आपल्याला आपली स्टाईल करताना रंग, कपडा, कम्फर्ट, डिटेलिंग आणि दर्जा या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. पण याशिवाय अजून एक गोष्ट स्टायलिंग करताना महत्त्वाची आहे आणि तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी आणि ती म्हणजे नेकलाईन. तसं तर आपल्याला प्रत्येक ड्रेस, ब्लाऊजची वेगवेगळी नेकलाईन पाहायला मिळते, मात्र तुमच्या चेहऱ्याला ही नेकलाईन योग्य ठरते का? हे पाहणेही गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण महाग कपडे घालतो पण ते चांगले दिसत नाहीत कारण त्याची नेकलाईन योग्य नसते. तुम्हाला कोणत्या स्टाईलची नेकलाईन (Neckline) चांगली दिसेल हे जाणून घेण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा टाईप जाणून घ्यावा लागेल. आम्ही तुम्हाला या लेखातून तुमच्या चेहऱ्याचा टाईप आणि त्यानुसार कोणती नेकलाईन योग्य आहे याबाबत अधिक माहिती देत आहोत. यामुळे तुम्हाला तुमचा ड्रेस वा ब्लाऊज निवडणे अधिक सोपे होईल आणि या टिप्समुळे तुम्हाला कोणती नेकलाईन अधिक चांगला लुक मिळवून देते हेदेखील कळेल.
गोलाकार चेहरा (Round Face)
तुमचा चेहरा गोलाकार असेल तर तुम्हाला ड्रेस निवडताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. गोलाकार चेहऱ्याच्या महिलांना एम्पायर, स्वीटहार्ट आणि व्ही – नेक ब्लाऊज वा ड्रेस अधिक चांगले दिसतात. लांबीबाबत सांगायचे झाले तर वाईड एरिया कव्हर करणारे नेकलाईन या फेसटाईपवर अधिक चांगले उठावदार दिसते. तुमचा चेहरा गोल असेल तर अशा पद्धतीची नेकलाईन अधिक चांगली दिसेल.
टिप्स
- ड्रेस निवडताना चेहऱ्याशिवाय खांदा, छाती आणि मान या गोष्टींचाही विचार करायला हवा
- गोलाकार चेहऱ्यासह स्कूप, ऑफ शोल्डर अथवा बोट नेक कपडे अजिबात चांगले दिसत नाहीत. त्यामुळे सहसा असे नेकलाईन असणारे कपडे घालणे टाळा
- गोल चेहरा असल्याने गळा मोठा दिसतो त्यामुळे डीप नेकलाईन कपडे घालणे योग्य ठरते. यामुळे गळ्याचा आकार उठावदार दिसतो
चौकोनी चेहरा (Square Face)
चौकोनी चेहरा असणाऱ्या व्यक्तींना जॉलाईन असते, त्यामुळे चेहरा लांब दिसतो. अशा पद्धतीच्या चेहऱ्यावर स्कूप, स्वीटहार्ट, व्ही-नेक आणि कॉल्व नेक घालणे अधिक चांगले. तसंच ज्याप्रमाणे गोलाकार चेहऱ्याच्या व्यक्तींना वाईड नेक चांगले दिसत नाही त्याचप्रमाणे चौकोनी चेहरा असणाऱ्यांनाही ही नेकलाईन चांगली दिसत नाही. डीप नेक डिझाईन चौकोनी चेहऱ्याला अधिक आकर्षक दिसते. त्यामुळे या व्यक्तींनी नेहमी डीप नेकलाईनचे ड्रेस वा ब्लाऊज निवडावे.
टिप्स
- लंबाकार चेहरा असल्यामुळे तुम्ही एम्पायर अथवा बोट नेकचे कपडे घालू नका
- डीप नेकलाईन घातल्यामुळे तुमचा चेहरा अधिक लंबाकार दिसणार नाही. त्यामुळे याचा अधिक वापर करा
आयताकृती चेहरा (Oval Face)
ओव्हल फेस अर्थात आयताकृती चेहरा हा परफेक्ट चेहरा मानला जातो. या पद्धतीचा ज्या व्यक्तींचा चेहरा असतो त्या व्यक्ती खूपच क्यूट असतात. जर तुमचा चेहरा ओव्हल फेस असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या नेकलाईनचा वापर करू शकता. पण स्वीटहार्ट आणि स्कूप नेक अधिक आकर्षक दिसतात. तर या चेहऱ्यासाठी डीप नेक कपडे अधिक चांगले दिसत नाहीत.
टिप्स
- तुमचा चेहरा ओव्हल आकारात असेल तर तुम्ही सर्व नेकलाईन्स ट्राय करू शकता. पण नेकलाईनशिवाय अन्य बाबींकडेही तुम्ही स्टाईल करताना लक्ष द्या
- बोट नेक आणि व्ही नेक कपडे तुम्ही टाळूही शकता. बाकी नेकलाईनच्या तुलनेत हे कपडे तुम्हाला अधिक स्टायलिश दिसत नाहीत
ओब्लाँग फेस (Oblong Face)
या पद्धतीचे चेहरे हे स्टायलिंगसाठी परफेक्ट मानले जातात. या फेस टाईपच्या व्यक्ती साधारण चौकोनी चेहऱ्याच्या आकाराप्रमाणेच दिसतात. पण चौकोनी चेहरा असणाऱ्या व्यक्तींचा चेहरा लंबाकार असतो. तर या चेहऱ्यामध्ये स्टायलिंग करताना ऑफ शोल्डर, बोट आणि काल्व नेक अधिक स्टायलिश दिसतात. यामध्ये कोणताही ड्रेस तुम्ही निवडू शकता.
टिप्स
- ओब्लॉंग फेससह नॅरो एरियाचा नेक डिझाईन अधिक चांगला दिसतो, तर डीप नेक डिझाईन अजिबात चांगली दिसत नाही
- तुम्ही लग्नासाठी लेहंगा शिवणार असाल तर त्यावेळी ऑफ शोल्डर ब्लाऊज शिवण्याचा विचार असेल तर नेकलाईन वेगळी असल्यामुळे स्टायलिश दिसून येते
डायमंड शेप (Diamond Shape)
तुमचं कपाळ थोडं मोठे असेल आणि चेहऱ्यावर एक शार्प जॉलाईन असेल तर तुमचा चेहरा हा डायमंड शेपमध्ये मोडतो. या व्यक्तींची हनुवटी ही पातळ असते. अशा व्यक्तींच्या चेहऱ्याला डायमंड फेस अथवा हार्ट फेस म्हटले जाते. या व्यक्तींवर ऑफ शोल्डर, बोट नेक अथवा व्ही नेक डिझाईन सर्वाधिक चांगली दिसते.
टिप्स
- डीप नेकलाईन स्टाईल तुम्ही न केलेली चांगली कारण तुमचा लुक खराब दिसतो
- तसंच तुम्ही कॉलरवाले कपडे अधिक चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकता. कारण ही स्टाईल तुम्हाला अधिक आकर्षक दिसते
आम्ही सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमच्यासाठी परफेक्ट नेकलाईन तुम्ही निवडा. तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे तुम्हाला हे कपडे अधिक चांगले दिसतील.