ADVERTISEMENT
home / Diet
आरोग्यास अपायकारक फास्ट फूड व जंक फूडची सवय कशी कमी करावी

आरोग्यास अपायकारक फास्ट फूड व जंक फूडची सवय कशी कमी करावी

काही दशकांपूर्वी, पुढे जाऊन मुलांना ‘फूड ऍडिक्शन’ होईल असे जर कुणाला सांगितले असते तर त्यांचा विश्वास बसला नसता. पण आता तसे राहिले नाही. दुर्दैवाने आता अनेक लहान मुलांना आणि टिनेजर्सना फास्ट फूड ऍडिक्शनने ग्रासले आहे. परंतु बहुतेक लोक अजूनही फूड ऍडिक्शनच्या समस्येच्या वास्तविकतेबद्दल अनभिज्ञ आहेत.  ज्यांना खाण्याशी निगडित समस्या नाहीत ते त्यांच्या अज्ञानामुळे फूड ऍडिक्शनच्या कल्पनेची थट्टा करतात.जंक फूड आणि फास्ट फूडचे व्यसन हे चिंतेचे कारण आहे आणि हे एक असे संकट आहे ज्याचे निराकरण करणे तोवर अशक्य आहे जोवर आपण या समस्येचे अस्तित्वच मान्य करत नाही. आपण हेरॉईन किंवा कोकेन सारख्या बेकायदेशीर मादक पदार्थांच्या व्यसनांबद्दल जागरूक असतो पण फास्ट फूडच्या व्यसनाबद्दल अनेक लोक अनभिज्ञ आहेत. 

फास्ट फूड, जंक फूडच्या व्यसनावर मात कशी करावी?

fast food

अंमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणेच, फास्ट फूडच्या व्यसनावर मात करणे कठीण आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागतात. खूप कमी लोक व्यसनावर मात करू शकतात आणि या प्रकरणांमध्ये तीव्र इच्छाशक्ती व मित्र आणि कुटूंबाचा पाठिंबा व मदत मिळणे खूप महत्त्वाचे आहे.  या व्यसनावर मात करणे हे धूम्रपान सोडणे किंवा दारू सोडण्यापेक्षा खूप कठीण असू शकते आणि हे सामाजिक उपहास आणि समर्थनाच्या अभावामुळे देखील आहे. 

फास्ट फूड ऍडिक्शनवर मात करणे 

काही गोष्टी जंक फूड सोडण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. त्या म्हणजे आपल्याला कोणते पदार्थ ट्रिगर करतात त्यांची यादी करा व हे पदार्थ पूर्णपणे टाळायचा प्रयत्न करा.तसेच मुलांना शक्यतोवर घरचे पौष्टिक जेवण करण्याची सवय लावा. मुलांना खावेसे वाटतील असे पौष्टीक पदार्थ घरीच केले तर मुलांना लहानपणापासूनच ते खाण्याची सवय लावा. घरातील मोठेच जर संतुलित आहार घेत नसतील तर मुलांनाही त्याचे महत्व कळत नाही. म्हणूनच घरातील सर्वांनीच फास्ट फूडचा पर्याय न निवडता जरी बाहेरून खाणे मागवायचे असेल तर त्यातल्या त्यात पौष्टिक पर्याय निवडवावेत.

fast food

आहारात प्रोटिन्स व हेल्दी फॅट्सचा समावेश करा 

सर्वात सामान्य मिथकांपैकी एक म्हणजे फॅट्स तुम्हाला लठ्ठपणा देतात. खरं तर, आपल्या शरीराला फॅट्स आवश्यक आहेत! पण फॅट्सचे बरेच प्रकार आहेत. आपण आहारात ट्रान्स फॅट्स टाळायला हवेत आणि सॅच्युरेटेड फॅट्स मर्यादित ठेवायला हवेत.तसेच विविध बिया, सुकामेवा आणि एवोकॅडो सारखे हृदयासाठी निरोगी फॅटी पदार्थ तुम्हाला पोट भरण्यास आणि खाण्याचे क्रेविंग कमी करण्यास मदत करतील. आहारात प्रथिनांचाही योग्य प्रमाणात समावेश व्हायला हवा. जेव्हा पोट पौष्टिक पदार्थांनी भरलेले असते, तेव्हा जंक फूड खाण्याची इच्छा कमी होते.फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि पाणी देखील असते.यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.अनेक रंगांचे वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहते आणि रोग टाळण्यासही मदत होते. 

ADVERTISEMENT

आहारातून जंक फूड काढून टाकण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा पौष्टिक खाण्याच्या सकारात्मक बाजूंवर लक्ष केंद्रित करणे अधिक प्रभावी ठरते. तुम्ही जितके अधिक पौष्टीक पदार्थ आहारात घ्याल तितके आहारातून अस्वास्थ्यकर पदार्थांना बाहेर काढणे सोपे होईल. योग्य प्रमाणात झोप मिळणे, स्क्रीनवर कमी वेळ घालवणे व तणाव कमी करण्यासाठी व्यायाम, प्राणायाम व एखाद्या छंदाची जोपासना करणे यामुळे तणाव व्यवस्थापन करणे सोपे जाते व या व्यसनापासून लांब राहण्यास मदत होते. 

Photo Credit- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

15 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT