home / भविष्य
astro-remedies

ज्योतिष शास्त्रानुसार काय आहेत घरात सतत भांडणं होण्याची कारणे, घ्या जाणून

नवरा बायकोचे नाते हे अत्यंत सुंदर असते. सुखाचा संसार व्हावा यासाठी प्रत्येक जण झटत असतो. नात्यात कायम नोकझोक चालूच असते. पण बरेचदा लहान सहान गोष्टींवरून सुरू होणाऱ्या गोष्टी कधी मोठ्या भांडणाची कारणं होतात ते काही जोडप्यांमध्ये कळूनही येत नाही. या सततच्या भांडणामुळे नात्यांमध्ये कडवटपणाच येत नाही तर आयुष्यभराचा त्रास आणि मनामध्ये एकमेकांविषयी कटुता भरून राहाते. आपल्या जोडीदारासह आपली भांडणं चालू राहावीत असं कधीच कोणाला वाटणार नाही. घरातील सततची भांडणे अर्थात गृहक्लेष होणे हे कोणालाही आवडणार नाही. ज्योतिष शास्त्रानुसार तुम्हाला या गृहक्लेषाची कारणे आणि उपाय आम्ही या लेखातून देत आहोत. काही वेळा आपल्या कुंडलीमधील ग्रहांची दशा अशी असते की, त्यातील ऊर्जेमुळे जोडीदाराशी भांडणे होत राहतात. पण काही उपायांमुळे नक्कीच तुम्ही यातून बाहेर पडू शकता. 

ज्योतिषशास्त्रानुसार गृहक्लेष म्हणजे नक्की काय?

 • ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात पहिले नवरा आणि बायकोच्या कुंडलीतील लग्न आणि लग्नेश स्थिती काय आहे याचा अभ्यास केला जातो. यानुसारच नवरा आणि बायकोमधील भांडणाची कारणं आणि परिस्थिती जाणून घेण्यास उपयोग होतो 
 • सुखाचा स्वामी हा चंद्र असतो. जर तुमच्या पत्रिकेत चंद्र कमजोर असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या भावनेवर होत असतो. व्यक्तीचे मन स्थिर नसेल तर समोरच्याला न समजून घेतल्यामुळे भांडण हे होणारच आहे
 • चंद्रानंतर कुंडलीमध्ये बुधाचे स्थान पाहिले जाते. कारण बुध हा आपल्या बुद्धी आणि विवेकबुद्धीचा कारक आहे. जर बुध कमजोर असेल तर जी परिस्थिती आपल्यासमोर येत असेल त्याला सामोरे जाण्यासाठी आपण योग्य नसतो. त्यावेळीदेखील गृहक्लेष होण्याचा संभव असतो. 
 • मंगळदोष असणारी व्यक्ती ही फटकळ असते आणि कोणताही विचार न करता बोलणारी असते. तुमच्या पत्रिकेत असा मंगळदोष असेल तर तुमचे नेहमीच तुमच्या जोडीदारासह भांडण होऊन गृहक्लेष होऊ शकतो

वास्तुशास्त्रानुसार गृहक्लेष दूर करण्याचे उपाय 

 • घरातील ईशान्य दिशा ही सर्वात शुभ मानली जाते. ईशान्य कोनाड्यात नेहमी देवघर बांधलेले असावे. पण याठिकाणी जर तुमच्या घरात टॉयलेट असेल अथवा कचरा जमा होत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि हेच गृहक्लेषाचे कारण बनते 
 • बरेच जण आपल्या घरातील छत हे स्वच्छ ठेवत नाहीत आणि त्याशिवाय माळ्यावर सामान जमवून ठेवतात. छतावरील अथवा माळ्यावरी हे सामान तुमचे डोके जड करते आणि घरात सतत रागाची धुसफूस चालू राहाते 
 • याशिवाय घराचे इंटिरिअर डेकोरेशन करताना काही जण ही गोष्ट लक्षात घेत नाहीत की, काळ्या रंगाचा सहसा घरात उपयोग करू नये. काळा रंग हा सकारात्मकता आणि संवेदना शोषून घेतो. त्यामुळे घरात भांडणे होतात 
 • तुमच्या घरामध्ये 2 आरसे एकमेकांसमोर असतील तर तुम्ही एक आरसा काढून टाकावा अथवा एक आरसा पडद्याने झाकून ठेवावा
 • याशिवाय यासह तुम्ही घरातील उत्तर-पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवायला हवी 

गृहक्लेषाचे वैदिक उपाय 

 • तुम्ही नियमित स्वरूपात आपल्या घरात गंगाजलाचा वापर करावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राखण्यास मदत करते
 • घराच्या पूर्व दिशेला नेहमी तुम्ही दिवा लावावा. यामुळे घरात शांततामय वातावरण टिकून राहण्यास मदत मिळते 
 • घरात नेहमी कापूर तुपामध्ये भिजवून ठेवावा. कापूरच्या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नषअट होते 
 • घरात पायपुसण्याने स्वच्छता करत असताना पाण्यात तुम्ही मीठ घालावे. मिठामुळेही घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मात्र गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तुम्ही हा उपाय करू नये 

ज्योतिषशास्त्रानुसार ही काही कारणे आणि उपाय आहे. तुमच्याही घरात तुमच्या जोडीदारासह तुमचे भांडण सतत होत असेल तर तुम्ही या टिप्स नक्की वाचा. 

आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ज्योतिषशास्त्र हा एक अभ्यास आहे आणि त्या अभ्यास शास्त्रानुसार देण्यात आलेल्या काही टिप्स आम्ही तुम्हाला इथे दिल्या आहेत याची तुम्ही नोंद घ्यावी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text