ADVERTISEMENT
home / मेकअप
गुढीपाडव्यासाठी असा करा परफेक्ट महाराष्ट्रीयन लुक

गुढीपाडव्यासाठी असा करा परफेक्ट महाराष्ट्रीयन लुक

गुढीपाडवा म्हणे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्याने महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे आनंदाची  बरसात, नाविण्याची  सुरूवात, जीवाभावाच्या लोकांचं एकत्र येणं आणि मराठमोळ्या वेषभूषेत नववर्षाचं स्वागत करणं… मात्र मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनामुळे स्वागतयात्रा आणि एकत्र येण्यावर निर्बंध असणार आहे. असं असलं तरी आपण दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी  नववर्षाचं स्वागत मनापासून आणि आनंदाने करायलाच हवं. त्यामुळे घरच्या घरी ऑनलाईन सेलिब्रेशन करण्यास काहीच हरकत नाही. यंदा घरच्या घरी मराठमोळा लुक करून तुम्ही नववर्षाचं स्वागत करू शकता. म्हणून गुडीपाडव्यासाठी असा करा खास महाराष्ट्रीयन लुक आणि जाणून घ्या गुढीपाडवा सणाची माहिती आणि महत्त्व (Gudi Padwa Information In Marathi)

नऊवारी साडी आहे मस्ट –

साडी हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय… मग यंदा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पारंपरिक नऊवारी साडी नेसायला कोणाला नाही आवडणार. तेव्हा या महाराष्ट्रीयन लुकची सुरूवात आपण नऊवारी साडीने करू या. आजकाल नऊवारी साडीचे विविध प्रकार बाजारात शिवून मिळतात. त्यामुळे जरी तुम्हाला नऊवारी साडी कशी नेसायची हे माहीत नसलं तरी रेडिमेड नऊवारी नेसून तुम्ही या लुकला सुरूवात करू शकता. मात्र लक्षात ठेवा नऊवारी साडीचा रंग पारंपरिक आणि उठावदार असावा. ज्यामुळे तुमचा लुकही सुंदर आणि साजरा दिसेल. शिवाय साडीचा काठ आणि कॉम्बिनेशन परफेक्ट असेल तर तुमचं फोटोशेन सर्वात हटके होईल. खण, पैठणी, इकरल, जिजामाता, राजमाता या प्रकारच्या नऊवारी साडी खूपच खुलून दिसतात. यासाठी जाणून घ्या नऊवारी साडी प्रकार आणि खास डिझाईन्स. पण जर तुमच्याकडे नऊवारी साडी नसेल तर पारंपरिक सहावारीनेही तुम्ही या लुकला सुरुवात करू शकता. 

मेकअप करा साजेसा –

नऊवारी साडी नेसल्यावर सर्वात आधी मेकअपच्या तयारीला लागा. महाराष्ट्रीयन लुकसाठी तुम्हाला फार हेव्ही मेकअप करण्याची गरज नाही. कारण या लुकवर नॅचरल आणि साधा मेकअपच छान वाटतो. यावर तुम्ही तुमच्या साडीच्या रंगसंगतीनुसार ब्लशर आणि  लिपस्टिक निवडू शकता. काजळ, आयलायनर, आयशॅडो करा आणि पटकन तयार व्हा. मात्र लक्षात ठेवा कपाळावर टिकली मात्र चंद्रकोरीची असावी. कारण या टिकलीमुळे तुम्ही परफेक्ट मराठी मुलगी दिसाल.

ADVERTISEMENT

मराठी उखाणे नवरीसाठी

पारंपरिक साज हवाच –

नऊवारी साडीवर अनेक प्रकारचे पांरपरिक दागिने खुलून दिसतात. या लुकमध्ये मात्र महाराष्ट्रीन नथ घालणं मात्र बंधनकारक आहे. कारण त्याशिवाय तुमचा महाराष्ट्रीयन लुक पूर्ण होणार नाही. आजकाल विविध शेपच्या महाराष्ट्रीयन नथ मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा नथीची नखरा करू शकता. शिवाय यासोबत कोल्हापुरी साज, ठुशी, पोहेहार, लक्ष्मीहार, तोडे, पाटल्या, पिचौडी, बाजूबंद, वाक्या, पैजण, जोडवी, कंबरपट्टा, झुमके किंवा कुडी असे तुम्हाला आवडतील ते दागिने निवडा. 

करा अंबाडा अथवा खोपा हेअरस्टाईल –

महाराष्ट्रीयन लुकसाठी तुमची हेअर स्टाईल खूप महत्वाची आहे. या लुकवर सूट होतील अशा अनेक अंबाडा हेअरस्टाईल तुम्ही यासाठी करू शकता. शक्य असेल तर पारंपरिक खोपा हेअरस्टाईल या लुकसोबत नक्कीच ट्राय करा. मात्र जर जमत नसेल तर साधा अंबाडाही या लुकवर साजेसा वाटतोच. अंबाड्यावर गोल्डन हेअर एक्सेसरीज घाला किंवा सरळा मोगरा, अबोली अथवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही सुवासिक फुलाच्या गजऱ्याने अंबाडा सजवा.

ADVERTISEMENT

कोल्हापुरी चप्पलने पूर्ण करा महाराष्ट्रीन लुक –

महाराष्ट्रीयन लुकला पूर्ण करण्यासाठी पायात कोल्हापुरी चप्पल असायलाच हवी. कारण नऊवारी साडीवर कोल्हापुरी चप्पल खऱ्या अर्थाने खुलून दिसते. मिक्स मॅच करण्यासाठी तुम्ही यासोबत कोणतेही फूटवेअर ट्राय करू शकता. मात्र हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल. कोल्हापुरी चप्पलेप्रमाणेच मोजडी आणि फूटवेअरचे विविध प्रकारही तुम्ही यासोबत कॅरी करू शकता. 

अशा पद्धतीने अगदी सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही गुढीपाडव्यासाठी तुमचा परफेक्ट महाराष्ट्रीयन लुक करू शकता. तुम्हाला आमच्या या  टिप्स कशा वाटल्या आणि तुम्ही तुमचा गुढीपाडवा कसा साजरा केला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये अवश्य सांगा. सर्वांना मराठी नववर्षांच्या खूप मनापासून शुभेच्छा

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

You Might Also Like

Gudi Padwa Wishes in English

08 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT