ADVERTISEMENT
home / सौंदर्य
कोरड्या केसांची काळजी घेणं आता अजून सोपं (Hair Mask For Dry Hair In Marathi)

कोरड्या केसांची काळजी घेणं आता अजून सोपं (Hair Mask For Dry Hair In Marathi)

तुम्हाला जर लांबसडक, घनदाट आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही तुमच्या केसांवर बरेच प्रयोग करत असता ना? पण तुमचे केस जर कोरडे असतील तर तुम्हाला या केसांची निगा राखणं खूपच कठीण होत असेल ना? या कोरड्या केसांमुळे तुमची चिंताही वाढत जाते. अशावेळी आपण पार्लरपासून ते अगदी डॉक्टरपर्यंत सगळे उपचार करून पाहतो. या उपचारांनी केस तर चमकदार होत असतात. पण आपला खिसा मात्र रिकामा होतो हेदेखील तितकंच खरं आहे. खरं तर तुम्ही पार्लर किंंवा डॉक्टरांकडे सतत जाण्यापेक्षा घरच्याघरी थोडी मेहनत केलीत तर या कोरड्या केसांसाठी चांगले हेअर मास्क बनवून आणि केसांना मसाज करून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. त्यामुळे आता ही चिंता सोडा आणि आतापासूनच आम्ही तुम्हाला जे सांगत आहोत ते घरगुती मास्क लावून पाहा. पण त्याआधी पाहूया की केस कोरडे होण्याची नक्की काय कारणं आहेत –

केस कोरडे होण्याची कारणं

कोरड्या केसांसाठी हेअर मास्क

केसांची काळजी कशी घ्यावी

ADVERTISEMENT

हेअर मास्क प्रॉडक्ट्स

FAQs

केस कोरडे होण्याची कारणं (Causes Of Dry Hair)

केस कोरडे होण्याची अनेक कारणं आहेत. आपले केस कोरडे होतात हे आपल्याला दिसतं. पण त्याचे मूळ कारण काय आहे ते मात्र आपण तपासून पाहात नाही. अशीच काही कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8 %E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87 %E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%82 - Hair Mask For Dry Hair In Marathi

ADVERTISEMENT

केसतोडवर घरगुती उपाय

वातावरणातील बदल (Change In Weather)

उन्हाळा मग पावसाळा आणि मग हिवाळा असे बदलणारे वातावरण नेहमीच आपल्या केसांवर फरक पाडत असतात. या वातावरणातील बदलामुळे केस अतिशय कोरडे तर होतातच शिवाय केस खराब होण्याचं हे महत्त्वाचं कारणही आहे. यापासून बचावासाठी आपण बऱ्याचदा केसांचा बुचडा बांधून ठेवतो. पण त्यामुळे केसांना मुळापासून त्रास होतो आणि मग केसगळतीला सुरुवात होते हे आपल्या लक्षात येत नाही. केसांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स.

तणाव (Tension)

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला कळतच नाही की, तणाव आपल्या मनाची जागा कधी घेतं. तणावाचा सर्वात पहिला आणि मोठा परिणाम हा आपल्या केसांवरच होत असतो. कमी वेळ आणि सततच तणाव यामुळे केस अतिशय कोरडे होतात आणि केसांमधील पूर्ण चमक निघून जाऊन ते अतिशय खराब दिसू लागतात.  

प्रदूषण (Pollution)

शहरामध्ये धूळ – माती आणि गाड्यांचे धूर हे सतत चालू असतं आणि आपण सतत घराबाहेर कामानिमित्त असतो तर त्याचा सर्व परिणाम हा केसांवर होत असतो. कारण सर्वात पहिल्यांदा हे सर्व केसांमध्ये जाऊन चिकटून राहातं. घामामुळे चिकट झालेल्या केसांमध्ये याचा परिणाम जास्त होत असतो.

ADVERTISEMENT

वाचा – केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंडे का फंडा’

अधिक शँपूचा वापर (Over Use Of Shampoo)

केसांना रोज शँपू लावणं अतिशय चुकीचं आहे. त्यामुळेदेखील तुमचे केस कोरडे होतात. तसंच रोज शँपू लावल्यास, तुमचे केस गळू लागतात. आठवड्यातून केवळ तीन वेळा शँपू लावणं योग्य आहे.

कोरड्या केसांसाठी 15 घरगुती हेअर मास्क (Homemade Hair Mask for Dry Hair In Marathi)

कोरड्या केसांमध्ये चमक आणण्यासाठी तुम्ही घरच्याघरी बरेच वेगवेगळे मास्क बनवू शकता. हे सर्व हेअर मास्क बनवणं खूपच सोपं आहे. तसंच तुमच्या खिशालादेखील परवडण्यासारखे आहेत.

Hair Mask for Dry Hair In Marathi

ADVERTISEMENT

केळ्यांचा हेअर मास्क (Banana Hair Mask)

केळ्यामध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी बरेच नैसर्गिक गुण असतात. केवळ शरीरासाठी नाही तर त्वचा आणि केसांसाठीही केळं खूपच फायदेशीर असतं. यामध्ये फायबर, विटामिन ए, बी, सी, ई आणि आयर्न, पोटॅशियम, मँगनीज आणि झिंकसारखे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. केळ्याचा हा मास्क कोरड्या केसांना हेल्दी आणि आकर्षक बनवतो. हा मास्क बनवण्यासाठी पहिले दोन केळी व्यवस्थित मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या आणि त्यात 2 मोठे चमचे दही, ऑलिव्ह ऑईल आणि मध घालून मिक्स करा. हा मास्क तुमच्या मुळापासून केसांवर व्यवस्थित लावा आणि मग डोक्यावर शॉवर कॅप लावून कव्हर करा. अर्धा अथवा एक तासाने तुम्ही शँपू करा. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही केवळ केळं आणि दह्याचादेखील मास्क लावू शकता.

कोरड्या केसांसाठी अंडी हेअर मास्क (Egg Hair Pack For Dry Hair)

अंडं लावल्यामुळे केसांमध्ये चमक येते हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र प्रश्न हा आहे की, हे केसांना नक्की कसं लावायचं? तर आम्ही तुम्हाला यावर उपाय सांगतो. एका भांड्यात अंड्याचा बलक त्यात एक चमचा एरंडाचं तेल, एक चमचा मध मिसळून हा हेअर मास्क तयार करून केसांना लावा. आता केस अगदी मुळापासून कव्हर करून घ्या. एक प्लास्टिक कॅप तुमच्या डोक्यावर ठेवा आणि त्यावर टॉवेल लावा. आता अर्धा तास झा्ल्यावर केस धुवा आणि मग अॅप्पल सायडर व्हिनेगर लावून केस धुवा. चांगल्या परिणामासाठी हा मास्क आठवड्यातून दोनवेळा अथवा तीन वेळा करा. तुमचे केस नक्कीच चमकदार होतात.

अॅवॅकॅडो हेअर मास्क (Avocado Hair Mask)

अवोकॅडोच्या आतील भाग मॅश करून त्यामध्ये मेयोनीज घाला. हा हेअर मास्क कोरड्या केसांसाठी खूपच चांगला पर्याय आहे. हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना साधारण 30 मिनिट लावा. त्यानंतर केस धुऊन टाका.

काळ्या चण्याचा हेअर मास्क (Kala Chana Hair Mask)

तीन मोठे चमचे काळे चणे रात्री भिजवून ठेऊन द्या आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा. त्यामध्ये एक अंडं, एक चमचा लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा दही घालून केसांना लावा. अर्धा तास झाल्यावर थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या कोरड्या केसांमध्ये चमक येईल.

ADVERTISEMENT

जास्वंदीच्या फुलाचा हेअर मास्क (Hibiscus Hair Mask)

जास्वंदीचं फुल म्हणजे गुणांची खाण. जास्वंदीचं फुल शरीरातील बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर असतं. त्याचप्रमाणे केसगळती थांबविण्यासाठीही जास्वंदीचे फुल फायदेशीर ठरते. एक कप लाल जास्वंदीच्या पाकळ्या घ्या आणि रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करा. त्यात ऑलिव्ह ऑईल घाला. हा हेअर मास्क केसांवर लावा आणि एक तासानंतर केस धुवा. यामुळे तुम्हाला अतिशय चमकदार केस मिळतील.

कोरड्या केसांसाठी नारळ तेल (Coconut Oil For Dry Hair)

केसांसाठी नारळाचं तेल एक वरदानच असतं. याचं तेल घेऊन केलेला हेअर मास्क हा सर्वात फायदेशीर असतो. यासाठी तुम्ही एक चमचा नारळाचं तेल घेऊन भांड्यात गरम करून घ्या. थोडं थंड झाल्यावर तुम्ही मुळांपासून केसांना हे तेल लावा आणि मालिश करा. आपल्या केसांना त्यानंतर गरम टॉवेलने लपेटून घ्या आणि १ तासानंतर टॉवेल सोडा. त्यानंतर सॉफ्ट शँपूने केसा धुवा आणि मग सुकवा. हा मास्क तुम्ही नेहमी वापरलात तर तुमच्या कोरड्या केसांची गेलेली चमक परत येईल आणि तुमचे केस घनदाट होण्यास मदत होईल.

कोरड्या केसांसाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil For Dry Hair)

ऑलिव्ह ऑईल हे कोरड्या आणि खराब केसांसाठी चांगला उपचार आहे. आपले केस नीट धुवून घ्या आणि टॉवेलने सुकवा. थोडं ऑलिव्ह ऑईल गरम करा आणि केसांच्या मुळापासून लावा. अर्धा तास तसंच ठेवा आणि मग परत शँपूने धुवा. नियमित वापरात असणारा कंडिशनरच लावा.

मध आणि ऑलिव्ह ऑईलचा हेअर मास्क (Honey and Olive Oil Hair Mask)

ऑलिव्ह ऑईलमध्ये मध घालूनदेखील तुम्ही तुमच्या केसांची गेलेली चमक परत आणून कोरडेपणा घालवू शकता. त्यासाठी तुम्ही मध आणि ऑलिव्ह ऑईल समप्रमाणात एका भांडयात मिसळून घ्या. हे केसांना लावून अर्धा तास तुमचं डोकं कव्हर करा. त्यानंतर केसांना शँपू आणि कंडिशनर लावून धुवा. महिन्यातून कमीत कमी एकदा असं नक्की करा आणि तुम्ही आठवड्यातून एकदा असं करू शकत असाल तर त्याचा परिणाम अधिक चांगला होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

%E0%A4%AE%E0%A4%A7 %E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF %E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9 %E0%A4%91%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0 %E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95 - Hair Mask For Dry Hair In Marathi

नारळाचं दूध आणि बेसनाचं हेअर मास्क (Coconut Milk and Basil Hair Mask)

नारळाचं दूध आणि बेसनाचं हेअर मास्क केसांना मुलायम आणि मजबूत बनण्यासाठी मदत करतो. याचा वापर करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा मेथी, चार चमचे दही, अर्धा कप नारळाचं दूध आणि एक चमचा बेसन घालून हेअर मास्क बनवा आणि केसांना मुळापासून अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर धुवा. हा मास्क तुमचे कोरडे केस अधिक सुंदर आणि मजबूत बनवतो.

अंडे आणि नारळाचं तेल हेअर मास्क (Egg and Coconut Oil Hair Mask)

अंडे आणि नारळाचं तेल घालून बनवलेला हेअर मास्क फायदेशीर असतो. एका भांड्यात अंड्याचा बलक आणि नारळाचं तेल घेऊन हेअर मास्क बनवा आणि केसांवर लावा. 30 मिनिटांनंतर केसांना शँपू लावा आणि धुवा. तुम्हाला अतिशय मऊ आणि सुंदर केस मिळतील.

मध आणि दह्याचा हेअर मास्क (Honey and Yogurt Hair Mask)

केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी मध आणि दह्याचा हेअर मास्क खूपच फायदेखील ठरतो. याचा वापर करण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे दही आणि एक चमचा मध घ्या. एकत्र करून केसांना 10 मिनिट्स लावून ठेवा आणि मग धुवा. यामुळे केसांचा कोरडेपणा निघून जातो.

ADVERTISEMENT

बेकींग सोडा (Baking Soda)

केसांवरही बेकिंग सोड्याचा चांगला परिणाम होतो. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा कोमट पाण्यात घालून थोड्या वेळासाठी तसंच ठेवा. दहा मिनिट्स झाल्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने केस धुवा. नियमित हा मास्क वापरल्यास, तुमचे केस पूर्णतः निरोगी आणि सुंदर होतील.

कोरफडाचे जेल आणि दह्याचा हेअर मास्क (Aloe Vera Gel and Yogurt Hair Mask)

ताजी कोरफड जेल आणि दही हे समप्रमाणात घ्या. एकत्र मिसळा. हे मिश्रण आपल्या केसांना लावा. 30 अथवा 40 मिनिट्स झाल्यानंतर साध्या अथवा थंड पाण्याने धुवा. ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की करा. त्यामुळे कोरड्या केसांच्या समस्येपासून तुमची सुटका होईल.

मीठ (Sea Salt)

समुद्री मीठामध्ये केसांची त्वचा साफ करणारे नैसर्गिक तत्व असतात. तुमचे केस जर लवकर कोरडे होत असतील अथवा केसांवर लवकरच धूळ आणि मातीचा परिणाम होत असेल तर तुमच्या केसांची अशी डेड स्किन घालवण्यासाठी समुद्री मीठाचा वापर करा. हे तुमच्या केसांमधील कोरडेपणा काढून त्यामध्ये नवी चमक आणतं. तुमच्या केसांना छोटे – छोटे फाटे फोडा आणि मग हे मीठ लावून मालिश करा. पाच मिनिटांनंतर तुम्ही केस धुवून टाका. असं केल्यामुळे तुमच्या डोक्यावरील डेड स्किन बाहेर येईल आणि तुमचे केस सुंदर होतील.

वाचा – केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

ADVERTISEMENT

काकडी आणि लिंबाच्या रसाचा हेअर मास्क (Cucumber and Lemon Juice Hair Mask)

बऱ्याचदा केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे केस कोरडे होतात. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तुमच्या केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोंड्यापासून लगेच सुटका करून घ्यायला हवी. कोंड्यामुळे केस केवळ कोरडेच होत नाहीत तर केसगळतीदेखील चालू होते. त्यासाठी तुम्ही काकडीच्या रसामध्ये लिंबाचा रस घालून मास्क तयार करा आणि केसांना लावून थोडा वेळ असंच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केसा धुवा. काकडीमधील पोषक तत्वामुळे केसांना ताजेपणा मिळतो आणि लिंबातील पोषक तत्वामुळे कोंडा आणि केसातील घाण काढून टाकण्यास मदत होते. हा मास्क तुम्ही नेहमी वापरल्यास, कोंड्यापासूनदेखील सुटका मिळू शकते आणि केस चमकदार होतात.

केसांची काळजी कशी घ्यावी (Hair Care Tips In Marathi)

%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80 %E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80 %E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80 - Hair Care Tips In Marathi

1. दर 5 ते 6 आठवड्यांनी केस ट्रीम करून घ्यायला हवेत. असं केल्यामुळे केसांना खालून फाटे फुटले असतील आणि कोरडे झाले असतील तर ट्रीम होतात आणि चांगली वाढ होते. वेळेवर केस ट्रीम करत राहिल्यास, केस घनदाटदेखील होतात.

2. आठवड्यातून केवळ 2 ते 3 वेळाच शँपूने केस धुवा आणि शँपू करण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलने केसांना मालिश करं विसरू नका. असं केल्यामुळे तुमच्या केसांना फाटे फुटत नाहीत आणि कोरडेदेखील होत नाहीत.

ADVERTISEMENT

3. केस कधी गरम पाण्याने धुऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या मुळांपासून केस कोरडे होतात. जर केस मुळांपासून कोरडे झाले तर कोंडा आणि खाजेची समस्या सतत येत राहते.

4. तुम्हाला तुमच्या केसांची स्टाईल करणं नक्कीच आवडत असेल याची आम्हाला खात्री आहे. कधी कर्ल तर कधी स्ट्रेटनिंग तर कधी आणखीन वेगळी स्टाईल. पण सतत असं करत राहिल्यास, तुमच्या केसांना अधिक कोरडं बनवतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा.

5. केस धुतल्यानंतर ते टॉवेलने रगडू नका. असं केल्यामुळे तुमचे केस तुटतात. त्याऐवजी तुम्ही कॉटनच्या एखाद्या कपड्याने हलके केस सुकवा. त्यामुळे केसांचा मऊपणा राहतो.

वाचा – घनदाट केस हवे असतील तर वापरा हे हेअर ऑईल्स

ADVERTISEMENT

हेअर मास्क प्रॉडक्ट्स (Hair Mask Products)

तुम्हाला घरच्या घरी हेअर मास्क तयार करून वापरायचा नसल्यास, बाजारात मिळणार हेअर मास्कदेखील तुम्ही वापरू शकता. आम्ही तुम्हाला काही हेअर मास्क सांगतो त्याचा तुम्ही वापर करून पाहा –

बायोटिक बायो मस्क रूट (Biotique Bio Musk Root)

how-to-take-care-of-dry-hair-in-marathi

लॉरिअल पॅरिस टोटल रिपेअर 5 मास्क्यू (L’Oreal Paris Total Repair 5 Masque)

how-to-take-care-of-dry-hair-in-marathi

वाचा – महिलांना टक्कल पडण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

ADVERTISEMENT

ओरिफ्लेम मिल्क अँड हनी गोल्ड हेअर मास्क (Oriflame Milk And Honey Gold Hair Mask)

oriflame-mask-for-dry-hair-in-marathi

रिचफील ब्राह्मी हेअर पॅक (Richfeel Brahmi Hair Pack)

richfeal-mask-for-dry-hair-in-marathi

कोरड्या केसांबाबत प्रश्न – उत्तर (FAQs)

1. कोरड्या केसांच्या मागे नक्की कारण काय असतं?

सध्या धावपळीच्या जीवनात सतत ताण, तसंच बाहेर फिरताना केसांवर परिणाम करणारं प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी हे कोरड्या केसांच्या मागील खरं कारण आहे.

2. केसांना फाटे फुटण्याचं खरं कारण कोरडे केस आहेत का?

कोणत्याही गोष्टीचा पहिला परिणाम हा केसांवर होत असतो. केसांना फाटे फुटण्याची समस्या ही खूपच कॉमन समस्या आहे. कोरडे केस झाल्यामुळेच केसांना फाटे फुटतात हे खरं आहे.

3. कोरड्या केसांवर लिंबाचा रस काम करू शकतो का?

लिंबाच्या रसामध्ये केसांना पोषक तत्व असतात. त्यामुळे कोरडे असोत वा खराब असोत. त्यावर दही, अंड आणि लिंबाच्या रसाचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या केसांचा कोरडेपणा कमी होऊन केस चमकदार होण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

इमेज सोर्सः Shutter Stock, Instagram

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

अंड्याचा हेअर मास्क

Hair Care Tips & Food For Hair Growth In Marathi

ADVERTISEMENT

How To Get Rid Of White Hair & Side Effects Of Hair Dye In Marathi

Diet For Hair Growth & Home Remedies In Marathi

14 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT