मेष – प्रियकरामुळे तणाव वाढेल
आज तुमच्या प्रिय व्यक्तीच्या चुकीच्या वागणूकीचा तुम्हाला त्रास होणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. महत्त्वाची कामे सुधारणार आहेत. अचानक धनलाभ होऊ शकतो.
कुंभ -मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता
आज तुमच्या अमुल्य वस्तूंची काळजी घ्या. कर्ज घेणे सध्या टाळा. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. मित्रांची मदत मिळेल.
मीन- आरोग्याच्या समस्या दूर होतील
आज तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होणार आहेत. एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. व्यवसायात त्यामुळे चांगला फायदा होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
वृषभ – रखडलेले पैसे परत मिळतील
आज तुमचे रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नवीन कामांमुळे उत्साही राहाल. कौटुंबिक कामांसाठी केलेला प्रवास फायद्याचा ठरेल. देणी घेणी सावधपणे करा.
मिथुन – मन निराश होण्याची शक्यता
आज तुम्हाला वातावरणातील बदलांमुळे आजारपण येण्याची शक्यता आहे. सर्व काही ठीक असूनही मन निराश होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत असेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी अधिकारी सहकार्य करतील.
कर्क – वाद संपेल
आज तुम्हाला प्रेमाचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठित व्यक्तीशी भेट होईल. यशाच्या मार्गातील अडचणी दूर होतील. धनसंपत्तीबाबत सावध राहा. जोडीदारासोबत प्रवासाला जाल. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.
सिंह – नकारात्मक विचारांमुळे मन निराश होईल
आज विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानामुळे समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
कन्या – नवीन योजना सफळ होतील
आज व्यवसायात चांगली संधी मिळाल्याने मन आनंदी असेल. एखाद्या नव्या कामाला सुरूवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. रचनात्मक कार्यातून सन्मान मिळेल. धनसंपत्तीत वाढ होणार आहे. जोडीदाराची योग्य साथ मिळेल.
तूळ – कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याची शक्यता
आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. बेसावध राहील्यास महत्त्वाचे काम विसराल. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. आर्थिक स्थिती चांगली असेल. रचनात्मक कार्यातून प्रसिद्धी मिळेल.
वृश्चिक – डोळ्यांच्या समस्या जाणवतील
आज तुम्हाला डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. लहान-सहान आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या व्यवहारामुळे निराश व्हाल.
धनु – वृद्धांच्या मदतीने समस्या सुटतील
आज तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींच्या मदतीने अनेक समस्या सुटणार आहेत. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जुन्या मित्रांची भेट फायद्याची ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. लहानसहान आजारपणे येण्याची शक्यता आहे.
मकर – स्पर्धा परिक्षेत यश
आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. कामातील कौशल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या संस्थेकडून मानसन्मान मिळेल.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती