बद्धकोष्ठतेचा त्रास हा अनेकांना असतो. बद्धकोष्ठता असेल तर अशा लोकांना प्रवास करणे नकोसे होते. विशेषत: लांबचा प्रवास. कारण अशा प्रवासात शौचाला जाण्याचे वांदे होऊन जातात. बाहेर फिरण्याची ही मजा तेव्हा कमी होते. ज्यावेळी पोट साफ नसते. प्रवास जितका लांब तितके बाहेरचे खाणे जास्त. सतत बाहेरचे खाणे, पाणी कमी पिणे, दिवसभर फिरणे यामुळे बरेचदा शौचाच्या वेळा चुकतात. यावेळा चुकल्या की, बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु होऊ लागतो. या त्रासाकडे दुर्लक्ष करणेही शक्य नसते. कारण पोटातून कळा येणे, गॅस पास होणे असे त्रास सुरु झाल्यामुळे प्रवास करायचा कंटाळा येऊ लागतो. हे सगळं तुमच्यासोबत आधीच झालेलं असेल आणि या त्रासाच्याच भीतीने तुम्ही प्रवास टाळत असाल तर प्रवास करताना अशा प्रकारे तुम्ही काळजी घ्यायला हवी. म्हणजे तुमचा प्रवास अधिक चांगला होईल.
गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठतेची कारणे आणि सोपे उपाय – Constipation During Pregnancy
भरपूर पाणी प्या
प्रवासात लघवीला सतत जायला लागू नये म्हणून खूप जण पाणीच पिणं टाळतात. पण ही तुमची पहिली चूक आहे. प्रवासात असताना तुम्ही योग्य मात्रेत पाणी प्यायला हवे. ट्रेनमधून प्रवास असेल तर तुम्ही पाणी बिनधास्त पिऊ शकता. पण बस किंवा गाडीचा प्रवास असेल अशावेळी गाडी सतत थांबवता येत नाही. या भीतीने अनेक जणं पाणी पिण्याचे टाळतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत तुम्ही अगदी एक एक घोट थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्यास हरकत नाही. पाण्याचा आधार असेल मल बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होत नाही.
अन्न चावून खा… अन्यथा होतील हे त्रास
फळे खा
प्रवास म्हटला की, थोडे अरबट चरबट खाणे आलेच. ते चालायचेच पण पोटातून मल बाहेर काढायचे असेल तर पोटात फायबरचे प्रमाण योग्य हवे. इतर वेळी तुम्ही गुगल करुन फायबरयुक्त पदार्थ कोणते ते शोधू शकता. पण प्रवासात फायबरचा योग्य पुरवठा करु शकतात ती म्हणजे फळं, तुम्हाला फार डोक्याला ताप घ्यायचा नसेल तर तुम्ही सरळ केळी घेऊन जा. केळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. ते अन्न पचवण्यास मदत करते. शिवाय पोट साफ करण्यास मदत करते. त्यामुळे केळ, सफरचंद,पपई अशी फळं प्रवासात सोबत न्या. त्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास होत नाही
घरचे जेवण न्या
घराबाहेर पडल्यानंतर आणि प्रवास सुरु केल्यानंतर जेवण कसं मिळेल याची खात्री कधीच देता येत नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी चांगलं आणि पौष्टिक जेवण मिळेल असे सांगता येत नाही. जर तुम्ही सकाळी प्रवासाला निघणार असाल तर घरुनच जेवण घेऊन जा. भाजी पोळी किंवा भाकरी हा प्रवासासाठी उत्तम असा आहार आहे. घरच्या जेवणामधील तेल- तिखट याचे प्रमाण आपल्याला माहीत असते. त्यामुळे फारसा त्रास होत नाही. जेवणात कमी तेल आणि मसाले असल्यामुळे पोटाची आग होत नाही. पोट चांगले भरते. त्यामुळेही दुसऱ्या दिवशी पोट साफ होण्यास मदत मिळते.
बद्धकोष्ठता, वजन वाढीमुळे आहात हैराण करा ‘हे’ उपाय
खाण्याच्या वेळा पाळा
खाण्याचा वेळा पाळणे हे प्रवासातही लागू होते.जर तुमचा प्रवास रात्री सुरु होणारा असेल तर तुम्ही जेऊन मगच प्रवास करा. कारण उशीरा खाण्यामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. प्रवासात खाण्याच्या वेळा पाळणे हे थोडे कठीण असते. पण तरीही शक्य असेल तर अशावेळी तुम्ही खाण्याच्या वेळा पाळणे हे नेहमीच चांगले असते. खाताना तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खा. कमी खाणे टाळा. त्यामुळेही तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते.
आता बिनधास्त प्रवास करा अशी काळजी घेतली तर होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास!