ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
how-to-get-ready-quickly-easy-hacks

मुलींना व्हायचे आहे पटापट तयार, तर सोपे हॅक्स

कुठेही जायचं असलं अथवा काहीही कार्यक्रम असेल तर मुलींना अथवा महिलांना सर्वात जास्त वेळ लागतो तो तयार होण्यासाठी. कुठेही निघायचं असेल त्याआधी किमान एक तास तरी तयारी करायला लागतोच लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्हालादेखील पटापट तयार होता येऊ शकते. त्यासाठी काही सोपे हॅक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या हॅक्समुळे तुम्ही पटकन तयार होऊ शकताच पण तुमचा अगदी स्वतःवरही विश्वास बसणार नाही की, तुम्ही इतक्या पटकन तयार झालात. नक्की कशा प्रकारे तुम्ही पटापट तयार होऊ शकता पाहूया. कारण अनेकांना हाच गैरसमज आहे की, मुली पटकन तयार होत नाहीत. फॅशन आणि मेकअप यासाठी त्यांना खूपच वेळ लागतो. पण असं अजिबात नाही. या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही त्यांचा हा गैरसमज नक्कीच दूर करू शकता. यामध्ये वेळेची बचत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा ऑफिस आणि कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी घाई होते. त्यामुळे यावेळी वेळ कसा वाचवायचा हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही तयार होण्यासाठी नक्की काय काय करू शकता पाहूया. 

ड्रेस ठेवा तयार

kazo dress

तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि तिथे कोणता ड्रेस अथवा साडी नेसायची आहे हे तुम्ही आधीच तयार ठेवा. आपण जो ड्रेस घालणार आहोत अथवा साडी नेसणार आहोत त्याला व्यवस्थित इस्त्री करून आधीच आपल्या कपाटातून बाहेर काढून ठेवा. जेणेकरून आयत्या वेळी शोधाशोध करण्यात वेळ जाणार नाही. तसंच जो ड्रेस ठरवला आहे त्याला इस्त्री नीट आहे की नाही हे आयत्या वेळी शोधणं त्रासदायकही ठरणार नाही. त्यामुळे जर दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला जायचं असेल तर आदल्या दिवशी रात्रीच तुम्ही ही तयारी करून ठेवल्यास, तुमची सकाळी घाई होणार नाही आणि कपडे शोधण्यात वेळ न घालवल्याने तुम्ही पटकन तयार होऊ शकता. 

पटापट तयार होण्यासाठी जर्सी – कुरता

पटापट तयार होऊन बाहेर जायचं असेल तर तुमच्यासाठी जर्सी, जीन्स, कुरता हा उत्तम पर्याय आहे. कारण हे कपडे घालण्यास अजिबात वेळ लागत नाही आणि तुम्ही पटकन तयार होऊन बाहेर जाऊ शकता. एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी नाही. मात्र तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जायचं आहे अथवा बाहेर कोणत्या कामासाठी जायचं असेल तर तुम्ही वेळ वाचविण्यासाठी हा पर्याय नक्कीच निवडू शकता. हा लुक तुम्हाला अधिक आकर्षक आणि दमदार बनवायचा असेल तर तुम्ही डेनिम जॅकेट अथवा ब्लेझरचे लेअरिंगदेखील यासह करू शकता. 

करा स्कार्फचा उपयोग

कधी कधी घाईत आपण आपल्याला नको असलेले कपडेदेखील घालतो. पण मग अशावेळी तुम्ही चालता चालता स्कार्फचादेखील उपयोग करू शकता. तुम्ही तुमच्या गळ्याभोवती एखादा फॅशनेबल स्कार्फ गुंडाळला की, तुमच्या ड्रेसला एक वेगळाच लुक येतो. तुम्ही कुरता आणि पायजमा घातला असेल तर तुम्ही वेळ वाचविण्यासाठी स्कार्फची फॅशन नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हाला चांगला आणि वेगळा लुक तर मिळतोच. त्याशिवाय तुमचा वेळही वाचतो. 

ADVERTISEMENT

सोपी हेअरस्टाईल

कर्ली आयर्निंगशिवाय बनवा सोप्या पद्धतीने वेव्ही हेअरस्टाईल

बऱ्याचदा सर्वात जास्त वेळ जातो तो कोणती हेअरस्टाईल (Hairstyle) करायची याच्या विचारामध्ये आणि त्यानंतर ती हेअरस्टाईल करण्यातही. मग अशावेळी तुम्ही केस मोकळे सोडा अथवा पटकन केसांचा अंबाडा अथवा बन स्टाईल (Bun Style) अशा सोप्या हेअरस्टाईल्सचा आधार घ्या. यामुळे तुम्ही वेळही वाचवू शकता आणि तुमच्या कपड्यांवर ही हेअरस्टाईल चांगलीदेखील दिसते. तसंच तुम्हाला अधिक वेळ ही हेअरस्टाईल करत बसण्यासाठी वेचावा लागत नाही. 

मेकअप

make up

असं म्हटलं जातं की, महिलांना सर्वात जास्त वेळ हा मेकअप साठी लागतो. मात्र तुम्ही बाहेर जाताना इतर गोष्टीत वाचवलेला वेळ मेकअपमध्ये देऊ शकता. मेकअप करताना मिनिमल मेकअप असेल हाच विचार करा. कारण यासाठी अजिबात वेळ लागत नाही. काजळ, आयलायनर, लिपस्टिक आणि मस्कारा इतकासा तुमचा मेकअप असला तरीही चालतो. अधिक वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही तुमच्यासह तुमचे मेकअप साहित्य घ्या आणि ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जाऊनही मेकअप केल्यास काहीच हरकत नाही. मात्र यामुळे तुम्ही तुमच्या घरातून वेळेवर निघून कार्यक्रमाच्या ठिकाणी नक्कीच पोचू शकता. 

फुटवेअर्स 

कोणते कपडे घातले आहेत यानुसार आपण आपले फुटवेअर्स निवडत असतो. त्यामुळे सहसा चप्पल, स्निकर्स, शूज, लोफर्स हे तुमच्या कपड्यांसह अधिक व्यवस्थित जोडले जातील याची काळजी घ्या. जे कपडे तुम्ही घालणार आहात. त्याच्यासह कोणत्या चप्पल अथवा फुटवेअर्स घालणार आहात याबाबतही तुम्ही रात्रीच काळजी घ्या आणि आधीच तुमच्या कपाटातून बाजूला काढून ठेवा. जेणेकरून जाताना तुम्हाला डोक्यात कोणताच गोंधळ राहणार नाही आणि पटकन फुटवेअर्स घालून तुम्ही घरातून बाहेर पडू शकता. 

अॅक्सेसरीज ठेवा बॅगेत 

कपडे घातल्यानंतर त्यावरील दागिने, घड्याळ, चैन, ब्रेसलेट, कानातले या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. मग त्या शोधून त्यामध्ये वेळ न घालवता तुम्ही आदल्या दिवशीच तुम्हाला कोणते कानातले, गळ्यातले घालायचे असेल तर ते तुमच्या बॅगमध्ये भरून ठेवा. जेणेकरून तुम्ही प्रवास करतानादेखील या अॅक्सेसरीज पटकन घालू शकता. घरात यासाठी वेळ काढायची अजिबात गरज नाही. जाताजाता तुम्हाला हे सर्व घालता येते आणि तुमचा योग्य लुक पूर्ण होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

आमच्या या सोप्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि या ट्रिक्सचा वापर करून तुम्हीही पटापट तयार व्हा आणि इतरांचा गैरसमज करा दूर. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

02 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT