ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to check adulterated maida in Marathi

दिवाळीचा फराळ करण्यापूर्वी कसा ओळखाल भेसळयुक्त मैदा

दिवाळी जवळ आली की सुरू होते दिवाळीची तयारी… घर स्वच्छ करणे, खरेदी करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचा फराळ बववणं. दिवाळीसाठी घरोघरी निरनिराळे पदार्थ बनवले जातात. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा फराळ हमखास बनवला जातो. हा दिवाळीचा फराळ चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळे, अनारसे, करंजीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. विविध घटकांपासून बनवलेले लाडूचे प्रकार, चिवड्याचे प्रकार, चकलीचे प्रकार, शंकरपाळीचे प्रकार आणि करंजीचे प्रकारही यामध्ये असतात. बऱ्याचदा या सर्व पदार्थांमध्ये मुख्य घटक वापरला जातो तो म्हणजे मैदा. दिवाळीत फराळासोबतच पाहुणचारासाठी इतर मैद्याचे पदार्थही बनवले जातात. त्यामुळे दिवाळीआधीच बाजारात मैदा मोठ्या प्रमाणावर विकला जातो. सहाजिकच मैद्यामध्ये भेसळ करण्याचे प्रमाणही जास्त असते. यासाठी जाणून घ्या भेसळयुक्त मैदा कसा ओळखावा.

असा ओळखा मैदा शुद्ध आहे की भेसळयुक्त (how to check adulteration Maida in Marathi)

सणासुदीला मैद्यामधील भेसळ लोकांना ओळखता यावी यासाठी  FSSAI ( भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण) या संस्थेने इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे तुम्हाला मैद्यामध्ये करण्यात आलेली भेसळ लगेच ओळखता येऊ शकते. या व्हिडिओमध्ये बोरीक अॅसिड मिसळेला मैदा आणि गव्हाचे पीठ कसे ओळखावे याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

जाणून घ्या कसा ओळखावा भेसळयुक्त मैदा 

भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण संस्थेच्या या व्हिडिओनुसार या पद्धतीने तुम्ही मैदा घरीच चेक करू शकता.

  • सर्वात आधी एक चमचाभर अथवा एक ग्रॅम मैदा एका भांड्यात घ्या.
  • मैद्यामध्ये पाच मिलीलीटर पाणी टाकून तो मिक्स करा.
  • या मिश्रणात काही थेंब कॉन्ट्रॅक्ट एचसीएलचे टाका.
  • या मिश्रणात एक टर्मरिक पेपर बुडवा.
  • जर मैदा भेसळयुक्त असेल तर टर्मरिक पेपर लाल होईल नाहीतर तो पिवळाच राहिल.

या व्हिडिओ नुसार बोरीक अॅसिड मिसळलेला मैदा आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. कारण बोरीक अॅसिड हे केमिकल असून आरोग्यासाठी योग्य नाही. असा भेसळयुक्त मैदा खाण्यात आल्यास पोटात दुखणे, ताप, मळमळ, उलटी, त्वचेच्या समस्या, त्वचेवर सूज येणे, रक्तदाब वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच सावध राहा, मैद्याची योग्य पारख करा आणि सुरक्षित दिवाळी साजरी करा. दिवाळीसाठी आपल्या सर्व प्रियजनांना द्या दिवाळीच्या शुभेच्छा , धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, लक्ष्मीपूजन शुभेच्छा, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT
27 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT