मेष – घरातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडेल
आज तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. प्रेम प्रकरणासाठी चांगला काळ आहे. युवकांना यश मिळेल. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ – आरोग्य सुधारेल
आज तुमच्या तब्येतीत सुधारणा असेल. नवीन योजनांच्या प्रती उत्साहित राहाल. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वाढ आणि विस्तार होईल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मेहनत घ्यावी लागेल.
मीन – प्रेमात निराशा होण्याची शक्यता
आज तुम्हाला प्रेमात निराशा सहन करावी लागेल. प्रवासाला जाणे सध्या टाळा. वादविवाद घालू नका. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. विद्यार्थ्यांना साहित्य आणि संगीताची ओढ लागेल. विरोधकांपासून सावध राहा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे.
वृषभ – नवीन घर अथवा जमीन खरेदी कराल
आज तुम्हाला शिकवण्यातून धनप्राप्ती होण्याचा योग आहे. नवीन घर अथवा जमीन खरेदी कराल. व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत रोमॅंटिक प्रवासाला जाल. महत्त्वपूर्ण निर्णय तर्कशुद्ध विचार करून घ्या. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन – सुखद समाचार मिळण्याची शक्यता
आज प्रिय व्यक्तीसोबत तुमचा समजूतदारपणा आणि विश्वास वाढेल. सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. व्यावसायिक भागिदारी लाभदायक ठरेल. सामाजिक प्रगतीत रस वाढणार आहे.
कर्क – नोकरीचा शोध संपणार आहे
आज तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. कामाच्या ठिकाणी समस्या येतील. आर्थिक बाबतीत नीट विचार करा. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह – धनप्राप्तीचा योग आहे
आयात-निर्यातीच्या व्यवसायात धनप्राप्तीचा योग आहे. कौटुंबिक समस्या दूर होतील. महत्त्वाची आणि रखडेलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मानात वाढ होणार आहे. एखाद्या अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – समस्या येण्याची शक्यता आहे
आज व्यवसाय अथवा कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिक्षक नाराज होतील.रागावर नियंत्रण ठेवा. देणी-घेणी सांभाळून करा. उत्पन्न आणि खर्चात नियंत्रण ठेवा. भावंडांची साथ मिळेल.
तूळ – वेदना आणि आळसामुळे थकवा जाणवेल
आज तुम्हाला शारीरिक वेदना आणि आळसामुळे थकवा जाणवेल. विरोधक तुमच्या कमजोरीचा फायदा उचलतील. वादविवादाची परिस्थिती निर्माण होईल. कौटुंबिक सहकार्य वाढणार आहे. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – कौटुंबिक साथ मिळेल
कठीण काळात तुमचे कुटुंब तुमच्यासोबत असेल. खऱ्या प्रेमाचा शोध पूर्ण होणार आहे. प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल. कोर्ट कचेरीतून सुटका होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल.
धनु – युवकांना रोजगाराची चांगली संधी मिळेल
आज युवकांना चांगला रोजगार मिळणार आहे. नवीन कामातून गुंतवणूकीसाठी पैसे जमा करता येतील.रचनात्मक कार्यात यश मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. आत्मविश्वास वाढणार आहे.
मकर – मौल्यवान वस्तू खराब होण्याची शक्यता
आज एखादी मौल्यवान वस्तू खराब होण्याची शक्यता आहे. मोठी योजना आखताना सुरूवातील पैशांची कमतरता भासेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात