ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Dahi Recipe In Marathi

घट्ट दही कसे बनवायचे (Dahi Recipe In Marathi)

उन्हाळा सुरू झाल्यावर दही आणि ताकाचा आहारात समावेश करणं फार गरजेचं आहे. शिवाय दूग्धजन्य पदार्थांमधून शरीराल कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळू शकतात. दही प्रोबायोटीक असल्याने आर्युवेद उपचारांमध्ये नियमित दही खाण्याचा सल्ला दिला जातो. भारतीय स्वयंपाकामध्ये कढी, ताक, मठ्ठा, कोशिंबिरी, पछडीमध्ये दह्याचा वापर केला जातो. निरोगी आणि सृदृढ शरीरप्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीतकमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करा.  

आजकाल बाजारात सहज दही विकत मिळतं. मात्र हे दही बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या अथवा डब्ब्यातून दिले जाते. प्लॅस्टिक आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं आपल्या सर्वांना माहीत असतंच. त्यामुळे घरीच दही तयार करणं हे नेहमीच चांगलं. मुळात दही तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी पाच दहा मिनीटांमध्ये तुम्ही दह्याला विरजण लावू शकता. घट्ट अधमुऱ्या दह्याची चवच न्यारी असते. मात्र कधी कधी घरी लावलेलं दही घट्ट तयार होत नाही. यासाठीच आम्ही तुम्हाला घरीच दही कसे बनवायचे (Dahi Recipe In Marathi) हे सांगणार आहोत.  मातीच्या भांड्यांमध्ये लावलेले दही चांगले लागते. जर तुमच्याकडे मातीचे भांडे नसेल तर काचेच्या अथवा चिनी मातीच्या भांड्यात तुम्ही दही लावू शकता. शिवाय दही कसे लावावे या प्रक्रियेलादेखील तितकेच महत्व आहे. यासाठी दही कसे लावावे हे अवश्य वाचा.

दही कसे बनवतात

दही कसे बनवायचे त्याची पारंपरिक पद्धत-

अर्धा लीटर दूध चांगले तापवून घ्या. दूध सामान्य तापमानावर थंड करा.  एखाद्या मातीच्या, काचेच्या अथवा चिनी मातीच्या भांड्यात दोन चमचे दही टाकून ते भांड्याच्या आतल्या बाजूने पसरून लावा. या भांड्यात कोमट दूध टाकून दही आणि दूध चांगले एकत्र करा. रात्रभर हे भांडे अंधाऱ्या जागी अथवा एखाद्या गॅसशेजारी ठेवा. सकाळी त्या भांड्यात घट्ट दही नक्कीच तयार झालेले असेल.

ADVERTISEMENT

आजकाल मायक्रोवेव्ह अथवा अॅल्युमिनीयमच्या भांड्यात दही तयार केले जाते. मात्र असे दही आरोग्यासाठी मुळीच हितकारक नसते.

घरीच दही तयार करण्यासाठी आणखी काही टीप्स-

  • दही तयार करताना क्रीम दूधापेक्षा फॅट फ्री दूधाचा वापर करा
  • गरम दूधामध्ये दह्याचे विरजण लावू नका
  • विरजणासाठी वापरण्यात येणारे दही ताजेच घ्या
  • हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये दही पटकन लागते.
  • ज्या भांड्यामध्ये दही तयार करणार असाल त्या भांड्याला विरजणाचे दही व्यवस्थित लावून घ्या.
  • ज्या भांड्यांमध्ये दूध गरम करणार असाल त्याच भांड्यात दही लावू नका.
  • दही तयार झाल्यावर ते लगेच फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर ते आंबट होण्याची शक्यता असते.
  • उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन दिवसांचे शिळे दही वापरू नका.

दही कसे बनवायचे

वाचा – पंचामृत बनवाताना घ्या या गोष्टींची काळजी

दह्याचे आरोग्यावर होणारे फायदे-

  • दह्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • फॅट फ्री दुधापासून तयार केलेले दही ह्रदयरोगावर उत्तम असते.
  • दही शक्तीवर्धक आहे.
  • पचनाची समस्या असल्यास आहारात ताक आणि दह्याचा समावेश करावा
  • दह्यामुळे पोट साफ होते.
  • दह्यामध्ये काळीमिरी आणि गुळ टाकून खाल्यास जुनाट सर्दी कमी होते.
  • पोट बिघडलेले असलेले दह्यात शंखजिरे मिसळून खावे.
  • किडनीस्टोन असल्यास दह्याचे सेवन केल्यामुळे फायदा होतो.
  • युरिनरी इनफेक्शनवर दही खाण्याचा फायदा होऊ शकतो.

दही कसे तयार करावे

दही कधी खाऊ नये-

  • जास्त शिळे अथवा आंबट दही खाऊ नका.
  • मधूमेही रूग्णांनी जास्त दही खाऊ नये.
  • दही रात्रीच्या वेळी मुळीच खाऊ नये.
  • दह्यासोबत कारळ्याची भाजी कधीच खाऊ नये.

अधिक वाचा

ADVERTISEMENT

रोज दही खाताय? मग तुमच्या शरीराला येऊ शकते ‘सूज’

केसांसाठी दही कसं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या फायदे (Benefits Of Curd For Hair In Marathi)

Dahi for Hair in Hindi 

03 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT