ADVERTISEMENT
home / भविष्य
7 जानेवारी 2019 चं राशीफळ

7 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष – प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल

जीवन जगत असताना आपण अनेक गोष्टी करत असतो तर अनेक गोष्टी आपोआप घडत असतात. आपल्या विचारांचे समर्थक व आपल्या विचारांचे विरोधक दोन्ही असतात. समर्थक आपल्याला मदत करीत असतात तर विरोधक आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करीत असतात. समजुतदार व्यक्ती समर्थकांना सोबत घेऊन आणि विरोधकांकडे दुर्लक्ष करुन कार्यरत असतात. आज अशा विरोधकांना पराभूत करण्याचे तुमचे योग आहेत. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला जोडीदारासोबत प्रवास घडेल. प्रवासातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. व्यावसायिकांनी आज थोडं सावध राहायला हवं. गोंधळामध्ये लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आज तुमच्या राशीमध्ये शुभसंकेत आहेत.

कुंभ – शिस्त पाळा
जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तप्रिय व्यक्तीचा आपलाच तोरा असतो. कारण त्यांची सर्व कामे वेळेच्या वेळी होत असतात किंवा ती ते वेळेवर करवून घेत असतो. समाजात त्यांना या गोष्टीसाठी मानदेखील मिळत असतो. हेच आपल्याला पटवून देणारा आजचा दिवस आहे. आज बेशिस्तपणा अजिबात करू नका. त्यात तुमचेच नुकसान होऊ शकतं. आज शक्यतोवर महत्त्वाचे निर्णय घेऊच नका. ओळखीच्या व्यक्तींबरोबर आज सामंजस्य वाढेल. मात्र जास्तीची बडबड न करता शक्य तेवढे मुद्देसुद बोला. त्यातच आज फायदा आहे. थोडक्यात आज सर्वच गोष्टींमध्ये तुम्हाला शिस्त पाळावी लागेल.

मीन – विचार करण्यावर भर द्या
प्रत्येक दिवस हा नेहमी वेगळा असतो. कधीकधी फक्त विचारही केला पाहिजे. आज असे केल्याने आपल्या अनेक समस्या सुटू शकतात अनेक संकल्पना स्पष्ट होऊ शकतात. दिशा मिळू शकते. आज काही क­रण्यासोबतच विचार करण्यावर अधिक भर द्या. विशेषत: आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी आज तुम्हाला एकांताची आवश्यकता भासेल. प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटेल. विचार केल्याने सहनशीलता व उत्साह टिकून राहण्यास मदत होईल. सासरकडच्या मंडळींशी वाद संभवू शकतो. मात्र कुठल्याही वादामध्ये अडकण्याचा आपला दिवस नाही. त्यामुळे त्यापासून दूर राहा.

ADVERTISEMENT

वृषभ – प्रयत्नांची दिशा बदला

कधी कधी एकच चुक आपण वारंवार करतोय असं वाटतं. कारण प्रयत्न करुनही अपेक्षित यश प्राप्त होत नाही. कधी कधी असं ग्रहांच्या दशेमुळे होत असतं तर कधी आपली प्रयत्नांची दिशा चुकीची असते. अशावेळी आपण प्रयत्नांची दिशा बदलण्याची गरज असते. आज आपल्यासोबत हे घडू शकतं. भरपूर प्रयत्न करुनही जर आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर आज प्रयत्नांची दिशा बदलून बघण्यास हरकत नाही. मात्र हे करीत असतांना विचारपूर्वकच आपण निर्णय घेतला पाहिजे. घरात मानसिक सुख शांतीचे वातावरण राहिल. त्यामुळे आनंदी आनंद असेल. मात्र मुलं तुमच्या मर्जीप्रमाणे वागणार नाहीत. मित्रांकडून आज आनंद प्राप्त होऊ शकतो. त्यांच्या सोबत तुम्ही एखाद्या गोष्टींचे नियोजन करुन मन रमविण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन –  परिश्रमाला पर्याय नाही

उचित यश प्राप्त करायचे असेल तर कठोर परिश्रमांशिवाय पर्याय नाही. यशाचा हा  त्रिकालबाधित असा मूलमंत्र आहे. याचा अनुभव आज तुम्हाला देणारा दिवस आहे. यश मिळत नसेल तर समजून घ्या की तुम्ही प्रयत्नांमध्ये कमी पडत आहात यासाठी प्रयत्न वाढवायला हवे. कुठल्याही गोष्टीचे जास्त स्पष्टीकरण किंवा बडबड आज करुच नका. जे काही बोलायचे असेल ते मुद्देसुद बोला. तेच तुमच्यासाठी हिताचे राहिल. आज सासरच्या मंडळींशी वाद संभवू शकतो. त्यामुळे कमी बोलून शक्यतोवर वादापासून दूर राहा. आज कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण भावनाविवश होऊन तो घेतला जाण्याचा धोका आहे. थोडक्यात आज कामामध्ये कठोर परिश्रम तर घरात शांत बसणेच तुमच्या हिताचे राहिल.

ADVERTISEMENT

कर्क – संधीचा लाभ घ्या
जीवनात आपल्याला अनेकदा संधी उपलब्ध होत असतात. त्यांचा योग्य उपयोग करुन घेतल्यास प्रगती शक्य आहे. फक्त मिळणारी संधी आपल्याला वेळीच ओळखता आली पाहिजे. आज आपल्यासाठी असाच संधीचा दिवस आहे. व्यवसाय व व्यापारामध्ये आज संधी मिळू शकते. तिचा योग्य उपयोग करुन घ्या. व्यवसाय वृद्धीसाठी ते लाभदायक आहे. संधीचा लाभ घेण्याच्या प्रयत्नांमध्ये संधीवाताकडे दुर्लक्ष करु नका. ज्यांना संधीवात असेल त्यांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जोडीदाराचा आज तुमच्यावर प्रभाव दिसेल. आज जोडीदाराच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागावे लागेल. घराची सुख, शांती अबाधित राहण्यासाठी ते गरजेचेही आहे. संधीचा लाभ घेण्याच्या प्रयत्नांमुळे आज तुम्ही कार्यामध्ये व्यस्त राहाल.

सिंह –  प्रयत्न वाढवा
कोणतंही काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक असतो. आत्मविश्वास असला तर व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करु शकतो. मात्र अतिआत्मविश्वास नुकसानकारक असतो. नुकसान नको असेल तर आज अतिआत्मविश्वास बाजुला ठेवून प्रयत्न वाढवायला हवेत. ­आपले जर एखादे महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण राहिलेले असेल तर आज तुम्ही प्रयत्नांमध्ये कमी पडायला नको. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज प्रवासाचेही योग आहेत. मात्र त्यात नुकसानही होऊ शकतो. आज प्रवास टाळलेलाच बरा. सावध राहा. भुतकाळात घडून गेलेल्या आनंददायी घटना आज पुन्हा आनंद देऊ शकतात. आज मन प्रसन्न राहिल.

कन्या – अचानक आनंदवार्ता मिळेल
आयुष्यात नेहमी दु:खच अनपेक्षितपणे येतं अस नाही तर कधीकधी आनंदही आकस्मितपणे येऊ शकतो. अचानक दु:ख आल्याने जसं आपल्याला धक्का बसतो तसं आकस्मिक मिळालेल्या आनंदामुळेदेखील आपल्या आनंदाला पारावार राहत नाही. मग तो आनंद अगदी छोटासा जरी असला तरी त्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. आज याची अनुभूती देणारा आजचा दिवस आहे. प्रयत्नांमुळे शत्रुही आज पराभूत होतील. आनंद द्विगुणीत होण्याची शक्यता आहे. परिणामी आत्मिक समाधान प्राप्त होऊन ईश्वराची आपल्यावर कृपा असल्याची भावना मनात दाटून येईल. व्यायामाला महत्व देऊन वेळोवेळी व्यायाम करीत राहा.आज तुमचं राशीफळ उत्तम आहे.

तुळ – घरात शांती राखा
घरात एकत्र कुंटुंबात राहत असताना सगळ्यांचे स्वभाव, हित लक्षात घेऊन, मन सांभाळून आपल्याला वागावे लागते. काही वेळेला तर आपली काही चूक नसतानादेखील आपल्याला दोष दिला जातो. अशा वेळी मनाला जास्त लावून न घेता कार्यरत राहणं आणि घरात शांती राखण्यासाठी प्रयत्न करणे हेच आपल्या हिताचे असते. आजचा आपला दिवस असाच काहीसा आहे. घरात जर कुठले शितयुद्ध सुरु असेल तर ते वेळीच थांबवा. त्याला वाढू देऊ नका. घरात अशांती निर्माण होण्याची शक्यता आहे. संततीकडून आज सुर्वाता कानी येईल. आज मुलांना यश मिळू शकतं. उत्पन्न व खर्च यांचा आज ताळमेळ तुम्हाला घालावा लागेल, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होता कामा नये. प्रियकरांसाठी आज आनंदाचा दिवस असून प्रेयसीची भेट होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

वृश्चिक – उत्साहाचा लाभ घ्या

उत्साह आपोआप येत नसतो. तो प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवावा लागतो. मात्र वाढत्या उत्साहाचा योग्य उपयोगही करुन घेता आला पाहिजे. एखादे काम उत्साहाने केले तर त्यात यश लवकर मिळतेच. आपल्याला हे पटवून देणारा आजचा दिवस आहे. आज तुम्ही अमर्याद सहनशीलता दाखविणार आहात. उत्साह वाढलेला राहिल. एखादे काम अपूर्ण राहिलेले असेल तर प्रयत्न वाढवायला हरकत नाही. विशेषत: अधिकारी वर्गाच्या हातात काम अडकलेले असेल तर ते पूर्ण होऊ शकते. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही.

धनु – जोडीदाराचा प्रभाव जाणवेल
आपल्या आयुष्यावर जोडीदाराचा खूप प्रभाव असतो. जोडीदाराकडून मिळणारे पाठबळ हे आपलं आत्मबल उंचावण्यासाठी लाभदायक ठरतं. शिवाय जोडीदाराने केलेल्या तडजोडी आपल्याला शक्ती प्रदान करीत असतात. आज तुम्ही पूर्णपणे जोडीदाराच्या प्रभावाखाली राहाल. जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या इच्छा पूर्ण करण्यावर भर द्याल. आज अपचनाचा त्रासही संभवू शकतो. आहार संतुलित ठेवून आरोग्याकडे आपण आज लक्ष दिले पाहिजे. प्रयत्नांची दिशा बदलावीशी आपल्याला वाटेल. कोणताही निर्णय घेताना आपलं हित कशात आहे, हे जाणून घेण्याचा आधी प्रयत्न करा.

मकर – परिश्रम व धैर्य वाढवा
जीवनामध्ये परिश्रम व धैर्य या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. यांचे पालन केले तरच जीवन सुखदायी होऊ शकतं. याचा अनुभव आज आपल्याला प्राप्त होऊ शकतो. यश तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतील. दुसरीकडे घरात निर्णय घेत असताना सर्वांची मर्जी सांभाळत असतांना तुम्हाला धैर्य दाखवावं लागेल. म्हणून या दोन्ही गोष्टींचे पालन करण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. आज हेच तुमच्या हिताचे राहिल. आज ओळखीच्या व्यक्तींसोबत तुमचे सामंजस्य वाढणार आहे. त्यामुळे आनंदी आनंद असेल.

ADVERTISEMENT

 लेखिका : श्री ज्योतिष संशोधन केंद्र

05 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT