराचेही सहकार्य मिळणार आहे. आज जोडीदाराच्या मनाप्रमाणे तुम्ही वागणार आहात. त्यामुळे आज आपला खर्चही होऊ शकतो. जो तुम्ही आनंदाने कराल. आज वाहन सावकाश चालवा. एखाद्या ठिकाणी तातडीने पोहोचायचे असल्यास वेळेच्या थोडं आधी निघा. आज तुम्ही जोड व्यवसाया संदर्भाताही विचार करणार आहात.

मकर – एकांताची आवश्यकता भासेल

कधी कधी लक्ष विचलित झाल्याने, आत्मविश्वास कमी झाल्याने चिंतन करण्यावर आपला भर असतो. त्यासाठी आपण एकांताच्या शोधात असतो. आज आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी तुम्हाला एकांताची आवश्यकता भासेल. तो मिळवून तुम्ही आज चिंतन करु शकता. मात्र त्या चिंतनाचे चिंतेत रुपांतर होता कामा नये. आज तुमच्यावर जोडीदाराचाही प्रभाव राहिल. जोडीदाराच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आज वागणार आहात. आज तुम्हाला अपचनाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्यावी. स्त्री पक्षाकडून तुम्हाला आज सहयोग मिळू शकतो. तो मिळाल्यास आनंद प्राप्त होईल.

ADVERTISEMENT

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद

15 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT