ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
झटपट लसूण सोलण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

झटपट लसूण सोलण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

लसूण हा स्वयंपाकात अनेक पदार्थांची रूची वाढवण्यासाठी वापरला जातो. एखाद्या पदार्थालालसणाची खमंग फोडणी दिली तर तो अधिकच स्वादिष्ट लागतो. लसूण खाण्याचे फायदे अनेक आहेत. महाराष्ट्रीयन स्वयंपाकात लसणाचा हमखास वापर केला जातो. पालेभाज्या, लोणचं, चटणीसारख्या पदार्थांमध्ये भरपूर लसणाच्या पाकळ्या वापरल्या तरच ते पदार्थ रूचकर होतात.  मात्र स्वयंपाकासाठी एवढा लसूण वारंवार सोलणं हे एक डोकेदुखीचं काम असतं. एकतर लसणाला उग्र वास येतो शिवाय लसूण सोलताना तुमची बोटंही दुखू लागतात. बाजारात सोललेला लसूण विकत मिळतो. मात्र तो फारच महाग असतो. यासाठीच आम्ही तुम्हाला लसूण सोलण्याच्या झटपट टिप्स सांगत आहोत. ज्यामुळे तुमचा वेळ नक्कीच वाचू शकेल. 

Shutterstock

लसूण सोलण्याच्या ‘5’ सोप्या टिप्स

 

कोणतंही काम कधीच कठीण नसतं फक्त ते करण्याची सोपी युक्ती तुम्हाला माहीत असायलाच हवी.  लसूण तर स्वयंपाकासाठी सतत लागतो. मग तो अगदी सोप्या पद्धतीने कसा सोलायचा हे तुम्हाला माहीत असायला हवंच.

चाकूच्या मदतीने सोला लसूण –

 

लसूण सोलण्याची ही पद्धत अगदी सोपी आणि साधी आहे. सोशल मीडियावर ही युक्ती  व्हायरल झाली आहे. या पद्धतीत तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या टोकदार चाकूने लसूण सोलू शकता. यासाठी तुम्हाला फक्त चाकू लसणाच्या पाकळ्यांमध्ये घालून ती पाकळी सोलायची आहे.

ADVERTISEMENT

पाण्यात टाकून सोला लसूण –

 

झटपट लसूण सोलण्याचा ही सोपी आणि जुनी पद्धत आहे. यासाठी लसणाच्या पाकळ्या पाण्यात थोडावेळ भिजत ठेवा. ज्यामुळे हातात घेतल्यावर लगेचच लसणाच्या पाकळ्या सोलल्या जातील. शिवाय यामुळे तुमच्या हातांना लसणाचा उग्र वासही येणार नाही. जर तुम्ही यासाठी थोडं कोमट पाणी वापरलं तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.

पोलपाट आणि लाटण्याच्या मदतीने सोला लसूण –

 

एका क्षणासाठी तुम्हाला वाटेल की, आम्हाला लसणाची पोळी किंवा पापड नाही करायचा मग पोलपाट आणि लाटणं कशाला. पण खरंच ही लसूण सोलण्याची एक सोपी साधी पद्धत आहे. यासाठी पोलपाटावर लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि पोळी लाटल्याप्रमाणे त्यावर लाटणं फिरवा. काही क्षणात लसणाच्या पाकळ्या सोलल्या जातील. 

अधिक वाचा – ‘या’ कारणांसाठी आहारात लसूण जरूर वापरा

डब्यात ठेवून असा सोला लसूण –

 

जर तुम्हाला एकाच वेळी भरपूर लसूण सोलायचा असेल तर ही पद्धत अगदी मस्त आहे. यासाठी तुम्हाला फक्त एका रिकाम्या डब्यात लसणाच्या पाकळ्या भरा. डब्याचं झाकण लावा आणि तो डबा पाच ते सहा मिनीटे वेगाने हलवा. या पद्धतीमुळे लसूण अगदी सोप्या पद्धतीने सोलला जाईल. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे

मायक्रोवेव्हमध्ये ठेवून सोला लसूण –

 

लसूण सोलणं ही कंटाळवाणी गोष्ट असल्यामुळे तुम्हाला ते सहज सोलून मिळावे असं वाटत असतं. मायक्रोवेव्हमध्ये लसूण सोलणं अगदी सोपं आहे. यासाठी मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदासाठी लसूण ठेवा. ज्यामुळे ते अगदी पटकन सोलले जातील. 

 

(टिप – लसूण विकत घेताना तो चांगल्या गुणवत्तेचा आणि भरलेल्या पाकळ्या असतील असाच निवडा. कारण जर तुम्ही खराब झालेला अथवा हलक्या गुणवत्तेचा लसूण विकत घेतला तर त्यामधून जास्त पाकळ्या नक्कीच निघतील.)

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

लसूण आणि कांद्याच्या सालांचा असा करा उत्तम वापर

ADVERTISEMENT
31 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT