ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
chaat recipe

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा असा चटपटीत मेन्यू

सकाळी आणि संध्याकाळी नक्की नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न बरेचदा पडतो. सकाळच्या नाश्त्यासाठी अनेक पर्याय आपल्याकडे आहेत. पण संध्याकाळी नाश्त्याला काहीतरी चटपटीत पदार्थ असावेत असं आपल्याला वाटत असतं. चहा अथवा कॉफीसह संध्याकाळी आपण काहीतरी चटपटीत खावं असंही वाटत असतं. बिस्किट अथवा वेफर्स असं काहीही खाल्लं तरीही आपल्याला वेगळं काहीतरी खावंसं वाटतं. लहान मुलं आणि मोठी माणसं दोघांनाही संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी काही खास स्नॅक्स जे झटपट बनवू शकतो अशा रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. गरमागरम कॉफी आणि चहासह तुम्ही चटपटीत आणि केवळ 10 मिनिट्समध्ये तयार होतील अशा काही विशिष्ट रेसिपी खास तुमच्यासाठी. 

नमकिन पापड चाट (Namkin Papad Chaat)

Instagram

10 मिनिट्सपेक्षा कमी वेळात तुम्हाला अप्रतिम चाट बनवायचे असेल तर तुम्ही ही खास रेसिपी नक्की ट्राय करायला हवी. पापडासह नमकिन चाट अप्रतिम लागते. 

साहित्य 

  • 4 पापड 
  • 2 चमचे नवरत्न मिक्स नमकिन 
  • 2 चमचे आलू भुजिया 
  • 1 लिंबू
  • अर्धा बारीक कापलेला कांदा 
  • अर्धा बारीक कापलेला टॉमेटो 
  • चिमूटभर जिरे पावडर 
  • बारीक कापलेली मिरची आणि कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिल्यांदा एका बाऊलमध्ये तुम्ही आलू भुजिया आणि नवरत्न मिक्स नमकिन मिक्स करून घ्या 
  • वेगळ्या भांड्यात टॉमेटो आणि कांदा कापून ठेवा 
  • पापड तळून घ्या आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवा. पापड तळून झाल्यावर लगेच टाकोसारखा त्याचा आकार करून घ्या 
  • पापडांवर मिक्स केलेले नमकिन, लिंबाचा रस, कांदा, टॉमेटो, कापलेली मिरची आणि कोथिंबीर घाला
  • वरून जिरे पावडर, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि खायला द्या

भेल पुरी पापडी चाट (Bhel Puri Papdi Chaat)

Instagram

भेळपुरीला थोडासा ट्विस्ट देऊन तुम्ही क्रंची चाट बनवू शकता. हे झटपट तयार होणारे नमकिन चाट तुमचा स्वाद अधिक वाढवेल. 

साहित्य

  • अर्धा कप भेळ 
  • 3-4 पापडी 
  • तळलेले शेंगदाणे 2 मोठे चमचे 
  • लिंबू रस 
  • कापलेला कांदा आणि टॉमेटो 
  • चाट मसाला
  • कापलेली हिरवी मिरची 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले तुम्ही एका डिशमध्ये भेळ, तळलेले शेंगदाणे, कांदे, टॉमेटो आणि हिरवी मिरची एकत्र करून घ्या 
  • त्यामध्ये पापडी आणि चाट मसाला घालून तुम्ही मिक्स करा 
  • सर्वात शेवटी लिंबाचा रस पिळून मिक्स करून मस्तपैकी भेळपुरी चाट तुम्ही चहा आणि कॉफीसह सर्व्ह करा 

मिक्स नमकिन चाट (Mix Namkeen Chaat)

Instagram

मिक्स नमकिन चाट बनविण्यासाठी तुमच्याकडे जितके नमकिन असतील तुम्ही मिक्स करून घ्या. साधारण तीनपेक्षा अधिक वेगवेगळे नमकिन पाकिट तुम्ही मिक्स करून घ्या. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • आलू भुजिया, शेंगदाणे, फरसाणचे दोन ते तीन वेगवेगळे पाकिट
  • बारीक कापलेला कांदा, टॉमेटो
  • हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कापून 
  • लिंबाचा रस 
  • 2 पापड 
  • हिरवी चटणी  

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिल्यांदा एका बाऊलमध्ये सर्व फरसाण मिक्स करून घ्या 
  • त्यानंतर हाताने पापड कुस्करून त्यामध्ये मिक्स करा 
  • त्यात टॉमेटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्या
  • त्यानंतर सर्वात शेवटी हिरवी चटणी आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा आणि चहा अथवा कॉफीसह खा 

या सर्व रेसिपी तुम्हाला 10 मिनिट्सपेक्षा कमी वेळात करता येतील. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पटकन या चटपटीत रेसिपी तयार करून घेऊ शकता. या रेसिपी पटकन होतील आणि खायलादेखील मजा येईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT