हिवाळ्यात त्वचेप्रमाणे केसही कोरडे आणि निस्तेज होतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण केसांना नियमित मॉईस्चाराईजर लावतो. अगदी त्याचप्रमाणे केस मऊ आणि चमकदार राहण्यासाठी केसांनाही मॉईस्चाराईजची गरज असते. वास्तविक केस हा आपल्या सौंदर्यामध्ये सर्वात आधी दिसणारा भाग आहे. त्यामुळे त्वचेप्रमाणेच हिवाळ्यात आपण केसांची योग्य काळजी घ्यायला हवी. यासाठी जाणून घ्या केस मॉईस्चाराईज करण्यासाठी नेमकं काय करायला हवं.
केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)
केसांमधील मॉईस्चाराईज पातळी राखण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी
केस मऊ राहण्यासाठी केसांमध्ये योग्य प्रमाणात मॉईस्चाराईजेशन म्हणजेच ओलावा टिकून राहिला हवा. यासाठी वापरा या महत्त्वाच्या टिप्स
योग्य हेअर केअर प्रॉडक्ट वापरा
केसांची काळजी घेण्याचा आणि केस मऊ ठेवण्याचा हा सोपा मार्ग आहे. आजकाल बाजारात विविध प्रकारचे हेअर केअर प्रॉडक्ट मिळतात. सहाजिकच त्यामुळे आणि वेळे अभावी आपण नैसर्गिक उपाय करणं टाळतो आणि सहज हाती येणारे हेअर केअर प्रॉडक्ट वापरतो. मात्र यासाठी हेअर केअर प्रॉडक्ट निवडताना योग्य काळजी घ्या. असे प्रॉडक्ट निवडा ज्यामुळे तुमच्या स्काल्प आणि केसांमधील संतुलन बिघडणार नाही.शक्य असल्यास नारळाचे तेल, अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑईल, कांदा अशा नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेले प्रॉडक्ट केसांसाठी वापरा. ज्यामुळे तुमच्या केसांचे योग्य पोषण होईल आणि केस मऊ राहतील. लक्षात ठेवा केसांसाठी सल्फेट, अल्कोबोल, सुगंध असलेले प्रॉडक्ट मुळीच हिताचे नाहीत.
केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)
आहारात करा बदल
केस मॉईस्चाराईज ठेवण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे योग्य आणि संतुलित आहार घेणे. कारण तुम्ही काय खाता याचा परिणाम तुमच्या केसांवर होत असतो. आहारातून योग्य पोषणमुल्ये मिळाली की तुमचे केसही मऊ आणि चमकदार राहतात. यासाठी आहारात नेहमी ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, प्रोबायोटिक्स, फोलेट, अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए आणि सी, लोह असेल याची काळजी घ्या.
अती प्रमाणात केसांना उष्णता देणं टाळा
केसांमधील मॉईस्चार कमी होण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. कारण जरी तुम्ही चांगले हेअर केअर प्रॉडक्ट वापरले अथवा योग्य पोषक आहार घेतला तरी तुमच्या हेअर स्टाईल साठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांमधून तुमच्या केसांचा ओलावा नष्ट होतो. यासाठीच सतत केस ब्लो ड्राय, आयर्न, कर्ल करणं टाळा. कारण यासाठी लागणाऱ्या उपकरणांमधील उष्णतेमुळे केसांचे खूप नुकसान होते.
केसांना योग्य हेअर मास्क लावा
केसांना स्पा करणं, तेल लावणं आणि योग्य प्रकारचे हेअर मास्क लावणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण वातावरणातील उष्णता अथवा इतर गोष्टींमुळे सतत केसांचे पोषण, ओलावा कमी होत असतो. अशा वेळी हेअर मसाज, हेअर स्पा अथवा चांगला हेअर मास्क वापरून तुम्ही तुमचे केस पुन्हा मऊ आणि मुलायम करू शकता.
केस धुताना काळजी घ्या
केस चुकीच्या पद्धतीने धुतल्यामुळे तुमच्या केसांमधील ओलावा नष्ट होतो. यासाठी वारंवार केसांवर शॅंपूचा मारा करू नका. योग्य पद्धतीने हेअर कंडिशनर लावा आणि केस कधीच रगडून पुसू नका. केस योग्य पद्धतीने धुणे, सुकवणे केसांचे मॉईस्चार राखण्यासाठी गरजेचं आहे. कारण केस धुताना अथवा धुतल्यानंतर केसांची काळजी घेतली नाही तर केस लवकर कोरडे होऊ शकतात.