किचन ही घरातील सगळ्यात महत्वाची खोली आहे. किचन जितके नीटनेटके असेल तितके ते अधिक चांगले दिसते. पण किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट होणे अगदी स्वाभाविक आहे. कारण खाद्यपदार्थ आणि ओलावा ज्या ठिकाणी असेल तिथे झुरळ होणे आणि वाढणे हे आलेच. ओट्यावर सतत फिरणारे झुरळ घरामधील अस्वच्छता दर्शवतात. रात्री अचानक उठल्यावर ओट्यावर झुरळ फिरत असतील तर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या झुरळांपासून सुटका मिळवू शकता. या काही सोप्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करा
प्लास्टिक जमवू नका
खूप जणांना घरात प्लास्टिकच्या पिशव्या, डबे जमवण्याची सवय असते. जर तुम्ही किचनमध्ये असा पसारा जमवून ठेवला असेल तर तो काढून टाका. कारण प्लास्टिकमध्ये झुरळांना राहण्यासाठी जागा मिळते. तेथेच झुरळांची जास्त उत्पत्ती होते. त्यामुळे शक्य असेल तर घरात सतत प्लास्टिकच्या पिशव्या आणि हॉटेलातून आणलेले डबे जमा करुन ठेवू नका. जर तुम्हाला असे डबे ठेवायचे असतील तर तुम्ही ते व्यवस्थित कोरडे करुन ठेवून द्या. काही दिवसांनी हे डबे काढून बघा. जर तुम्हाला काही संशयास्पद दिसत असेल तर तुम्ही डबे काढून टाका.
सिंकखाली स्वच्छता ठेवा
सिंकखाली सतत पाणी पडत असते. हे पाणी तसेच राहिले तर त्या ठिकाणी कोंदटपणा तयार होतो. अशा कोंदटपणामुळेही झुरळ तयार होण्याची शक्यता असते. सिंकखाली पाणीच असेल तर ते स्वच्छ करता येते. पण जर सिंकखाली तुम्ही सामान ठेवत असाल आणि त्या ठिकाणी कोंदटपणा तयार झाला असेल तर झुरळ वाढू शकतात. शक्य असेल तर सिंकखालची जागा स्वच्छ ठेवा. सिंक खाली जागा जितकी मोकळी असेल तितकी जास्त चांगली.
पूजाविधीत वापरला जाणारा ‘कापूर’ आरोग्यासाठी आहे असा फायदेशीर
पदार्थ उघडे ठेवू नका
हल्ली किचनमध्ये सगळीकडे ट्रॉली बनवल्या जातात. खूप वेळा काही पदार्थ खाऊन झाल्यानंतर ते उघडे ठेवले जातात. उघडे पदार्थ आणि अस्वच्छता यामुळेही झुरळांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो किचनमध्ये कोणतेही पदार्थ उघडे ठेवू नका. किचनमध्ये पदार्थ उघडे ठेवले तरी देखील हा झुरळांचा त्रास होऊ शकतो. अनेकदा स्नॅक्स आणि इतर काही गोष्टी उघडल्या राहिल्या की झुरळांना आयता आहार मिळतो. जर तुम्हाला झुरळांचा असा सुळसुळाट होऊ नये असे वाटत असेल तर पदार्थ एअरटाईट डब्यात नेहमी बंद करु ठेवा.
अस्वच्छ किचन सिंक स्वच्छ करायचे आहे.. मग सोप्या टीप्स येतील कामी
सतत स्वच्छता ठेवा
किचन म्हटले की, त्यामध्ये सतत काम करणे आलेच. सतत अन्न आणि उष्ट ओट्यावर साचत राहते. जर ते योग्यवेळी काढले नाही तरी देखील झुरळांचा त्रास होतो. किचनचा ओटा कायम स्वच्छ ठेवा. किचन केबिनेट्स, ट्रॉली कयम स्वच्छ करत राहा. कोणतीही उष्टी भांडी आत ठेवू नका. असे केल्यासही झुरळ वाढत राहतात. त्यामुळे किचनची स्वच्छता ठेवणे हे देखील फार महत्वाचे आहे.
आता किचनमधील झुरळांचा सुळसुळाट थांबवायचा असेल तर या काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.