घरात माणसं म्हटली की, भांडण आलीच. एकाच कुटुंबातील असले तरी देखील काही काही परिस्थितीत खूप वेळा एकमेकांशी खटके उडतात. घरात खटके उडणे हे फार काही नवं नाही. पण घरात सतत भांडणं होत असतील तर त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा अधिक येऊ लागते. अशा घरात आल्यानंतर कधीही पॉझिटिव्ह वाईब्स येत नाही. तुमच्या घरातली अशी भांडणं सतत होत असतील तर तुम्ही घरात काही गोष्टी करायला हव्यात त्यामुळे तुमच्या घरात आनंद आणणे फार सोपे जाईल. जाणून घेऊया हे सोपे उपाय
नात्यात एकाच विषयावरुन होत असेल वाद.. तर एकदा वाचा
गायत्री मंत्र किंवा अथर्वशीर्ष
घरात सतत भांडण झाल्यामुळे एक नकारात्मक उर्जा निर्माण होते. अशी नकारात्मक उर्जा तुम्हालाही जाणवत असेल. घरातील काही व्यक्तींमुळे तुम्हाला घरात जाण्याची किंवा राहण्याची इच्छा नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर तुम्ही घरी दररोज मन:शांतीसाठी गायत्री मंत्र किंवा अथर्वशीर्ष लावा. त्यामुळे घरात एक शांती येते. कोणत्याही मंत्राचा जाप केल्यानंतर मनात असलेली द्वेष भावना निघून जाण्यास मदत मिळते. जर अशी द्वेष भावना तुमच्या मनात असेल तरी ती कमी होते. दयाभावना मनात निर्माण होण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर तुम्ही गायत्री मंत्र, रामरक्षा, शनिमहात्म्य असे सगळे काही वाचण्याचा सपाटा लागला तर नक्कीच तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. घरात पॉझिटिव्हीटी वाढण्यास मदत मिळेल.
दिवे लावा
घरात दिवे हे फार महत्वाचे असतात. घरात काळोख असेल तर अशा घरात नैराश्य असल्यासारखे वाटते. पण तेच जर घरात मुबलक प्रकाश असेल तर अशावेळी घऱ प्रसन्न आणि छान वाटते. घरात सतत कलह होत असतील तर ते कमी कऱण्यासाठी घरात सतत उजेड ठेवा. असा उजेड घरात सकारात्मक उर्जा घेऊन येण्यास मदत करतो. त्यामुळे घरात जेथे जेथे बंद झालेले दिवे असतील त्या ठिकाणी दिवे बदला. घरातील जुने पडदे काढून टाका. स्वच्छ आणि शुभ्र पडद आणा. त्यामुळे तुम्हालाही घरात आनंद आल्यासारखा वाटेल.
एकत्र जेवणाचा आनंद घ्या
खूप वेळा कामाच्या नादात आणि सध्याच्या या लाईफस्टाईलमुळे खूप जणांना एकत्र जेवणाचा आनंद घेता येत नाही. एकत्र जेवण हे चर्चा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. उत्तम जेवण आणि त्यासोबत होणाऱ्या गप्पा या आनंद देणाऱ्या असतात. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आहार घ्यायला हवा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच एक समाधान यामुळे मिळू शकेल. एकत्र जेवताना संवादात आलेला गॅप भरुन निघण्यास मदत मिळेल.
योग्य वेळी मुलं होऊ देण्याचा निर्णय चांगला, नवं विवाहितांनी नक्की वाचा
सकारात्मक पुस्तके वाचा
सकरात्मक पुस्तके ही आयुष्याला वेगळी दिशा देणारी असतात. जर तुम्ही पुस्तकांचे नियमित वाचन केले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होतो. सकारात्मक विचारांमुळे मनात येणारे नकारात्मक विचार कमी होतात. सकारात्मक विचारांची वृद्धी होते. त्यामुळे घरात सकारात्मक, प्रेरणात्मक पुस्तके आणून ठेवा. खूप वेळा अशा पुस्तकांच्या वाचनामुळे आपण आपला वेळ हा नाहक कोणत्या कामांसाठी वाया घालवतो याची जाणीव होते.जी जाणीव तुम्हाला लोकांच्या जवळ आणते.
आता घरात सतत भांडणं होत असतील तर या गोष्टी नक्की करा